Zilla Parishad Election : सुप्रीम कोर्टातून महाराष्ट्रासाठी मोठी अपडेट; नाशिक, बीड, नागपूरसह 20 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे फटाके दिवाळीतच?

Zilla Parishad Election: महाराष्ट्रातील उर्वरित २० जिल्हा परिषद निवडणुकांसंदर्भात आज सुनावणी पार पडली.
Supreme Court
Supreme CourtSarkarnama
Published on
Updated on

Zilla Parishad Election: राज्यातील १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. त्यानंतर सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलेल्या उर्वरित २० जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? याची सर्वांना उत्सुकता होती. ही उत्सुकता आणखी ताणली गेली आहे. कारण आता या निवडणुका थेट पावसाळ्यानंतरच होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. यासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली.

Supreme Court
IAS Officer: मोठी बातमी! अधिवेशनकाळात महाराष्ट्रातील बड्या IAS अधिकाऱ्याच्या निलंबनामुळं खळबळ; कोण आहे हा अधिकारी? जाणून घ्या

सुप्रीम कोर्टात काय घडलं?

महाराष्ट्रातील उर्वरित २० जिल्हा परिषद निवडणुकांसंदर्भात आज सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टानं या निवडणुकांसंदर्भात २१ आणि २२ जुलै रोजी अंतिम सुनावणी घेण्यात येईल असं निश्चित केलं. त्यामुळं आता उर्वरित उर्वरीत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांबाबतची सुनावणी जुलै महिन्यात होईल. या सुनावणीत जर निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला तर त्यानंतरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल.

Supreme Court
Anna Hazare: कथित मद्य घोटाळ्यातून केजरीवालांच्या निर्दोष सुटकेवर अण्णा हजारेंचं मोठं विधान; म्हणाले, "आधी मी बोललो कारण..."

पावसाळ्यानंतरच निवडणुका का?

पण शक्यतो पावसाळ्यात कुठल्याही प्रकारच्या सार्वत्रिक निवडणुका घेणं निवडणूक आयोगाकडून टाळलं जातं. कारण पावसामुळं निवडणूक प्रक्रिया राबवणं हे कठीण काम असतं. जरी निवडणुका घेतल्या तरी त्याला मतदारांचा अल्प प्रतिसाद मिळू शकतो, त्यामुळं पावसाळा पार पडल्यानंतरच शक्यतो निवडणुकांचा कार्यक्रम ठरवला जातो.

Supreme Court
एकमेव महिला आरोपी, 5 महिने तुरुंगात... पक्ष गेला, आमदारकीही पणाला...

कधी होण्याची शक्यता?

त्यामुळं आता खुद्द सुप्रीम कोर्टानंच जुलै महिन्यांत अर्थात चाडेचार महिन्यांनी पावसाळ्यातच याची सुनावणी ठेवल्यानंतर आता या निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com