Pramod Jathar : एक रुपयाचेही काम न करणाऱ्या खासदारांचा पराभव निश्चित; प्रमोद जठारांनी राऊतांविरोधात थोपटले दंड

Pramod Jathar and Vinayak Raut : कणकवलीचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्यावर जोरदार टीका केली.
Pramod Jathar and Vinayak Raut :
Pramod Jathar and Vinayak Raut :Sarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri Political News: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे नेते, कणकवलीचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी ठाकरे गटाचे (Thackeray group) खासदार विनायक राऊत यांच्यावर जोरदार टीका करत निशाणा साधला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये विनायक राऊत यांचा पराभव या महायुतीचा सामान्य कार्यकर्ता करेल. गेल्या दहा वर्षांत या खासदाराने एक रुपयाचंही काम केलेलं नाही, असा आरोप प्रमोद जठार यांनी केला. (Marathi News)

गेल्या दहा वर्षांत एकही काम न करता विनायक राऊत यांचा हा कॉन्फिडन्स नाही, तर मा# आहे. 12 ते 15 लाख मतदारांना गृहीत धरणं हे महागात पडणार असून, येथे निवडणुकीत महायुतीचा सामान्य कार्यकर्ताही विनायक राऊत यांचा पराभव करेल, अशी टीका जठार यांनी केली. दहा वर्षांत कोकणात एकही पैशाचा रोजगार आणला नाहीच, उलट लोकांचा रोजगार बुडवला, अशा या खासदारांचा जनता दोन ते अडीच लाख मतांपेक्षा अधिक मतांनी पराभव करेल, अशी टीका जठार यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Pramod Jathar and Vinayak Raut :
Bharat Jodo Nyay Yatra : राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात; कोणाचे बारा वाजणार?

खासदार विनायक राऊतांनी (Vinayak Raut) गेल्या दहा वर्षांमध्ये एकही रुपयाचे काम केले नाही. कोविड काळात यांचे मुख्यमंत्री असताना अनेकांना गाड्या दिल्या, पण कोकणातल्या जनतेला कोकणात यायला अडवलं. कोकणी जनतेचे हाल करणारे अशा प्रकारचे हे ठाकरे गटाचे खासदार आहेत. ज्यांनी चार आण्याचं कामसुद्धा केलं नाही. एकही पैशाचा रोजगार कोणाला दिला नाही. उलट कोकणाचा रोजगार बुडवला. अशा विनायक राऊतांना दोन अडीच लाख नाही, त्यापेक्षा जास्त मताने या महायुतीतील सामान्य कार्यकर्ता हरवून दाखवेल, असा विश्वास जठार यांनी व्यक्त केला.

विधिमंडळात कोकणातल्या काजू उत्पादकांना दिलासा देणारी घटना घडली. मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासोबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण, मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar), आमदार नितेश राणे, निरंजन डावखरे, राजन तेली, आम्ही सगळी मंडळी उपस्थितीत झालेल्या बैठकी काजूला अनुदान मिळवण्यासाठी आम्ही आग्रही होतो, पण तीनही कॅबिनेट मंत्र्यांनी हे अधिवेशन संपण्यापूर्वी कोकणातल्या काजू उत्पादक शेतकऱ्यांना गोव्याच्या धरतीवर अनुदान दिले आहे, त्याप्रमाणे मागणी मान्य झाली. मला विश्वास आहे, सिंधुदुर्ग-रत्नागिरी आणि कोल्हापूरच्या काही भागांमध्ये हे 75 टक्के काजू उत्पादन शेतकरी घेतात. त्यांना अनुदान स्वरूपात काही ना काही तरी लवकरच मिळेल, असा विश्वास जठार यांनी व्यक्त केला.

(Edited By-Ganesh Thombare)

R

Pramod Jathar and Vinayak Raut :
Geete Challenge to Tatkare : अनंत गीतेंचे सुनील तटकरेंना खुलं चॅलेंज; ‘हिंमत असेल तर माझ्याविरोधात लोकसभा लढवा’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com