Badlapur Case : बदलापुरच्या पीडितेबाबत केसरकरांनी घोषणा केली, पण... आता ३२ हजारांच्या शुल्कासाठी शिक्षण धोक्यात

Badlapur Assault Victim Education School Fee Issue : दोन वर्षांपूर्वी राज्याला हादरवणारी घटना बदलापुरात घडली होती. पण आता अत्याचारातील पीडित मुलगीच अडचणीत आल्याचे दिसत आहे.
Badlapur Assault Case; Deepak Kesarkar
Badlapur Assault Case; Deepak Kesarkarsarkarnama
Published on
Updated on
Summary
  • पीडित मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारने अद्याप घेतलेली नाही.

  • शाळेची फी न भरल्यामुळे प्रवेशावर प्रश्नचिन्ह.

  • ठाणे शिक्षण विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई नाही.

Thane News : दोन वर्षांपूर्वी राज्याला हादरवणाऱ्या अत्याचारातील पीडित मुलीची महाराष्ट्र सरकारने अद्याप शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली नसल्याचे उघडकीस आले असून तिचे भवितव्य अडचणीत आले आहे. पालकांच्या म्हणण्यानुसार, सरकारने पीडितेची शाळा बदलून तिचा कल्याणच्या एका खासगी शाळेतील शिशू वर्गात प्रवेश मिळवून दिला. आता पहिलीसाठी प्रवेश घेण्यासाठी सरकारकडून कोणतेच निर्देश नाहीत. ठाणे शिक्षण विभागातही याबाबत कोणतीही हालचाल नाही. परिणामी, गेल्यावर्षीची ३२ हजारांचे शुल्क भरले नाही म्हणून नियमानुसार शाळेने तगादा लावला आहे.

पण पीडिताच्या पालकांची परिस्थिती नाजूक आहे. पीडित मुलीच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी राज्य सरकारने स्वीकारल्याची घोषणा तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली होती. याशिवाय पालकांना १० लाखांची मदत करीत, त्यांना शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी सहकार्य केले जाईल, असेही आश्वासन दिले होते.

मात्र दोन वर्षांचा काळ लोटला तरी अद्यापही शिक्षण विभागाला जाग आलेली नाही. याबाबत विचारणा करण्यासाठी गेलो असता, शिक्षणाधिकाऱ्यांनी साधी भेटही दिली नसल्याचे पीडिताच्या वडिलांनी ‘सकाळ’ला सांगितले. दरम्यान, मनसेचे संदीप पाचंगे यांनी गतवर्षाची ३२ हजार रुपयांचे थकीत शुल्क भरले.

Badlapur Assault Case; Deepak Kesarkar
Deepak Kesarkar: "अशोक खरात केसरकरांचं शिक्षण खातं चालवत होता" राऊतांच्या आरोपांना केसरकरांचं उत्तर; नेमकं काय घडलं होतं? स्पष्टच सांगितलं

त्या विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला नाही. केवळ शुल्कासंदर्भात विचारणा केली होती. शिक्षण विभागाकडून तिच्या शालेय शुल्काबाबत पाठपुरावा सुरू आहे. तिचे नुकसान होऊ देणार नाही. - बाळासाहेब रक्षे, शिक्षणाधिकारी, जि.प. ठाणे

Badlapur Assault Case; Deepak Kesarkar
Deepak Kesarkar : दीपक केसरकर यांना दुहेरी धक्का : होमग्राऊंड हातातून निसटले अन् नितेश राणेंनी सावंतवाडीत उभे केले नवे सत्ताकेंद्र

FAQs :

1. हा प्रकार कशाबाबत आहे
पीडित मुलीच्या शिक्षणाच्या जबाबदारीबाबत आहे

2. सरकारने काय केलं आहे
शाळा बदलून दिली पण पुढील शिक्षणासाठी उपाय केले नाहीत

3. सध्या समस्या काय आहे
शाळेची फी न भरल्याने प्रवेश अडचणीत

4. शिक्षण विभागाची भूमिका काय आहे
ठाणे शिक्षण विभागाने अजून हालचाल केलेली नाही

5. पुढे काय होऊ शकते
मुलीच्या शिक्षणावर परिणाम होण्याची शक्यता आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com