Sindhudurga zp Election : 6 वर्षांसाठी हकालपट्टी करणाऱ्या नितेश राणेंना धक्का देत विजयी; मायकल डिसोझांकडून भाजपच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव

Sindhudurga zp Election 2026 : जिल्हा परिषद निवडणुकीत तळकोकणात महायुतीला मोठे यश मिळाले आहे. पण काही ठिकाणी अपक्षांनी भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांना पराभवाचा धक्काल दिला आहे.
Sindhudurga zp Election 2026
Sindhudurga zp Election 2026sarkarnama
Published on
Updated on
Summary
  • कोलगाव जिल्हा परिषद गटातून भाजपाच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव झाला आहे.

  • अपक्ष उमेदवार मायकल डिसोझा यांनी भाजपाचे महेश सारंग यांचा पराभव करत विजय मिळवला.

  • या निकालामुळे स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचे चित्र आहे.

Sindhudurga News : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात भाजपने 50 सदस्यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपने 27 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. शिवसेनेला 14 जागांवर समाधान मानावे लागले आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला केवळ 3 जागा मिळाल्या असून 6 अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवत महायुतीलाच धक्का दिला आहे.

यात सर्वाधिक लक्षवेधक निकाल ठरला तो मायकल डिसोझा यांचा. कोलगाव गटात अपक्ष उमेदवार मायकल डिसोझा यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपमधून बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला होता. यामुळे त्यांची ६ वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली होती. डिसोझा यांनी भाजपचे अधिकृत उमेदवार महेश सारंग यांचा पराभव केला आहे. हा निकाल स्थानिक राजकारणात कलाटणी देणारा ठरत आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपमध्ये अंतर्गत नाराजी उफाळून आली होती. अनेकांनी पक्षाविरोधात थेट भूमिका घेत बंडखोरी करत उमेदवारी अर्ज घेतले होते. तसेच काहींनी थेट अर्ज दाखल करत अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी केली होती. तसेच विरोधी उमेदवारांना पाठिंबाही दिली होता.

Sindhudurga zp Election 2026
BJP defeat : वारं फिरलंच नाही! महापालिकेत ऐतिहासिक विजय मिळविलेल्या भाजपला ZP निवडणुकीत दारूण पराभव

यामुळे महायुतीसह भाजप उमेदवारांपुढे आव्हान निर्माण झाले होते. यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी जिल्ह्यात २३ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर कारवाईचा बडगा उगारला होता. या सगळ्यांना ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले होते. ज्यात मायकल डिसोझांसह राजेंद्र म्हापसेकर, शर्वाणी गावंकर, रुपेश पावसकर आणि योगेश तावडें सारख्या प्रमुख नावांचा समावेश होते. या कारवाईनंतरही मायकल डिसोझा यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि आता ते विजयी झाले आहेत.

दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकीत काही गटांत उमेदवार बिनविरोध निवडले गेले आहेत. त्यांची यादी पुढीलप्रमाणे

खारेपाटण – प्राची इस्वालकर (भाजप)

बांदा – प्रमोद कामत (भाजप)

जाणवली – रुहिता तांबे (शिंदे शिवसेना)

पडेल – सुयोगी घाडी (भाजप)

बापर्डे – अवनी तेली (भाजप)

पोंगुर्ले – अनुराधा नारकर (भाजप)

किंजवडे – सावी लोके (भाजप)

Sindhudurga zp Election 2026
BJP Defeated : भाजपचा सपाटून पराभव, महापौरपदी अजीव पाटील; उपमहापौरपदी लोपीस; ठाकूरांचे सोशल इंजिनिअरिंग!

FAQs :

1. कोलगाव गटातून कोण विजयी झाले?
अपक्ष उमेदवार मायकल डिसोझा यांनी विजय मिळवला.

2. भाजपाचा कोणता उमेदवार पराभूत झाला?
भाजपाचे अधिकृत उमेदवार महेश सारंग पराभूत झाले.

3. हा निकाल महत्त्वाचा का मानला जात आहे?
कारण भाजपाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या गटात अपक्षाने विजय मिळवला आहे.

4. या निकालाचा स्थानिक राजकारणावर काय परिणाम होईल?
स्थानिक राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

5. ही निवडणूक कोणत्या स्तरावरची होती?
ही जिल्हा परिषद निवडणूक होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com