farmers crisis : शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत? शिंदेंच्या शिलेदाराचा सरकारला घरचा आहेर; थेट सुनावलं, 'तर शेतकरी आत्महत्या...'

ramdas kadam criticism Mahayuti Over konkan mango cashew farmers crisis compensation controversy : राज्य सरकारने आंबा बागायतदार शेतकऱ्यांना हेक्टरी २२ हजार रूपयांची मदत जाहीर करून आंबा बागायतदार शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसून वाऱ्यावर सोडले आहे, अशी टीका होताना दिसत आहे.
Eknath shinde & devendra Fadanvis
Eknath shinde & devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. कोकणातील आंबा व काजू शेतकरी अस्मानी संकट आणि निकृष्ट खतांमुळे मोठ्या अडचणीत आले आहेत.

  2. सरकारने जाहीर केलेली हेक्टरी 22 हजारांची मदत अपुरी असल्याची टीका राजू शेट्टी आणि रामदास कदम यांनी केली आहे.

  3. या मुद्द्यावरून राजकारण तापले असून मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात येणार आहे.

Kokan farmers crisis : कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकरी अस्मानी संकट आणि निकृष्ट खते व कीटकनाशकांमुळे मेटाकुटीला आला आहे. बागायतदारांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी मदतीची मागणी सरकारकडे केली आहे. पण सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी २२ हजार रूपयांची मदत जाहीर केली आहे. यावरून आंबा उत्पादक शेतकऱ्यांसह शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी टीकेची झोड उठवली आहे. आता तर मुंबईत मोर्चाची घोषणा करण्यात येणार आहे. यावरून राजकारण तापलेलं असतानाच शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी सरकारने जाहीर केलेल्या तुटपुंज्या मदतीचा निर्णय मागे घ्यावा. कोकणातील शेतकऱ्याच्या बाबतीत सहानुभूतीपूर्वक निर्णय घेऊन भरीव मदत करा, अशी मागणी करत सरकारला घरचा आहेर दिला आहे.

चालू वर्षी कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकरी अस्मानी संकटात सापडला आहे. त्यातच आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना औषध कंपन्यांनी बनावट आणि निकृष्ट खते व कीटकनाशके पुरविल्याने बागायतदारांचे अतोनात नुकसान झाले आहे. यावरून गेल्या महिन्याभरापासून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदार शेतकरी न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरले आहेत. शेतकरी मेळावा, मोर्चे, रास्ता रोको या माध्यमातून शेतकरी आंबा बागायतदार शेतकऱ्यांना हेक्टरी पाच लाख रूपये मदतीच्या मागणीसाठी सातत्याने आंदोलने करत आहेत.

पण राज्य सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी २२ हजार रूपयांची मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसून वाऱ्यावर सोडले. यावरून आंबा उत्पादक शेतकऱ्यांसह शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी टीकेची झोड उठवली आहे. आता तर मुंबईत मोर्चाची घोषणा करण्यात येणार आहे. यावरून राजकारण तापलेलं आहे. अशातच शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांनी सरकारकडे शेतकऱ्याच्या बाबतीत सहानुभूतीपूर्वक निर्णय घ्यावा, भरीव मदत करावी अशी मागणी केली आहे.

Eknath shinde & devendra Fadanvis
Ramdas Kadam : रामदास कदमांवर अब्रुनुकसानीची टांगती तलवार; ठाकरेंच्या शिलेदारानं सगळंच काढलं

याचवेळी त्यांनी, सरकारला घरचा आहेर देताना कोकणातल्या माणसाची उपजीविका हापूस आंब्यावर चालते. कधी नव्हे ते यंदा पाच टक्केही आंबा शेतकऱ्याच्या हातात शिल्लक नाही. यामुळे ते मदतीची हाक देत आहेत. अशा वेळी जर भरीव मदत करत हातभार लावला नाही तर शेतकरी आत्महत्या करेल अशी भीती कदम यांनी व्यक्त केली आहे.

