Maharashtra Politics News : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आतापासूनच चुरस वाढली आहे. तिरंगी लढत स्पष्ट होत असताना आता चौथ्या उमेदवाराने या मतदारसंघावार दावा केला आहे. महायुतीत घटक पक्ष असलेल्या महाराष्ट्र क्रांती सेनेच्या सुरेश दादा पाटील यांनी हातकणंगले मतदारसंघातून लढण्याचा निर्धार केला आहे. आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या पाच महिन्यांवर आली असताना या मतदारसंघात उमेदवारीवरून चुरस वाढली आहे.
महायुतीचा घटक पक्ष असल्याने मी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपकडे उमेदवारीची मागणी करणार आहे, असे महाराष्ट्र क्रांती सेनेचे प्रमुख सुरेश पाटील यांनी जाहीर केले आहे. आतापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, खासदार धैर्यशील माने, राहुल आवाडे, रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी या मतदारसंघावर दावा केला आहे.
यापूर्वीही २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सुरेश पाटील यांनी मतदारसंघात राजू शेट्टी, कल्लाप्पा अण्णा आवाडे यांच्या विरोधात मराठा क्रांती संघटनेच्या वतीने निवडणूक लढवली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी तयारी सुरू केली आहे. या वेळी शेट्टी यांना त्याचा फायदा झाला होता.
महायुतीचा घटक पक्ष या नात्याने प्रथम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उमेदवारीची मागणी करणार आहे. तेथून उमेदवारी मिळेल, अशी आशा आहे. पण प्रतिसाद न मिळाल्यास आमच्या महाराष्ट्र क्रांती सेनेच्या वतीने निवडणूक लढवण्याचे निश्चित केले असल्याचे सुरेश पाटील यांनी सांगितले.
तीन मतदारसंघांत निवडणूक लढणार?
भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास महाराष्ट्र क्रांती सेना हातकणंगले, जळगाव व रायगड या तीन मतदारसंघांत निवडणूक लढवणार असल्याचे सुरेश दादा पाटील यांनी जाहीर केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.