

स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात शिवसेना जिल्हाध्यक्ष संजू परब आक्रमक झाले आहेत.
त्यांनी सांगितले की आमदार दीपक केसरकर आणि नीलेश राणे यांच्या पाठिंब्याने आता भाजप कार्यकर्त्यांना शिवसेनेत घेणार आहेत.
या विधानामुळे सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण तापले असून भाजपसाठी नवी अडचण निर्माण झाली आहे.
Sindhudurg News : आगामी स्थानिकच्या आधीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना आक्रमक झाली आहे. भाजपने तर थेट स्वबळाचा नारा दिला आहे. तर मंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्यात मैत्रिपूर्ण लढती होतील असे स्पष्ट करत युती होणार नसल्याचे जाहीर केले आहे. यापाठोपाठ आमदार निलेश राणे यांनी देखील स्वबळाची घोषणा करत स्थानिकवर फक्त शिवसेनेचाच झेंडा फडकेल असा दावा केला आहे. यामुळे आता येथे भाजप आणि शिवसेनेत स्थानिकच्या आधीच स्पर्धा सुरू झाली आहे.
दरम्यान आता या स्पर्धेत भाजप आणि शिवसेना जिल्हाध्यक्षांच्या वादाची भर पडली आहे. भाजप जिल्हाध्यक्षांनी शिवसेना जिल्हाध्यक्ष संजू परब यांना दिलेल्या आव्हानानंतर या वादाला आता आणखी फोडणी मिळाली आहे. यावरून परब यांनी, आपण कोणाला घाबरत नाही. घाबरणे हा माझा स्वभाव नाही. जे बोलायचंय ते स्पष्ट बोलतो. भाजपला अंगावर घेण्याची माझी तयारी आहे. यापुढे भाजपला धक्क्यावर धक्के देणार, असा सूचक इशारा दिला आहे.
फक्त सूचक इशाराच नाही तर भाजपला सुरंगही लावण्याचे काम सुरू केलं आहे. त्यांनी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सांगेलीतील भाजपचे प्रमुख पदाधिकारी संतोष नार्वेकर यांना फोडले. यामुळे शिवसेनेची सांगेली परिसरात सेनेची ताकद वाढली असून भाजपला हा एक धक्का मानला जात आहे. तसेच संजू परब यांनी भाजपला आणखीन एक धक्का देत तळवणे उपसरपंच रामचंद्र गावडे यांच्यासह माजी उपसरपंच आणि माजी ग्रामपंचायत सदस्यांना शिवसेनेत घेतले. तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतील युवा तालुकाप्रमुख रियाज खान यांनी देखील 25 ऑक्टोंबर रोजी असंख्य कार्यकर्त्यांसह शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी परब यांनी, ‘‘विशिष्ट समाजातील लोकांना फसवून प्रत्येकी हजार रुपये देऊन प्रवेश केल्याचे भासविले आणि शिंदे सेनेला धक्का दिला अशा बातम्या पसरविल्या जात आहेत. तुम्ही नेमके कोणाला फसवताय ते बघा. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना फसवू नका. मी त्यांचे बूथ अध्यक्ष, तालुका व जिल्हा कार्यकारणी सदस्य शिवसेनेत घेतले. भाजपवाल्यांनी यावर बोलावे. पण एकाचीही हिंमत नाही. मागून चर्चा करणार, मात्र समोर बोलण्याची त्यांच्यात ताकद नाही.
मी दिलेला शॉक त्यांना चांगलाच लागलाय. माझ्यावर आमदार दीपक केसरकर, नीलेश राणे यांचा वरदहस्त आहे. मी यापुढे शिवसेनेत भाजपचेच कार्यकर्ते घेणार. भाजपला धक्क्यांवर धक्के देणार. शिवसेनेला धक्का देणे तुमच्या ललाटी नाही, असा जोरदार हल्लाबोल परब यांनी केलाय.
1. संजू परब कोण आहेत?
संजू परब हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि ते एकनाथ शिंदे यांच्या गटाशी संबंधित आहेत.
2. त्यांनी काय विधान केले?
त्यांनी जाहीर केले की, भाजप कार्यकर्त्यांना शिवसेनेत घेऊन भाजपला धक्क्यांवर धक्के देतील.
3. त्यांना कोणाचा पाठिंबा आहे?
आमदार दीपक केसरकर आणि नीलेश राणे यांचा त्यांना स्पष्ट पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.
4. हे विधान कुठल्या पार्श्वभूमीवर करण्यात आले?
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केले.
5. या विधानाचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
या विधानामुळे सिंधुदुर्गात भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.