

Ratnagiri News : ओम राजेनिंबाळकर यांच्यासह 6 खासदारांनी शिवसेनेत प्रवेस केला. यानंतर उद्धव ठाकरे यांच्या आणखी एका वाघाला भाजपने खुली ऑफर दिली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे एकमेव आमदार भास्कर जाधव यांनाच आपल्या गळाला लावण्याची खेळी भाजपने खेळली आहे. विरोधी पक्षनेते पदासाठी इच्छुक असलेल्या भास्कर जाधव यांना भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी खुली ऑफर दिली आहे. त्यांनी, 'भास्कर जाधव, तुमची कोकणाला गरज आहे. तुम्ही आम्हालाही पाहिजे,' असे म्हटले आहे. जठार यांच्या या वक्तव्याने आता राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
चिपळूणमध्ये दिवंगत नेते अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आमदार प्रमोद जठार आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव एकत्र आले होते. या कार्यक्रमात जठार आणि भास्कर जाधव यांनी एकत्र वृक्षारोपण केले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना जठार यांनी भास्कर जाधव यांच्याबाबत हे भाष्य केले. यावेळी दक्षिण रत्नागिरी भाजपचे अध्यक्ष प्रशांत यादव, सहदेव बेटकर आदी उपस्थित होते.
ते म्हणाले की, भास्कर जाधव हे कोकणातील ज्येष्ठ आणि अनुभवी आमदार आहेत. त्यांच्या कार्याचा योग्य सन्मान व्हायला हवा. 'कोकणाला तुमची जशी गरज आहे, तशीच तुम्ही आम्हाला पाहिजे आहात. पण राज्याच्या राजकारणात वेगळे स्थान असणाऱ्या ज्येष्ठ आमदार भास्कर जाधव यांना त्यांच्या पक्षाकडून जे काम द्यायला पाहिजे, ते दिले जात नाही. त्यांचा उपयोग केला जात नाही. त्यांना विरोधी पक्षनेताही करत नाहीत,' असे म्हणत त्यांनी टोला लगावला आहे.
तसेच, यावेळी आमदार जठार यांनी भास्कर जाधव यांची सत्तेत गरज असून, कोकणच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, आता आमदार जठार यांच्या वक्तव्याकडे भाजपची खुली ऑफर अशाच पद्धतीने पाहिले जात आहे. तर या वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या सीजेपी आंदोलनाबाबत बोलताना जठार यांनी आंदोलनात विघातक आणि देशविरोधी प्रवृत्तीच्या लोकांनी घुसखोरी केल्याचा आरोप केला. नीट प्रश्नपत्रिका गैरव्यवहार प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम आहेत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांनी विरोधकांवरही टीका करत, विरोधी पक्षांकडे प्रभावी नेतृत्व उरलेले नसल्यामुळे त्यांना काँग्रेसचा आधार घ्यावा लागत असल्याचा दावा केला. तसेच, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून काँग्रेसने स्वतःचेच राजकीय नुकसान करून घेतल्याचेही प्रमोद जठार यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.