Mahayuti Melava : देवरा यांचा शिवसेना प्रवेश म्हणजे राहुल गांधींचे अपयश; राणेंचा हल्लाबोल

Konkan News : सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाला विनायक राऊत नावाचा कलंक लागला आहे.
Nitesh Rane
Nitesh RaneSarkarnama
Published on
Updated on

Sindhudurg News : आपल्यासमोर लढण्यासाठी कोण आहे का? आपण ज्यावेळी प्रामाणिकपणे काम करू, तेव्हा पुढच्या निवडणुकीत आमच्याशिवाय कोणीही जिंकू शकत नाही. काँग्रेसचे मिलिंद देवरा यांचा शिवसेना शिंदे गटात झालेला प्रवेश हे राहुल गांधी यांचे अपयश आहे, अशा शब्दांत आमदार नीतेश राणे यांनी देवरा यांच्या पक्षांतरावर भाष्य केले. (Milind Deora's Shiv Sena entry is Rahul Gandhi's failure : Nitesh Rane )

कणकवली येथे महायुतीच्या जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात आमदार राणे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नारायण राणे होते. ते म्हणाले की, भारत देश महासत्ता बनण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करीत आहेत. महायुतीमधील तीन पक्षांची सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठी ताकद आहे. आपल्या सर्वांसाठी २०२४ वर्षे फार महत्त्वाचे आहे. देशात केवळ नरेंद्र मोदी यांचीच गॅरंटी चालते. अयोध्येत राम मंदिर होत आहे, हे आपले भाग्य आहे. मोदींनी काय काम केले, हेच आपण प्रत्येकाला सांगायाचे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nitesh Rane
Solapur Gadda Yatra : सिद्धरामेश्वरांच्या विवाह सोहळ्यास निवडणुकीची किनार...

भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्याग किती करायचा, हे लक्षात घेण्याची गरज आहे. निधीची तडजोड होत नसल्याने काहीजण व्हाया प्रवेश करीत आहेत. भाजपत नाही तर ते शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जातात. देवगड नगरपंचायतीच्या ठाकरे गटाच्या नगराध्यक्षांनी शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, त्यांच्या दालनात आजही उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे फोटो आहेत, मग आम्ही काय समजायचे? शिवसेना जिल्हाप्रमुख आग्रे यांनी ही गोष्ट पाहण्याची गरज आहे, असेही नीतेश राणे यांनी सांगितले.

गेली दहा वर्षे निवडून दिलेल्या खासदाराने काय केले? सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाला विनायक राऊत नावाचा कलंक लागला आहे. कार्यकर्त्यांनी अमिषाला बळी पडू नये. निवडणुकीच्या काळात स्वतः उभा आहे, असे समजून काम केले पाहिजे, असे आवाहनही आमदार राणे यांनी केले.

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे म्हणाले की, सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेचा खासदार सर्वाधिक मतांनी निवडून आणण्यासाठी आपण काम केलं पाहिजे. मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विकास साधण्यासाठी आपण एकत्र काम करुयात.

Nitesh Rane
Daharashiv News : मुलीच्या जन्माचे स्वागत आता लक्ष्मीच्या पावलांनी; सरपंच, उपसरपंचांच्या मानधनातून अनोख्या योजना

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक म्हणाले की, महायुतीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली विकास साधला जाईल.

भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत म्हणाले की, महायुतीमधील प्रत्येक पक्षाला आपली मते आहेत, पक्ष वाढविण्यासाठी प्रत्येकजण काम करत असतो. गेली १० वर्षांत मोदींनी सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेचा उमेदवार सर्वाधिक मताधक्याने निवडून देत मोदींचे हात बळकट करुयात. महायुतीमधील भाजपची मोठ्या भावाची भूमिका आहे, त्यामुळे त्यागाची भावना ठेवावी लागेल.

Nitesh Rane
Pandharpur News : शरद पवार गटाचा मोठा नेता अडचणीत; अभिजित पाटलांसह २१ संचालकांविरोधात राज्य बॅंकेची तक्रार

या वेळी शिक्षण मंत्री दीपक केसरकर, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार राजन तेली, अजित गोगटे, अशोक दळवी, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, कार्याध्यक्ष काका कुडाळकर, महिला शिवसेना जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, महिला आघाडी अध्यक्षा श्वेता कोरगावकर आदींसह महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित होते.

Edited By : Vijay Dudhale

Nitesh Rane
Prithviraj Chavan : महाराष्ट्राच्या राजकारणातील स्ट्रेट फॉरवर्ड नेता : पृथ्वीराज चव्हाण

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com