

खेड नगरपरिषदेत भाजप आणि शिवसेना समोरासमोर उभे ठाकल्याने महायुतीत वाद निर्माण झाला होता.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सत्ता वाटपाचा फॉर्म्युला जाहीर करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.
या फॉर्म्युल्यानुसार वैभव खेडेकरांच्या पत्नीला अर्ज मागे घ्यावा लागणार असून, निवडून आल्यास त्यांना महत्वाचे पद मिळण्याची शक्यता आहे.
Khed Nagarparishad Election : मिनी विधानसभेची निवडणूक म्हणून ओळखल्या नगर परिषदेच्या निवडणुकीवरून राज्यात जोरदार राजकीय हाचलाची सुरू झाल्या आहेत. महायुतीतच आता नवा राजकीय संघर्ष पाहायला मिळत असून कोकणातही वाद उफाळून समोर आला आहे. जिल्ह्यातल्या खेड नगर परिषदेमध्ये शिवसेनेंन भाजपवर कुरघोडी करत फक्त 3 जागा दिल्याने येथे नाराजी दिसून आली होती. दरम्यान भाजप नेते वैभव खेडेकर यांनी खेळी करत शिवसेनेविरोधात नगराध्यक्षपदाचा उमेदवार दिला. ज्यानंतर जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले होते. पण आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जिल्ह्यातच येवून युतीची घोषणा करण्यासह जागा वाटपांचा फॉर्म्युला सांगितल्याने खेडामधील वादावरही तोडगा निघाला आहे. पण यामुळे वैभव खेडेकर यांची गोची झाल्याचे बोलले जात आहे. त्यांना आपल्या पत्नी वैभवी खेडेकर यांचा उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागणार आहे. पण यानंतरही त्यांच्या पत्नीला भाजपकडून महत्वाचे पद मिळण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच खेडमध्ये तापमान वाढले होते. येथे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसाच्या आधी युतीची घोषणा झाली. शिवेसेनेनं माधवी बुटाला यांची महायुतीच्या उमेदवार म्हणून घोषणा करत उमेदवारी अर्जही भरला. तर भाजपच्या वाट्याला अवघ्या तीन जागा सोडल्या. ज्यामुळे नाराज झालेल्या भाजपने शिवसेनेविरोधात बंडखोरी करत नगराध्यक्षपदाचा उमेदवार दिला.
भाजपने वैभव खेडेकर यांना पुढे करत त्यांची पत्नी वैभवी खेडेकर यांना अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरवले. एवढंच नाही तर काही प्रभागात शिवसेनेच्या उमेदवारांविरोधातच उमेदवार उभे केले. त्यामुले येथे वैभव खेडेकर विरुद्ध योगेश कदम असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. तसेच येथे युतीतीतच दोस्तीत कुस्ती लागण्याची शक्यता वर्तवली जात होती.
पण खेडसह जिल्ह्यात उद्भवलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भाजपचे माजी आमदार विनय नातू यांची मुंबईत भेट घेवून यावर चर्चा केली. त्यानंतर जिल्ह्यात याबाबत चर्चा करत बैठक घेतली. यानंतर थेट भाजपचे प्रदेशाध्यक्षांनाच जिल्ह्यात आणत महायुतीचा मेळावा घेतला. तर महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युलाही ठरवण्यात आला.
रत्नागिरीत सत्तेचा फॉर्म्युला ठरत जिथे भाजपचा नगराध्यक्ष तिथे शिवसेनेचा उपनराध्यक्ष आणि काही समित्या दिल्या जातील. तर जिथे शिवसेनेचा नगराध्यक्ष आहे, तिथे भाजपला उपनगराध्यक्ष आणि इतर जबाबदाऱ्यांमध्ये समान वाटा दिला जाईल, अशी घोषणा केली आहे.
तसेच आदेश आल्यानंतर माघारी घेण्याची तयारी ठेवा अन्यथा पक्षाकडून कारवाई केली जाईल अशी तंबीही देण्यात आली आहे. या तंबीनंतर आता खेडेकर यांनी यू-टर्न घेत नरमाईची भूमिका घेतली आहे. तसेच त्यांनी पत्नी वैभवी खेडेकर यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
दरम्यान या फार्म्युल्यानुसार खेडेकर यांच्या पत्नीला मोठी संधी मिळणार असून त्या नगरसेवक म्हणून निवडून आल्यास त्यांना भाजप कोट्यातली उपनगराध्यक्ष किंवा एखाद्या समितीवर नियुक्तीची संधी मिळू शकते. यामुळे सध्या युद्धात हरले पण तहात जिंकले अशी खेडेकर यांच्याबाबत चर्चा सुरू आहे.
FAQs :
भाजप आणि शिवसेना दोघेही नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याने महायुतीत तणाव निर्माण झाला.
जिथे भाजपचा नगराध्यक्ष, तिथे शिवसेनेचा उपनगराध्यक्ष आणि उलट ठिकाणी भाजपला उपनगराध्यक्ष देण्याचे जाहीर केले.
नवीन महायुतीच्या सत्ता-वाटप फॉर्म्युल्यानुसार पक्षाचे अधिकृत उमेदवारी बदलावी लागते.
त्या निवडून आल्या तर त्यांना भाजप कोट्यातील महत्वाचे पद मिळण्याची शक्यता आहे.
होय, मोठ्या प्रमाणात तणाव कमी झाला असून युतीचे समीकरण स्थिर झाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.