

रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजा केणी यांच्या गाडीवर ‘आमदार’ असा लोगो लावल्याने राजकीय खळबळ उडाली आहे.
ते जिल्हा नियोजन समितीचे सदस्य असले तरी आमदार नसल्याने विरोधकांनी या प्रकरणावर आक्षेप घेतला आहे.
या प्रकरणामुळे शिंदे गटाला पुन्हा एकदा स्पष्टीकरण द्यावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Raigad News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत अद्याप जागा वाटपाची कोणतीच अधिकृत चर्चा झालेली नाही. तोच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून रायगडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीवर कुरघोडी करण्यात आली. येथे जिल्हाप्रमुख व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राजाभाई केणी यांनी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत महायुतीलाच जोरदार धक्का दिला होता. यामुळे वाद सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात होती. आता वादही सुरू झाला असून तो केणी यांच्या एका ‘कार’नाम्यामुळे सुरू झाला आहे. त्यांच्या गाडीवर आमदार असा लोगा असल्याने आता वादाची ठिणगी पडली असून आयजीच्या जीवावर बायजी उदार अशी अवस्था झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
राजा केणी हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष आहेत. ते काही आमदार नाहीत. तरीही त्यांच्या चारचाकी गाडीवर ‘आमदार’ असा लोगो लावलेला आहे. यामुळे रायगडच्या राजकीय वर्तुळात आता या ‘कार’नाम्याची चर्चा सुरू झाली असून नागरीक यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. राज्यात सध्या डिफेंडर गाडीवरून राजकीय वाद पहायला मिळत असून शिवसेनेच्या अनेक नेत्यांसह मंत्र्यांकडे त्या आहेत. तर त्या एका ठेकेदार दिल्याची चर्चा रंगली आहे.
अशातच आता राजा केणी यांच्याकडेही डिफेंडर गाडी असल्याचे समोर आले असून यावर आमदाराचा लोगो आहे. हा लोगो लावून राजा केणी अलिबागसह संपूर्ण जिल्ह्यात राजरोसपणे फिरत आहेत. मोटार वाहन कायद्यानुसार गाडीवर असा लोगो लावणे चुकीचे आहे. पण शिंदेंच्या शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख राजा केणी यांच्या गाडीवर आमदारांचा लोगो असल्याचे दिसून येत आहे.यामुळे आयजीच्या जीवावर बायजी उदार या म्हणी प्रमाणे राजा केणी वावरत असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू झाली आहे.
केणी राष्ट्रवादीत जाणार
दरम्यान राजा केणी राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तूळात आहे. तर या लोगोचा थेट संबंध आता आमदार महेंद्र दळवी यांच्याशी लावला जात आहे. आमदार दळवी यांच्याशी असणारी सलगी आणि त्यांच्या पदाचा आधार घेत राजा केणी आपल्या गाडीवर आमदार लोगो लावून फिरत असल्याचीही आता चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान रायगड वाहतूक पोलिसांनी अशा लोगोंबाबत कारवाईची मोहिम हाती घेतली असून मागील अनेक दिवसांपासून कारवाईचे सत्र सुरु करण्यात आले आहे. विनाकारण आमदारांचे लोगो लावणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलीस कारवाई करत आहेत. पण या कारवाईत पोलिसांकडून राजा केणी यांना अभय मिळाले असून आतातरी पोलिस कारवाई करणार का असा सवाल जनता करत आहे.
1. राजा केणी कोण आहेत?
राजा केणी हे रायगड जिल्ह्यातील शिंदे गटाच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आहेत.
2. वाद का झाला?
त्यांच्या गाडीवर ‘आमदार’ असा लोगो लावल्यामुळे हा वाद सुरू झाला आहे.
3. राजा केणी आमदार आहेत का?
नाही, ते आमदार नाहीत. त्यामुळे ‘आमदार’ लोगो लावल्याबद्दल विरोधकांनी आक्षेप घेतला आहे.
4. या प्रकरणावर शिंदे गटाची भूमिका काय आहे?
शिंदे गटाने या प्रकरणावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
5. पुढील कारवाई काय होऊ शकते?
प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी होऊ शकते आणि नियमभंगाबाबत पुढील निर्णय घेतला जाऊ शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.