Bhaskar Jadhav : कोकणाच्या राजकीय वर्तुळात खळबळ : भास्कर जाधवांच्या कार्यालयाला भाजप मंत्र्याची अचानक भेट; जंगी स्वागताने नव्या चर्चांना उधाण

Ashish Shelar Visit to Bhaskar Jadhav Chiplun Office : गेल्या काही दिवसांपासून भास्कर जाधव राजकीय वर्तुळात चांगलेच चर्चेत असून आता सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशीष शेलार यांनी त्यांच्या कार्यालयाला भेट दिल्याने नव्या चर्चांना उधाण आले आहे.
Bhaskar Jadhav
Bhaskar Jadhavsarkarnama
Published on
Updated on

Chiplun Political News : सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशीष शेलार यांनी चिपळूण दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे शिवसेनेचे कोकणातील प्रमुख नेते आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आमदार जाधव कार्यालयात नसताना ॲड. शेलार यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सत्कार स्वीकारला.

भाजपवर सातत्याने टीका करणारे आणि कोकणातील भाजपच्या राजकारणाला आक्रमकपणे आव्हान देणारे भास्कर जाधव यांच्या कार्यालयात स्वतः भाजपचे वरिष्ठ नेते आणि मंत्री आशिष शेलार पोहोचल्याने याकडे केवळ औपचारिक सदिच्छा भेट म्हणून पाहिले जात नाही. शेलार यांचे फटाक्यांची आतषबाजी, ढोलताशा पथकाच्या गजरात स्वागत झाले. या स्वागतामागे नेमका संदेश काय, याची चर्चा सुरू झाली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच भाजपच्या कोकणातील अनेक नेत्यांचा भास्कर जाधव यांच्याशी सातत्याने संघर्ष राहिला आहे. अशा परिस्थितीत आशीष शेलार यांनी जाधव यांच्या कार्यालयाला भेट देणे आणि त्यांचे एवढ्या उत्साहात स्वागत होणे, हे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे मानले जात आहे. तसेच स्वतःहून भेट दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Bhaskar Jadhav
Bhaskar Jadhav : राम मंदिरातील देणगी चोरीचा वाद पेटला : भास्कर जाधव आक्रमक; 'हे लोक कलियुगातले सगळ्यात लुटारू'

सदिच्छा भेट चर्चेत...

यापूर्वी हरिभाऊ बागडे विधानसभेचे अध्यक्ष असताना गुहागर दौऱ्यावर आले असताना भास्कर जाधव यांनी त्यांची चिपळूण येथे शासकीय विश्रामगृहावर सदिच्छा भेट घेतली होती. भाजप नेत्या पंकजा मुंडे रत्नागिरी दौऱ्यावर आल्या असताना त्यांनी आपल्याशी संपर्क साधला नाही, अशी खंत भास्कर जाधव यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहातच व्यक्त केली होती.

त्या पार्श्वभूमीवर शेलार यांनी स्वतः पुढाकार घेत जाधव यांच्या कार्यालयाला भेट दिल्याने या भेटीचे राजकीय महत्त्व अधिक वाढले आहे. भास्कर जाधव यांच्याकडून मला सत्कारासाठी निमंत्रण आले होते. त्यांच्या कार्यालयापासून दोन गाळे सोडून भाजपचे कार्यालय आहे. आम्ही सर्व कोकणातील नेते असल्याने त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेलो असे स्पष्टीकरण शेलार यांनी दिले आहे.

तर शेलार यांच्या जंगी स्वागतावर स्पष्टीकरण देताना चिपळूणचे नगरसेवक फैसल कास्कर यांनी, कोकणच्या संस्कृतीप्रमाणे कोकणात येणाऱ्या प्रत्येक मंत्र्यांचे आमदार भास्कर जाधव स्वागत करतात. मंत्री ॲड. शेलार आणि आमदार भास्कर जाधव यांची भेट पूर्वनियोजित होती. ते शेलार यांना भेटण्यासाठी कार्यालयात सकाळी दहा वाजल्यापासून थांबले होते; परंतु मंत्री शेलार यांना चिपळूणमध्ये येण्यास उशीर झाल्याने आमदार जाधव पुढील कार्यक्रमासाठी निघून गेले. आम्ही कार्यकर्त्यांनी शेलार यांचे स्वागत केले. या भेटीमागे राजकीय अर्थ काहीही नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Bhaskar Jadhav
Bhaskar Jadhav : भास्कर जाधवांनी पहिल्यांदा शिवसेना मिलिंद नार्वेकरांना नडूनच सोडली होती... 22 वर्षांच्या वादाची फुल हिस्ट्री!

पण आता या भेटीनंतर कोकणाच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आले असून मंत्री आशिष शेलारांच्या भास्कर जाधवांच्या कार्यालय भेटी मागे राजकीय संदेश काय? असा सवाल आता उपस्थिती केला जात आहे. तर या भेटीमुळे आगामी काळात राजकीय समीकरणे बदलणार अशा नव्या चर्चाही कोकणात रंगल्या असून यावर भास्कर जाधव कोणते स्पष्टीकरण देतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com