
Mahavikas Aaghadi : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे यांनी महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला आहे. "हा माझा शेवटचा रामराम" असे म्हणत महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा त्यांनी केली. म्हात्रे यांचा पनवेल, उरण भागात वैयक्तिक जनाधार मोठा असल्याने त्याचा फटका नक्कीच महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उरण मतदारसंघातून म्हात्रे यांचे पुत्र प्रीतम म्हात्रे यांचा अवघ्या 6 हजार मतांनी पराभव झाला होता. त्यांना जवळपास 88 हजार मते पडली होती. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मनोहर भोईर यांनी इथे तिसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. तेव्हापासूनच त्यांच्या मनात महाविकास आघाडीच्या मैत्रीबाबत आणि कामबाबत अनेक प्रश्न घर करून होते.
महाविकास आघाडीतील समन्वयाचा अभाव, सहयोगी पक्षांच्या कुरघोड्या आणि स्थानिक पातळीवर घेतल्या गेलेल्या निर्णयांमध्ये शेकापच्या कार्यकर्त्यांना डावलल्याची भावना या सर्व बाबींमुळे म्हात्रे नाराज होते. याच नाराजीवर चर्चा करण्यासाठी त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यात म्हात्रे यांनी महाविकास आघाडीपासून दूर जाण्याचा निर्णय जाहीर केला.
म्हात्रे म्हणाले की, महाविकास आघाडीत मी राहूच शकत नाही. माझे विचार, माझी कार्यपद्धती आणि जनतेप्रती असलेल्या जबाबदारीशी आघाडीची धोरण सुसंगत नाहीत. त्यांच्या या भूमिकेमुळे उपस्थित अनेक पदाधिकाऱ्यांनीही एकमुखाने महाविकास आघाडीपासून दूर राहण्याचा निर्णयघेतला आहे. मात्र त्याचवेळी शेकापचे काम करणारा असा निर्धारही म्हात्रेंसह सर्वांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.