Nagpur MLC Results : मतमोजणीवेळी मीडिया सेंटरमध्ये मोबाइल, लॅपटॉप बंदी : नागपूर विभागीय आयुक्तांचा फोनही बंद; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Mobile And Laptop Ban For Journalists In Nagpur : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात व्यवस्था करण्यात आली आहे.
Nagpur Graduate Constituency
Nagpur Graduate ConstituencySarkarnama
Published on: 
Updated on: 

Nagpur News : राज्यातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी मतदान पार पडले असून आज मतमोजणी सुरू आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघातून कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, मतमोजणीचे वृत्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांना निवडणूक आयोगाच्या निर्बंधांमुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात उभारण्यात आलेल्या मीडिया सेंटरमध्ये पत्रकारांना मोबाइल आणि लॅपटॉप नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या या निर्णयावर पत्रकारांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

राज्यातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या गृहजिल्ह्यातील नागपूर पदवीधर मतदारसंघात चुरशीची लढत होत आहे.

या मतदारसंघात भाजप, काँग्रेस आणि अपक्ष उमेदवार यांच्यात तिरंगी लढत आहे. मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. त्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार अभिजीत वंजारी १५ मतांनी आघाडीवर असल्याची माहिती आहे.

दरम्यान, नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, येथे उभारलेल्या मीडिया सेंटरमध्ये मोबाइल आणि लॅपटॉप नेण्यास बंदी घालण्यात आल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. माहितीचे संकलन आणि वृत्तांकन करण्यासाठी पत्रकारांना या उपकरणांची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत मीडिया सेंटरमध्येच मोबाइल आणि लॅपटॉप वापरण्यास मनाई असल्याने या केंद्राचा नेमका उपयोग काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Nagpur Graduate Constituency
MLC Election Results : विधान परिषद निवडणुकीत आघाडीचा धुव्वा; 17 पैकी 16 जागांवर महायुतीचा विजय, एक जागा कोणाला?

निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि माहितीचा मुक्त प्रवाह महत्त्वाचा असतो. अशा वेळी माध्यमांच्या कामावर निर्बंध आल्यास वृत्तांकनावर मर्यादा येण्याची शक्यता आहे. मतमोजणीच्या ठिकाणी माध्यमांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असताना मोबाइल आणि लॅपटॉप नेण्यास बंदी घालण्यामागील कारण प्रशासनाने स्पष्ट करणे अपेक्षित आहे.

या प्रकरणी अधिक माहिती मिळवण्यासाठी विभागीय आयुक्तांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांचा मोबाइल फोन स्विच ऑफ असल्याने प्रशासनाची अधिकृत भूमिका समजू शकली नाही.

Nagpur Graduate Constituency
MLC Election Results : विधानपरिषदेत भाजपचा जलवा; बसवराज पाटील राज्यात सर्वाधिक मताधिक्याने विजयी

मानकापूर येथील क्रीडा संकुलात दुपारी दोन वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली. या प्रक्रियेतील घडामोडींचे वृत्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांना मोबाइल आणि लॅपटॉपवरील बंदीमुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com