Malvan Result : मालवणच्या पराभवानंतर नितेश म्हणाले, 'माझ्या विरोधात एकत्र येऊन आघाडी केली, मात्र भाऊ म्हणून...'

Nitesh Rane Vs Nilesh Rane : मालवण नगरपरिषदेच्या निवडणुकीत रंगलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीनंतर आता लागलेल्या निकालात निलेश राणेंनी नितेश राणेंनी धुळ चारली आहे.
Nitesh Rane And Nilesh Rane
Nitesh Rane And Nilesh Ranesarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. मालवण नगरपरिषदेत आमदार निलेश राणेंच्या नेतृत्वाखाली उमेदवारांनी विजय मिळवला आहे.

  2. कणकवलीत पराभव झाला असला तरी विकासासाठी पूर्ण सहकार्य करू, अशी ग्वाही पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.

  3. चारही नगरपरिषदांमध्ये महाविकास आघाडीचा सुफडा साफ झाल्याची टीका नितेश राणेंनी केली.

Sindhudurg News : येथील मालवण नगरपरिषदेमध्ये आमदार निलेश राणेंच्या नेतृत्‍वाखाली उमेदवारांनी विजय मिळवला आहे. त्‍याबद्दल निलेश राणेंचे आम्‍ही अभिनंदन करत आहोत कणकवलीत आमचा पराभव झाला असला तरी आम्‍ही विकासासाठी पूर्ण सहकार्य करणार असल्‍याची ग्‍वाही पालकमंत्री नितेश राणे यांनी आज दिली. तसेच चारही नगरपरिषदांमध्ये महाविकास आघाडीचा सुफडा साफ झाला असल्‍याचीही टीका त्‍यांनी केली.

येथील ओम गणेश निवासस्थानी राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्‍हणाले, आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. भाजपला सावंतवाडी आणि वेंगुर्लेत यश मिळाले. सावंतवाडीत श्रद्धाराजे भोसले तर वेंगुर्लेत राजन गिरप यांनी नगराध्यक्षपद पटकावले. मात्र, मालवणमध्ये ममता वराडकर आणि कणकवलीत संदेश पारकर यांनी नगराध्यक्षपदासाठी विजय मिळवला आहे. या सर्वांचे अभिनंदन. आता निवडणुका संपल्‍या असून शहर विकासासाठी पक्षपात न करता शंभर टक्‍के न्याय देणार आहोत.

ते पुढे म्‍हणाले, मालवण आणि कणकवलीची निवडणूक आमदार निलेश राणेंच्या नेतृत्‍वाखाली जिंकली आहे. यात कणकवलीकरांनी शहरविकास आघाडीच्या नेत्यांच्या आणि संदेश पारकर यांच्या भावनिक आवाहनाला साथ दिली आहे. भाजपचे कार्यकर्ते मालवण आणि कणकवलीत प्रामाणिकपणे लढले. लोकशाहीत लोकमताचा आदर करायचा असतो. कणकवली आणि मालवणमध्ये संघटनात्मक लढाईसाठी पावले उचलू. कणकवलीत शहर विकासासाठी आमदार राणेंच्या शब्दांवर विश्वास टाकून जनतेने निकाल दिला आहे, त्यासाठी मी सहकार्य करायला तयार आहे.

Nitesh Rane And Nilesh Rane
'Narayan Rane यांना पक्षापेक्षा पुत्र महत्वाचे' Vaibhav Naik यांचा राणेंवर आरोप।Nitesh,Nilesh Rane।

मतदार विकले जातात असे आरोप चुकीचे असल्याचे सांगताना त्यांनी पैसे वाटपाच्या आरोपांना आव्हान दिले. भाजपचे कुठे पैसे वाटताना दिसले? ते व्हिडिओ दाखवा, असे ते म्हणाले. कणकवलीत विकास झाला असतानाही पराभव झाला याचे विश्लेषण करू, असेही त्यांनी नमूद केले. मात्र, निलेश राणेंच्या एन्ट्रीमुळे शहरविकास आघाडीला ताकद मिळाली आणि विजय झाला. माझा भाऊ म्हणून निलेश राणेंवर अभिमान वाटतो, असेही ते म्‍हणाले.

दिलेला 'तो'शब्द पाळला

कणकवलीतील जनतेने दिलेला कौल मान्य असल्याचे सांगताना राणे यांनी विरोधी पक्षांच्या आघाडीचा उल्लेख केला. ते म्हणाले, शहरविकास आघाडीने माझ्या विरोधात एकत्र येऊन आघाडी केली. सर्व पक्ष माझ्या विरोधात होते. मात्र, मी निवडणुकीत वातावरण खराब होऊ देणार नाही, असा शब्द दिला होता आणि तो पाळला आहे.

Nitesh Rane And Nilesh Rane
Malvan Cash Seizure : ऐन मतदानाच्या आदल्या रात्री महायुतीत जुंपली! भाजप पदाधिकाऱ्याच्या गाडीत पैसे सापडताच, निलेश राणेंचा पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या
Nitesh Rane And Nilesh Rane
Sindhudurg politics : भावाशी वाद घातला, भाजपला शिंगावर घेतलं, निकालानंतर भगवा फडकताच निलेश राणे भावूक

FAQs :

1. मालवण नगरपरिषद निवडणुकीत कोणाच्या नेतृत्वाखाली विजय मिळाला?
आमदार निलेश राणेंच्या नेतृत्वाखाली उमेदवारांनी विजय मिळवला.

2. नितेश राणेंनी कोणती भूमिका जाहीर केली?
कणकवलीत पराभव झाला असला तरी विकासासाठी पूर्ण सहकार्य करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

3. मविआबाबत नितेश राणेंनी काय म्हटले?
चारही नगरपरिषदांमध्ये महाविकास आघाडीचा सुफडा साफ झाल्याची टीका त्यांनी केली.

4. ही निवडणूक कोणत्या जिल्ह्यात झाली?
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण व कणकवली भागात ही निवडणूक झाली.

5. या निकालाचा राजकीय अर्थ काय आहे?
कोकणात सत्ताधारी आघाडीची पकड मजबूत झाल्याचे संकेत या निकालातून मिळतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com