Suryakant Dalvi
Suryakant DalviSarkarnama

माजी आमदार सूर्यकांत दळवींकडे शिवसेनेची निवडणुकीसाठीची सूत्रे?

दापोली नगरपंचायत निवडणुकीसाठी शिवसेना व राष्ट्रवादी यांची आघाडी होणार आहे.

दाभोळ : दापोली नगरपंचायत निवडणुकीसाठी शिवसेना (Shivsena)राष्ट्रवादी (NCP) यांची आघाडी होणार असल्याच्या शक्यतेमुळे दोन्ही पक्षात अस्वस्था निर्माण झाली आहे. प्रत्येक प्रभागातील संभाव्य उमेदवारांची चिंता, यामुळे वाढली असून या निवडणुकीसाठी शिवसेनेची सर्व सूत्रे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याकडे देण्यात आल्याची चर्चाही दापोलीत सुरू आहे. यामुळे सेनेच्या इच्छुक उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. (Former MLA Suryakant Dalvi has Shiv Sena leadership for Dapoli Nagar Panchayat election)

दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाच्या वरिष्ठांनी दोन्ही राजकीय पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला असला तरी या दोन्ही पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना ही आघाडी मान्य नाही. मात्र, ते तसे बोलूही शकत नाहीत.

Suryakant Dalvi
संतापजनक : गृहमंत्र्यांनीच पोलिसांची तुलना केली कुत्र्यांशी!

नगराध्यक्षपदाची बाशिंगे डोक्याला बांधून तयार असलेले काही उमेदवार आपले आता कसे होणार, या चिंतेत आहेत. दळवी हे अद्याप मुंबईतच असून येत्या नगरपंचायत निवडणुकीत पक्ष जी जबाबदारी देईल, ती स्वीकारायला आपण तयार आहोत, अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली. दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी सध्या मलाच या विषयाबत काही माहिती नाही, असे सांगितले.

Suryakant Dalvi
तुमच्या लोकप्रियतेवर नव्हे; तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमुळे तुम्ही खासदार : मोहितेंनी कोल्हेंना सुनावले

आमदार योगेश कदम मुंबईत

आमदार योगेश कदम या संदर्भात वरिष्ठांकडून अधिक माहिती घेण्यासाठी ता. ४ डिसेंबर रोजी रात्री मुंबई येथे रवाना झाले असून, काही पदाधिकारीही मुंबई येथे जाण्याच्या तयारीत होते. मुंबई येथे जाऊन दापोलीतील परिस्थिती वरिष्ठांच्या कानावर घालणार आहेत. या भेटीनंतरच दापोली व मंडणगड नगरपंचायत निवडणुकीची रणनीती स्पष्ट होणार आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या पक्षातील उमेदवारांची उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ७ डिसेंबर आहे, अशी घोषणा केली आहे.

आघाडीच्या उमेदवारांचा करावा लागणार प्रचार

शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमधील दापोलीतील दोन्ही पक्षांचे पदाधिकारी विरोधी पक्षातील कार्यकर्ते आपल्या पक्षात घेण्यासाठी कायम प्रयत्नशील असतात. त्याच पदाधिकाऱ्यांना आता आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करावा लागणार असल्याने त्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com