Narayan Rane On Uday Samant : एकदा मंगळसूत्र घातलं तर पावित्र्य राखा ः नारायण राणेंनी सामंतांना फटकारलं!

Kokan Political News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही सांगितले
Narayan Rane On Uday Samant
Narayan Rane On Uday Samant Sarkarnama
Published on
Updated on

संजय परब -

Kokan News : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ सध्या चर्चेत असून या मतदारसंघात दावे-प्रतिदावे सुरू आहेत. शिवसेनानेते पालकमंत्री उदय सामंत यांनी या लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचाही दावा असल्याचे म्हटले होते. कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले भाजपचे जेष्ठ नेते केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी आता याच विषयावरून उदय सामंत यांना फटकारले आहे. यामुळे शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमध्येच धुसफूस असल्याचे चित्र दिसून येत आहे. (Latest Marathi News)

Narayan Rane On Uday Samant
Nanded BJP News : खासदार चिखलीकर 'ॲक्शन मोड'मध्ये; म्हणाले, चव्हाण-खतगावकरांनी लावली नांदेडची वाट

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर आमचा क्लेम कायम आहे. कोण उमेदवार असेल हे आमचा पक्ष ठरवेल, त्यामुळे उदय सामंत यांनी या विषयावर भाष्य करू नये, अशा शब्दात केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी उदय सामंत यांना सुनावले आहे. उदय सामंत बोलतील तसंच होईल, असे सांगता येत नाही. आम्ही ओरिजनल आहोत, कुठून ही आलो असलो तरी भाजपमध्ये आहोत. मी कधी या विषयावर भाष्य करतो का? असा सवाल करत, 'उगाच आमचं तुमचं करू नका. जेव्हा नांदायचे असते तेव्हा एकदा मंगळसूत्र घातलं ना तर युतीचं पावित्र्य ठेवायचे, अशा शब्दात नारायण राणे यांनी खडे बोल सुनावत भूमिका मांडली आहे.

कोकण रेल्वेबाबतही राणे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. कोकण रेल्वे प्रकल्पाला 6000 कोटी रुपयांचं कर्ज आहे विकासाला एक पैसा नाही, पगारही जात नाहीत त्यामुळे आपण याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना पत्र दिल आहे, की कोकण रेल्वे भारतीय रेल्वेमध्ये समाविष्ट करावी आणि आमच्या कोकणात चांगल्या सुविधा, प्लॅटफॉर्म चांगल्या गाड्या दिल्या जाव्यात अशी मागणी आपण केल्याची माहिती नारायण राणे यांनी दिली.

Narayan Rane On Uday Samant
Latur Loksabha Constituency : साडेचार वर्षे झाली, कुणाला लातूरचे भाजप खासदार आठवतात का?

मुंबई गोरेगाव येथील महानंद डेअरीबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, तेथील मुलांचे पगार सहा महिने झालेले नाहीत. महानंद डेअरी आहे तिथेच गोरेगाव येथे राहील फक्त हाताळण्याचं काम एनडीबी ही डेअरी करेल मात्र ते अजून निश्चित झालं नाही असंही राणे यांनी स्पष्ट केलं. याबाबत आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही सांगितले आहे, त्यामुळे उगाचच विरोध करू नका, असेही राणे यांनी स्पष्ट केल आहे.

मुंबई येथील रेसकोर्सच्या जागेबाबत आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आरोपालाही त्यांनी उत्तर दिलं आहे. आदित्य ठाकरे यांचे वडील मुख्यमंत्री असताना रेसकोर्सच्या जमिनीची कोणी मागणी केली होती ते मला विचारा ना मुंबईच्या कानाकोपऱ्याचं असं म्हणत हेच ठाकरे लोक रेसकोर्सची जागा गिळंकृत करायला प्रयत्नशील होते, अशा शब्दांत राणे यांनी समाचार घेतला आहे. महानगरपालिका इतकी वर्षे यांच्याकडे होती काय केलं यांनी, असाही सवाल राणे यांनी केला आहे.

Narayan Rane On Uday Samant
CAA Act News : राम मंदिरानंतर लोकसभेआधी 'CAA' कायदा लागू होणार? मोदी सरकारची रणनीती...

मोदींची गॅरंटी नावाची व्हॅन देशातील प्रत्येक गावागावात गेली आहे. मोदींनी केलेली कामे लोकांसमोर गेलेली आहेत. मोदींनी ज्या योजना राबविल्या आहेत. त्यासाठी लोक त्यांना धन्यवाद देत आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचा कौतुक राणे यांनी केले आहे. या यात्रेला उद्धव ठाकरे गटाकडून होत असल्या विरोधाबाबत राणे यांनी सुनावले आहे.

Narayan Rane On Uday Samant
CAA Act News : राम मंदिरानंतर लोकसभेआधी 'CAA' कायदा लागू होणार? मोदी सरकारची रणनीती...

आता ठाकरेंना कोणतेही काम नाही आणि उबाठावाल्यांनी आयुष्यात केलं काय टीका करण्यापलीकडे, त्यांनी काही केलं नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांचाही समाचार घेतला आहे. उबाठा आपोआप संपली आहे, अशी टीका केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी केली आहे. विरोध करायचा असेल तर मी आता जिल्ह्यात आलो आहे, विरोध करून दाखवा, असेही थेट आव्हान केंद्रीयमंत्री राणे यांनी दिले आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com