Khed News: आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ठाकरे गटाने जोमाने तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवरच आमदार आदित्य ठाकरे सध्या दोनदिवसीय कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते पक्ष संघटनेचा आढावा घेत शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत. मात्र, याचवेळी आदित्य ठाकरेंनी संजय कदमांचा भावी आमदार म्हणून उल्लेख केल्यामुळे कदमांचे तिकीट कन्फर्म झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
कोकणातील वेगवेगळ्या गावांत जाऊन ठाकरे आपल्या पक्षाची मोट बांधत आहेत. तसेच आपल्या कार्यकर्त्यांसह नागरिकांशी संवाद साधत आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांकडे ते बैठका घेत आहेत. त्यांचा हा दौरा आगामी निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आदित्य ठाकरेंनी खेडमध्ये माजी आमदार संजय कदम यांच्या घरी जाऊन खळा बैठक घेतली. या वेळी आदित्य ठाकरे, अनंत गीते यांनी कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले, पण यावेळीच बोलताना आदित्य ठाकरे आणि गीते यांनी कदम यांचा भावी आमदार म्हणून उल्लेख केला. त्यांच्या या विधानामुळे कार्यकर्त्यांचा हुरूप आणखी वाढला.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे गट कोकणात नव्याने राजकीय फेरजुळणी करत आहे. काही महिन्यांपूर्वीच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खेड येथील गोळीबार मैदानावर मोठी सभा झाली होती. याच सभेत संजय कदमांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला होता.
आता आदित्य ठाकरेंचे कोकण दौरे वाढल्यामुळे आगामी निवडणुकांसाठी ठाकरे गटाने मास्टर प्लॅन आखल्याचीही चर्चा रंगली असून, शिंदे गटातील रामदास कदमांची सद्दी संपवण्यासाठी संजय कदमांचं तिकीट कन्फर्म केल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.