कदम यांनी सरकारला थेट सुनावत 20 आणि 25 हजारात काही होत नाही, असेही म्हटले आहे. तर कोकणातला शेतकरी स्वाभिमानी असून तो कधी आत्महत्या करत नाही, कधी कर्जमाफी मागत नाही. पण आता तशी परिस्थिती राहिली नसल्याने कोकणातला शेतकरी जगेल अशी मदत करा अशी मागणी सरकारकडे केली आहे.

सरकारकडे पैसा का नाही?

दरम्यान या तुटपुंज्या मदतीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी देखील सरकारचा खरपूस समाचार घेतला आहे. यावेळी कोकणातील शेतकऱ्यांना संघटीत करून १८ एप्रिल रोजी रत्नागिरी येथे शेतकरी मेळावा घेणार आहे. तसेच मुंबईत मोर्चाची घोषणा करण्यात येणार आहे. या मोर्चाद्वारे राज्य सरकारला गुडघे टेकायला भाग पाडू असा इशारा आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी दिला आहे. तर शेट्टी म्हणाले, "राज्य सरकारने आंबा बागायतदार शेतकऱ्यांना हेक्टरी २२ हजार रूपयांची मदत जाहीर करून आंबा बागायतदार शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसून वाऱ्यावर सोडले.

एकीकडे नाशिकच्या कुंभमेळ्याचे बजेट दोन महिन्यांत २५ हजार कोटींवरून थेट ३५ हजार कोटींवर नेले जाते, गरजेचे नसलेल्या 'शक्तीपीठ महामार्गा'साठी ८६ हजार कोटींवरून १ लाख कोटींपर्यंत तिजोरी खुली केली जाते, मग महाराष्ट्राचा कणा असलेल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यासाठी सरकारकडे पैसा का नाही. मुख्यमंत्र्यांना मोठ्या प्रकल्पातून हजारो कोटी रूपयाचा ढपला पाडण्यासाठी लाखो कोटी उपलब्ध होतात, मात्र घाम गाळणाऱ्या बागायतदाराला हेक्टरी फक्त २२ हजार रुपये ही मदतीची रक्कम म्हणजे 'उंटाच्या तोंडात जिरे' अशी अवस्था आहे.

बागायतदारांचे अतोनात नुकसान

आज एका हेक्टरमध्ये आंबा बागेची मशागत, कीटकनाशकांची फवारणी आणि मजुरीचा खर्च लाखांच्या घरात जातो. बदलत्या हवामानामुळे मोहोर गळणे आणि फळगळतीमुळे बागायतदारांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशा स्थितीत २२ हजार रुपये देऊन सरकार नेमके काय साध्य करू पाहत आहे? या रकमेत एका झाडाचा वार्षिक देखभाल खर्चही निघत नाही, हे सरकारला समजत नाही का?, असे शेट्टी यांनी सांगितले.

Eknath shinde & devendra Fadanvis
Ramdas Kadam son controversy : मुलगा अडचणीत येताच आक्रमक रामदास कदमांची तलवार म्यान: बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूप्रकरणात दोन पावलं मागे

FAQs :

1. कोकणातील शेतकरी का अडचणीत आहेत?
अस्मानी संकट, खराब हवामान आणि निकृष्ट खते व कीटकनाशकांमुळे नुकसान झाले आहे.

2. सरकारने किती मदत जाहीर केली आहे?
सरकारने हेक्टरी 22 हजार रुपये मदत जाहीर केली आहे.

3. कोणत्या नेत्यांनी यावर टीका केली आहे?
राजू शेट्टी आणि रामदास कदम यांनी मदत अपुरी असल्याचे म्हटले आहे.

4. पुढे काय होणार आहे?
मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात येणार आहे.

5. शेतकऱ्यांची मुख्य मागणी काय आहे?
तुटपुंजी मदत वाढवून भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com