

Ratnagiri News : राज्य सरकारने शेतकऱ्यांच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर याबाबतचा शासन निर्णय काढण्यात आला असून महाराष्ट्रातील तब्बल 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर झाला आहे. या घोषणेमुळे बळीराजाला आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळेल असे बोलले जात आहे.
दरम्यान, सरकारने दुष्काळ जाहीर केल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया देत काही प्रश्न उपस्थित केले होते. ज्यावर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी जोरदार पलटवार करत टोला लगावला आहे.
राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी याचे याची अंमलबजावणी कशी होणार? याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी देणे गरजेचं आहे. तसेच शासन निर्णयात नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत? याचे देखील स्पष्टीकरण व्हायला हवे. मागच्या वर्षी अतिवृष्टी झाली होती त्याची देखील मदत अजून देली गेली नाहीये.
यामुळे पॅकेजमध्ये नेमकं असणार? हे सांगावं. ज्या पद्धतीने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविडची परिस्थिती पारदर्शकपणे जनतेसमोर टीव्ही किंवा मीडियाच्या माध्यमातून मांडली होती. राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी फक्त घोषणा केली असून आजपासून खरोखर शेतकऱ्यांच्या हातात काय पोचणार? ते बघणं गरजेचं असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले होते.
यावरूनच आता उदय सामंत यांनी आदित्य ठाकरेंवर निशाना साधला आहे. त्यांनी, चांगलं आहे ना? घरातून आता बाहेर पडलेत, त्यांचे अभिनंदन. तसेच यावेळी त्यांनी, राज्यात दुष्काळाची परिस्थिती अतिशय भयावह असून मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आम्ही सर्व मंत्री शेतकर्यांच्या बांधावर जाऊन दिलासा देण्याचं काम करत आहोत. तर हे सरकार शेतकर्यांच्या मागे सरकार ठामपणे उभं आहे. यामुळे अशा प्रसंगाचं विरोधकांनी राजकारण करू नये, शेतकऱ्यांच्या मागे महाराष्ट्र एकसंघ असला पाहिजे, असे आवाहन सामंत यांनी यावेळी केले आहे.
तसेच दुष्काळाचं संकट भयावह असून कोकणात देखील स्थिती बिकट आहे. पुढे चार-पाच दिवसभर पाऊस पडला नाही तर नुकसानीचा आकडा हा ४० ते ५० टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. याच्यामुळे असं कोणी समजून नाही की 265 तालुक्यांमध्ये आमचा तालुका नाही. पण पुढे दाहकता वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन आधीच सर्व्हे करण्याचे आदेश रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून दिले आहेत. असेच आदेश भरत गोगावले आणि नितेश राणे यांनी देखील दिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना चिंता करण्याची गरज नाही, असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.