Mumbai University : मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; आता लेट कमर्सना 'नो एन्ट्री'; परीक्षेपूर्वी 30 मिनिटे आधी हजर राहणे बंधनकारक

Mumbai University New Exam Rule : शैक्षणिक वर्ष २०२६ २७ पासून आणि त्यानंतर आयोजित करण्यात येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी मुंबई विद्यापीठाने नवा नियम केला आहे.
Mumbai University
Mumbai UniversitySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुंबई विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी असून विद्यापीठाने नवा नियम केला आहे. या नियमाप्रमाणे आता सर्व परीक्षांसाठी विद्यार्थ्यांनी निर्धारित परीक्षा वेळेच्या किमान ३० मिनिटे अगोदर परीक्षा हॉलमध्ये उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. हा निर्णय परीक्षा व मूल्यमापन मंडळ, व्यवस्थापन परिषद तसेच विद्वत परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तर हा नियम शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून आणि त्यानंतर आयोजित करण्यात येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी लागू करण्यात आला आहे.

परीक्षा कक्षात प्रवेश करण्यापूर्वी परीक्षार्थीची ओळखपत्र तपासणी, आसनव्यवस्था, आवश्यक पडताळणी आणि इतर परीक्षा प्रक्रियांसाठी वेळ आवश्यक असतो. त्यामुळे परीक्षा सुरू होण्याच्या अगदी शेवटच्या क्षणी परीक्षा कक्षात येणाऱ्या परीक्षार्थीना होणारी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. उदाहरणार्थ, परीक्षेची निर्धारित वेळ सकाळी १०.३० वाजता असल्यास, परीक्षार्थीनी सकाळी १० वाजेपर्यंत परीक्षा कक्षात उपस्थित राहणे आवश्यक आहे, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे.

नियमांची अंमलबजावणी करावी

विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक विभागांचे संचालक व प्रमुख, संलग्न, संचलित व स्वायत्त महाविद्यालयांचे प्राचार्य, मान्यताप्राप्त संस्थांचे संचालक तसेच विद्यापीठाच्या विविध उपपरिसरांचे समन्वयक व संचालक यांनी ही सूचना सर्व परीक्षार्थी, शिक्षक आणि परीक्षा कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊन तिची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आवाहन डॉ. पूजा रौंदळे यांनी केले आहे.

Mumbai University
Pune University : चंद्रकांत पाटील यांच्याकडून महाराष्ट्रातील विद्यापीठांचे जाहीर वाभाडे : IIT लेव्हलचे संशोधन करण्यासाठी मार्गदर्शक मंडळाचा प्रस्ताव

परीक्षा पारदर्शक पद्धतीने होणार

मुंबई विद्यापीठाने केंद्रीय स्तरावरील विविध परीक्षांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून, या निर्णयामुळे येत्या काळात पेपरफुटी आणि परीक्षेला उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना चाप लागणार आहे, तर दुसरीकडे या निर्णयामुळे विद्यापीठाला आपल्या सर्व परीक्षा पारदर्शक पद्धतीने घेण्याचा मार्गही उपलब्ध होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com