

माजी आमदार राजन साळवी यांच्या मुलगा अथर्व साळवी यांना रत्नागिरीतील प्रभाग 15 मधून शिवसेनेने तिकीट नाकारले असून यामुळे पक्षांतर्गत नाराजी वाढली आहे.
हीच जागा भाजपला दिली जाण्याची किंवा दुसऱ्या उमेदवाराला तिकीट देण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.
या निर्णयामुळे पालकमंत्री उदय सामंत आणि राजन साळवी यांच्यात शीतयुद्ध सुरू होण्याची राजकीय शक्यता व्यक्त केली जात आहे.
Ratnagiri News : रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली असून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्षांची मोठी झुंबड उडाली आहे. रविवारी (ता.16) सुट्टीचा दिवस असतानाही 24 उमेदवारांनी अर्ज दाखल केला. आतापर्यंत नगरसेवकपदाच्या 32 जागांसाठी 44 वर अर्ज दाखल झाले असून आज सोमवारी (ता. 17) उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. अशातच येथे पुन्हा एकदा शिवसेनेतील अंतर्गत वाद सुरू होण्याची शक्यता असून जिल्ह्यात पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत आणि राजन साळवी यांच्यात राजकीय शीतयुद्ध सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात जातेय.
जिल्ह्यात एकीकडे नगरपरिषद निवडणुकीसाठी महायुती, महाआघाडीसह अपक्ष उमेदवारांसह नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याची तयारी केली जात असतानाच येथे उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या माजी आमदार राजन साळवी यांना मोठा धक्का बसला आहे. ज्या साळवी यांनी रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 15 मधून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती.
तेथेच त्यांना मोठ्या काटशहाच्या राजकारणाला बळी पडावे लागले आहे. त्याचे पुत्र अथर्व साळवी यांना प्रभाग क्रमांक 15 मधून शिवसेनेची उमेदवारी नाकारण्यात आली आहे. या निर्णयामुळे राजन साळवी नाराज झाल्याचीही आता चर्चा सुरू झाली आहे. तर ही जागा भाजपला किंवा अन्य उमेदवार देण्याच्या शक्यता निर्माण झाली आहे.
प्रभाग क्रमांक 15 मध्ये राजन साळवी यांचे पुत्र अथर्व साळवी इच्छुक होते. तशी त्यांनी तयारी देखील केली होती. पण शिंदेंच्या शिवसेनेकडून ही जागा भाजपला सोडली जाण्याची शक्यता आहे. यासाठी उदय सामंत यांच्यावर दबाव असल्याचेही आता बोलले जात आहे. पण जर ही जागा भाजपला नाही गेली तर ती भाजपमधीलच एखाद्या आयात उमेदवाराला घेवून शिवसेनेच्या तिकीटावर दिली जाऊ शकते. याच राजकीय समीकरणांमुळे येथे ट्विस्ट निर्माण झाला आहे.
दरम्यान अथर्व साळवी यांना उमेदवारी शिवसेनेनं म्हणजेच पालकमंत्री उदय सामंत यांनी नाकारल्याने राजन साळवी नाराज झाले आहेत. यामुळे ऐन रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत उदय सामंत आणि राजन साळवी यांच्यात शीतयुद्ध रंगण्याची शक्यता आहे. पण आजचा उमेदवारी भरण्याचा शेवटचा दिवस असून मुलासाठी राजन साळवी काय भूमिका घेणार? प्रभाग 15 अंतिमतः कोणत्या पक्षाकडे जाणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
साळवींची ऐतिहासिक कारकीर्द
प्रभाग क्रमांक 15 मधून अथर्व साळवी यांचा पत्ता पक्षाने कट केला आहे. यामुळे साळवी प्रचंड नाराज झाले असून ते कोणती भूमिका घेणार याकडे त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिवसेना आणि जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. याच प्रभागातून साळवी यांची ऐतिहासिक राजकीय कारकीर्द सुरू झाली होती.
येथून ते नगरसेवक आणि त्यानंतर रत्नागिरीचे नगराध्यक्ष झाले होते. त्यामुळे मुलगा अथर्व साळवी याची देखील सुरूवात प्रभाग क्रमांक 15 मधून व्हावी यासाठी ते आग्रही होते. त्या पद्धतीने अथर्व साळवी देखील इच्छुक होते. मात्र शिवसेनेने राजन साळवी यांच्या मुलाला रउमेदवारी नाकारली आहे.
FAQs :
अंतर्गत राजकीय समीकरणे, जागेचे वाटप आणि भाजपसोबतच्या चर्चेमुळे ही जागा बदलण्याची शक्यता आहे.
तिकीट नाकारल्यामुळे ते नाराज असल्याचे सूत्रांचे म्हणणे.
भाजपला सोडण्याची किंवा इतर उमेदवाराला देण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सध्याच्या परिस्थितीत दोघांमध्ये राजकीय शीतयुद्ध सुरू होण्याची शक्यता मोठी मानली जाते.
शिवसेनेत अस्थिरता वाढू शकते आणि विरोधकांना फायदा होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.