

नारायण राणेंना चिपळूणमधील कृषी महोत्सवात अचानक भोवळ आली होती.
यानंतर त्यांनी आपली तब्येत ठणठणीत असल्याचे स्पष्ट केले आहे.
राजकीय निवृत्तीचे संकेत दिल्याचा दावा त्यांनी फेटाळून लावला आहे.
Sindhudurg News : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते तथा खासदार नारायण राणे यांनी गेल्या दोन दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलेच तापवून सोडलं आहे. त्यांनी रविवारी मोठी घोषणा करत आता आपण थांबणार असून दोन्ही मुलं राजकारणात सक्रीय झाले आहेत. आता शरीरही साथ देत नसल्याने थांबायला हवं, कोणीतरी व्यवसायही पाहायला हवा असे म्हटलं होतं. त्यांच्या या विधानानंतरच त्यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिल्याची चर्चा सुरू झाली होती. तोच आज रत्नागिरीत आयोजित कृषी महोत्सवाच्या कार्यकमात त्यांची तब्बेत बिघडली. त्यांना भोवळ आल्याने सर्वांची धावपळ उडाली. आता या नारायण राणे यांनी तब्येतीलबद्दल माहिती देताना आपण ठीक असून राजकीय निवृत्तीचे संकेतावर युटर्न घेतला आहे. मी तसं बोललो नाही असे बोलत राजकीय निवृत्तीचे संकेत कोणी दिले? असा सवाल केला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे आयोजित 'कृषी महोत्सवा'च्या एका कार्यक्रमाला नारायण राणेंनी उपस्थित लावली. यावेळी स्टेजवर भाजप नेते रावसाहेब दानवे, बबनराव लोणीकर, कैलास गोरंट्याल, नारायण कुचे, भास्कर दानवे, संतोष दानवे उपस्थित होते. राणें यांचे भाषण संपत आले असतानाच त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यांचा आवाज बसला. तसेच त्यांना चक्कर येत असल्याचे जाणवले. यावेळी त्यांनी आपले भाषण थांबवले. हे जवळ असणाऱ्या कार्यकर्त्यांनी आणि सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आले आणि त्यांनी त्यांना खुर्चीकडे नेले. भोवळ आल्याने काही मिनिटे पत्नी समवेत बसून त्यांनी विश्रांती घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलणे टाळून ते गेस्ट हाऊसकडे विश्रांतीसाठी रवाना झाले. त्यांना डॉक्टरांनीही विश्रांतीचा सल्ला दिला होता.
भर कार्यक्रमात ही घटना घडल्याने येथे एकच खळबळ उडाली होती. तर सर्वांची धावपळही उडाली होती. आता या सर्व घटनेवर राणेंनी स्पष्टीकरण दिले असून आता आपली तब्येत ठीक असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी भाषण करत असताना ब्लड प्रेशर लो झालं, तर डायबेटिस शुगर सव्वातीनशेच्या वर गेली होती. त्यामुळेच अस्वस्थपणा आला होता आणि चक्कर आली. पण, आता मी ठीक असल्याचेही राणे म्हणाले.
याचवेळी त्यांनी त्यांच्या रंगलेल्या राजकीय निवृत्तीच्या चर्चांवर थेट पत्रकारांनाच सवाल करत निवृत्तीचे संकेत कोणी दिले? असे म्हटले. तर माझं वाक्य नीट बघा... जर मी रिझल्ट देऊ शकलो नाही तर माझ्या पदाचा उपयोग काय? असं म्हटलं आहे. निवृत्त होतो असं मी म्हटलेलं नाही. मी जर माझ्या पदाचा उपयोग जनमानसाला होत नसेल आणि होऊ देत नसतील तर पूर्णविराम देईल, असे मी म्हटलं होतं. त्यामुळे, राजकीय निवृत्तीच्या चर्चांना राणेंकडून पूर्णविराम देण्यात आला असून राजकीय निवृत्ती घेणार नसल्याचेच त्यांनी स्पष्ट केलं आहे.
नेमंक काय म्हणाले होते राणे?
सिंधुदुर्ग मधील सभेत बोलताना नारायण राणे यांनी, "आजही नारायण राणे रस्त्यावर भाजी घेतो. इतरांप्रमाणे हातात अंगठ्या घालून आणि काळ्या काचेच्या गाड्या घेऊन फिरत नाही. तर माझ्या गाडीला काळ्या काचाच नाहीत. मी माणुसकी जपणारा, माणुसकी धर्म पाळणारा आहे. पण आतापर्यंत बरेच जण माझ्या आडवे आले जे मी आजपर्यंत बोललो नाही. बोलणारही नाही. तेव्हाही अडचणी आल्या आणि आताही. राजकारणात कट कारस्थान केलं जातं. त्यामुळे, आता मी ठरवलंय, की घरी बसायचं. मुलांना सांगेन नांदा सौख्य भरे... चांगल्याला जोपासा.
तसेच कधी तरी थांबायला हवं, असं कुठं आहे की सतत काम करतं राहावं. शेवटी शरीर आहे. माणसाला वाटतं आता थांबावं. आता आपलं वय वाढत चाललं असून शरीरही थकत आहे. आपली दोन्ही मुलं निलेश आणि नितेश राणेही राजकारणात स्थिरावली आहेत. तेच आता यापुढे विकासात्मक राजकारणाची धुरा सांभाळतील. त्यामुळे कोणीतरी व्यवसायही पाहायला हवा. आता आपल्यानंतर त्यांनी तुम्हाला हाक दिल्यास कार्यकर्त्यांनो तुम्ही ‘ओ’ द्या, असे आवाहन देखील राणेंनी केलं होतं. पण आता त्यांनी आपण असे बोललोच नाही असे म्हणत निवृत्तीचे संकेत कोणी दिले? असे म्हणत निवृत्तीच्या चर्चेला पूर्णविराम लावला आहे.
Q1. नारायण राणेंना नेमकं काय झालं होतं?
➡️ चिपळूणमधील कार्यक्रमादरम्यान त्यांना क्षणभर भोवळ आली होती.
Q2. त्यांची प्रकृती सध्या कशी आहे?
➡️ नारायण राणेंनी स्वतः मी पूर्णपणे ठीक असल्याचे सांगितले आहे.
Q3. त्यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिले होते का?
➡️ नाही, मी तसं काही बोललो नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
Q4. भोवळ येण्यामागे कारण काय होते?
➡️ याबाबत कोणतेही गंभीर कारण नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
Q5. या घटनेमुळे राजकीय चर्चांना का उधाण आलं?
➡️ निवृत्तीच्या चर्चेनंतर ही घटना घडल्याने तर्क-वितर्क सुरू झाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.