Raigad Politics : तटकरेंचा शिंदेच्या लढवय्या आमदारावर कडक प्रहार, विश्वासू साथीदाराला फोडला, राष्ट्रवादीचा थोरवेंसह शिवसेनेला धक्का!

Sunil Tatkare Vs Mahendra Thorve : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी रायगड जिल्ह्यात फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाल्याने येथील राजकारण आता चांगलेच तापू लागले आहे.
Raigad Politics
Raigad Politicssarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. माजी जिल्हा परिषद सभापती आणि त्यांचे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची मुंबईत भेट घेतली.

  2. दोघेही लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

  3. या घडामोडीमुळे कर्जत-खालापूर तालुक्यात शिंदे गट आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या वर्चस्वाला धक्का बसणार आहे.

Raigad News : आगामी स्थानिकच्या आधी रायगडमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून महाविकास आघाडीतील पक्षांना फोडण्याचे राजकारण आता महायुतीतील मित्र पक्षांपर्यंत येवून पोहचले आहे. महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील वाद विकोपाला गेला असून दोन्ही पक्षांकडून एकमेकांची ताकद कमी केली जात आहे. पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना गळाला लावले जात आहे. यामुळे महायुतीतच फूट पडल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

अशातच तेथील नगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकींचा देखील आता बिगूल वाजला असून पक्ष फोडाफोडीस वेग आला आहे. नुतकताच मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची शिंदेंच्या शिवसेनेचे नेते तथा आमदार महेंद्र थोरवे यांच्या निष्ठावंतांने भेट घेतल्याचे समोर आले आहे. ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असून हा प्रवेश झाल्यास कर्जत खालापूर तालुक्यासह जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेसह थोरवेंच्या साम्राज्याला धक्का बसणार आहे.

माजी जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती पुंडलिक तथा बंधू पाटील यांच्यासह त्यांचे पूत्र तथा शिवसेनेचे कर्जत खालापूर तालुक्याचे संघटक पंकज पाटील हे आमदार थोरवे यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू मानले जातात. पण आगामी स्थानिकच्या आधीच येथे राष्ट्रवादीने अशी काही जादूची छडी फिरवली की अनेक वर्ष सोबत असणाऱ्या पाटील पिता पुत्रांनी थोरवेंची साथ सोडली आहे. ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे आता जिल्ह्यात चर्चा आहे. त्यामुळे होवू घातलेल्या जिल्ह्यातील नगरपरिषदा आणि नगरापालिकांच्या निवडणुकीत आता रंगल आली आहे.

Raigad Politics
Raigad Politics : आगामी निवडणुकीसाठी महायुतीतच जोरदार रस्सीखेच; इच्छुकांना आर्थिक बाजूची तयारीही करावी लागणार

पाटील पिता पुत्रांचा गुरूवारीच राष्ट्रवादीत प्रवेश होणार होता. मात्र तो काही तांत्रिक कारणांनी रखडला. यानंतरच त्या दोघांनी मुंबईत जावून तटकरे यांची भेट घेतली. ज्याची आता जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेचे कर्जत खालापूर तालुक्याचे संघटक पंकज पाटील हे आमदार थोरवे यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू मानले जातात. तर बंधू पाटीलही शिंदेंच्या शिवसेनेत सक्रीय नेते आहेत.

त्यांनी नुकताच पार पडलेल्या विधानसभेसह आता होणार्‍या नगरपरिषदा आणि नगरापालिकांच्या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचे काम करत होते. पण त्यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा देत स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला आहे. ते तटकरे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतानाच अर्थ व बांधकाम विभागाचे सभापती होते. पण काही कारणांमुळे ते मधल्या काळात सक्रीय राजकारणापासून अलिप्त होते. पण आता ते पुन्हा एकदा राष्ट्रवादीत प्रवेश करत असून त्यांची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीत वर्णी लागण्याची शक्यता आहे.

तटकरेंसह जिल्हाध्यक्ष घारेंचा थोरवेंना धक्का

रायगडमध्ये शिवसेना आमदारांनी अनेकदा तटकरेंसह जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांना डिवचले आहे. त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यात आमदार महेंद्र थोरवेही मागे नाहीत. पण आता पाटील पिता-पुत्रांचा एकाच वेळी राष्ट्रवादीत प्रवेश करवून आमदार महेंद्र थोरवे यांना तटकरेंसह घारे यांनी जोरदार धक्का दिल्याचे बोलले जात आहे. या प्रवेशामुळे आगामी स्थानिकच्या तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेला धक्का बसला असून राष्ट्रवादीची ताकद वाढल्याचे आता बोलले जात आहे. तसेच या प्रवेशावरून तटकरे यांनी, पाटील यांच्या प्रवेशाचे आपण मन:पूर्वक स्वागत करत असून या प्रवेशामुळे राष्ट्रवादीच्या पक्षसंघटनेस अधिक बळ मिळेल, असे म्हटलं आहे.

Raigad Politics
Raigad NCP Politics : निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा शिंदेंच्या शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का; आधी ठाकरेंशी युती केली अन् आता बडा नेता गळाला लावला

FAQs :

1. पुंडलिक पाटील आणि पंकज पाटील यांनी कोणाची भेट घेतली?
दोघांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची मुंबईत भेट घेतली.

2. पाटील पिता-पुत्र कोणत्या पक्षात प्रवेश करणार आहेत?
ते राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) मध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत आहेत.

3. या प्रवेशामुळे कोणत्या नेत्याला धक्का बसला आहे?
शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या राजकीय वर्चस्वाला धक्का बसला आहे.

4. हा प्रवेश कोणत्या तालुक्यातील राजकारणावर परिणाम करेल?
हा प्रवेश कर्जत-खालापूर तालुक्यातील राजकीय समीकरण बदलू शकतो.

5. या भेटीचे राजकीय महत्त्व काय आहे?
नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट राष्ट्रवादीच्या ताकदीत वाढ करणारी ठरत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com