

मुरबाड नगरपंचायतीच्या रिक्त नगराध्यक्ष पदासाठी मोहन गडगे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला असून त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
या निवडीमुळे मुरबाड नगरपंचायतीवर पुन्हा एकदा भाजपची सत्ता प्रस्थापित झाली आहे.
यापूर्वी नगराध्यक्ष संतोष चौधरी यांच्याविरोधात १३ नगरसेवकांनी अविश्वास ठराव आणल्याने सत्ताधारी परिवर्तन पॅनेल अडचणीत आले होते.
murbad nagar panchayat politics : मुरबाड नगरपंचायतीच्या रिक्त मुरबाड, ता. १० (बातमीदार) झालेल्या नगराध्यक्ष पदासाठी मोहन गडगे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला असून, त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. या निवडीमुळे मुरबाड नगरपंचायतीवर पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाची सत्ता प्रस्थापित झाली असून आमदार किसन कथोरे यांनी ‘परिवर्तन पॅनल’ची हवा काढली आहे. गेल्याच महिन्यात येथे नगराध्यक्ष संतोष चौधरी यांच्याविरोधात १३ नगरसेवकांनी अविश्वास ठराव आणला होता. १३ नगरसेवकांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव दाखल केला होता. ज्यानंतर मुरबाडमधील सत्ताधारी परिवर्तन पॅनेलचे अस्तित्व धोक्यात आले होते.
मुरबाड नगरपंचायतीमधील राजकीय समीकरणे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदलताना दिसत आहेत. नगराध्यक्ष संतोष चौधरी यांच्या राजीनाम्यानंतर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पद रिक्त झाले होते. यामुळे नगराध्यक्ष पदासह येथील सत्ता ताब्यात घेण्यासाठी भाजपने डाव टाकला होता. या खेळीत भाजपमधून फुटलेल्या ९ नगरसेवकांनी तयार केलेल्या 'परिवर्तन पॅनल'चा धुव्वा उडाला असून 'परिवर्तन पॅनल' १७ वरून ४ सदस्यांवर आले आहे. यातील ५ सदस्य पुन्हा भाजपमध्ये परतले असून भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीकडे १३ सदस्यांचे भक्कम बहुमत झाले आहे. सध्या नगरपंचायतीमध्ये भाजपकडे ८ आणि शिवसेनेचे ५ सदस्य आहेत.
दरम्यान नगराध्यक्ष संतोष चौधरी यांच्यासह उपनगराध्यक्षांविरोधात १३ नगरसेवकांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव दाखल केला. यामुळे मुरबाडमधील सत्ताधारी परिवर्तन पॅनेलचे अस्तित्व धोक्यात आले. निवडणुकीनंतर भाजपमधील काही नगरसेवकांनी बंडखोरी करत परिवर्तन पॅनेलची स्थापन केली होती. तर संतोष चौधरी हे नगराध्यक्ष झाले होते. मात्र, राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्यानंतर आणि भाजपचे वाढते प्राबल्य लक्षात घेऊन परिवर्तन पॅनलमधील पाच नगरसेवकांनी पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला.
या अविश्वास ठरावावर शिवसेना (शिंदे गट) ५, भाजप पाच आणि इतर तीन अशा एकूण १३ नगरसेवकांच्या सह्या आहेत. या राजकीय हालचालींमुळे नगराध्यक्ष संतोष चौधरी यांची खुर्ची गेली. दरम्यान आता नगराध्यक्ष पदासह सत्ता स्थापनेचा दावा भाजप-शिवसेना युतीने नगराध्यक्ष पदासाठी मोहन गडगे यांचा अर्ज दाखल केला. तर परिवर्तन पॅनलमध्ये आता केवळ ४ सदस्य उरले असून, त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी कोणताही अर्ज दाखल केला नाही. यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. तर मुरबाड नगर पंचायतीवर पुन्हा भाजपचा झेंडा फडकला आहे.
‘परिवर्तन पॅनल’ची स्थापना
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपमधील सात आणि दोन अपक्ष नगरसेवकांनी ‘परिवर्तन पॅनल’ची स्थापना केली होती. हे पॅनेल म्हणजे आमदार किसन कथोरे यांना राजकीय शह असल्याचे त्यानंतर बोलले जात होते. तर या पॅनलने सुरेश म्हात्रे, कपिल पाटील आणि गणेश नाईक यांच्या भेटी घेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. यामुळे येथे शिवसेनेची सत्ता आल्याचे बोलले जात होते.
नगरसेवक ‘नॉट रिचेबल’
काही दिवसांपासून हे नगरसेवक ‘नॉट रिचेबल’ असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, या सर्व नगरसेवकांचा आमदार किसन कथोरे यांच्यासोबतचा फोटो व्हायरल झाल्याने ते पुन्हा भाजपच्या गोटात दाखल होणार असल्याची चर्चा रंगली आहे. विकासाच्या मुद्द्यावर पुन्हा स्वगृही जाण्याचा निर्णय घेतल्याचे संबंधित नगरसेवकांनी सांगितले. या राजकीय हालचालींमुळे माजी नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे, उपनगराध्यक्षा दीक्षिता वारघडे आणि इतर पदाधिकाऱ्यांनाही पुढील राजकीय आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे.
1. मुरबाड नगरपंचायतीचे नवे नगराध्यक्ष कोण होणार आहेत?
मोहन गडगे यांची बिनविरोध नगराध्यक्षपदी निवड निश्चित झाली आहे.
2. ही निवड बिनविरोध कशी झाली?
नगराध्यक्ष पदासाठी मोहन गडगे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.
3. अविश्वास ठराव कोणाविरोधात आणण्यात आला होता?
माजी नगराध्यक्ष संतोष चौधरी यांच्या विरोधात १३ नगरसेवकांनी अविश्वास ठराव आणला होता.
4. या निर्णयामुळे कोणत्या पक्षाला फायदा झाला?
या निर्णयामुळे मुरबाड नगरपंचायतीवर पुन्हा एकदा भाजपची सत्ता प्रस्थापित झाली.
5. आमदार किसन कथोरे यांची भूमिका काय होती?
आमदार किसन कथोरे यांच्या रणनीतीमुळे परिवर्तन पॅनलची सत्ता डळमळीत झाल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.