Narayan Rane News : 'मला निवडून द्या कोकणचा कॅलिफोर्निया करतो', नारायण राणेंचं ठरलं

Ratnagiri–Sindhudurg LokSabha : देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नारायण राणे जगात कुठेही असले तरी त्यांच्या डोळ्यासमोर कोकणच असते.आमचे सरकार हे विकसित, मजबूत सरकार आहे.
Narayan Rane
Narayan Ranesarkarnama

Loksabha Election : रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत अशी लढत होत आहे. नारायण राणेंच्या प्रचारासाठी रत्नागिरीत महायुतीची जाहीर सभा झाली. या सभेत नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी 400 खासदार निवडून देणार, असा विश्वास उदय सामंत uday samant यांनी व्यक्त केला तर नारायण राणे यांनी कोकणचा कॅलिफोर्निया करणार असल्याचा दावा केला.

Narayan Rane
Rahul Gandhi News : राहुल गांधी अमेठीतून लढणार? स्वागताची जोरदार तयारी सुरू

'मला जर निवडून दिलं तर कोकणाचा कॅलिफोर्निया करणार. भविष्यात मोठ मोठे उद्योगधंदे कोकणात आणणार. मी कुठेही असलो तरी मी कोकणाचा विकास करेन.' असे नारायण राणे म्हणाले. तसेच जगात भारताचे नाव विकसती राष्ट्र म्हणून होत असून 2030 ला देश तिसऱ्या क्रमांकावर येणार, असा दावा देखील नारायण राणे Narayan Rane यांनी केला.

देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis म्हणाले की, नारायण राणे जगात कुठेही असले तरी त्यांच्या डोळ्यासमोर कोकणच असते.आमचे सरकार हे विकसित, मजबूत सरकार आहे. आधीच्या वसुली सरकारमुळे विकास होत नव्हता. मात्र आता विकासाची कामे सुरू आहेत. त्यामुळे राणे कोकणात मोठ्या प्रमाणात विकासाची गंगा आणतील.

सावंत बंधू प्रचारात सक्रिय

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात नारायण राणे यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली. या जागेवरून निवडणूक लढण्यास किरण सामंत शिवसेनेकडून इच्छुक होते. राणे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मंत्री उदय सामंत आणि इच्छुक उमेदवार किरण सामंत दोघे ही राणेंच्या प्रचारात सक्रिय आहेत.

Narayan Rane
Narendra Modi News : पंतप्रधान मोदींचे 'एसपीजी' पुण्यात दाखल; पुण्यात असणार मोदींचा मुक्काम !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com