Water Dispute : गणेश नाईकांचा पुन्हा संताप, 400 कोटींच्या नोटीसवरून सिडकोला सुनावले; पाण्यावर ठाम भूमिका

Ganesh Naik Warns CIDCO Over Navi Mumbai Water Row : नवी मुंबईतील क्लस्टर योजना आणि यूडीसीपीआरवरून वनमंत्री गणेश नाईक यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचले होते.
Ganesh Naik Warns CIDCO
Ganesh Naik Warns CIDCOsarkarnama
Published on
Updated on

Navi Mumbai News : नवी मुंबईतील क्लस्टर योजना आणि यूडीसीपीआरवरून महायुतीतील वादाची ठिणगी पडलेली असतानाच आता वनमंत्री गणेश नाईक यांनी सिडकोला थेट इशारा दिला आहे. खारघर आणि परिसरासाठी नवी मुंबई महापालिकेकडे पाण्याची मागणी करत, पाणी न दिल्यास तब्बल 400 कोटी रुपयांची नोटीस बजावणाऱ्या सिडकोला नाईक यांनी चांगलेच सुनावले. 'दादागिरी कोणी करीत असेल, तर ती खपवून घेतली जाणार नाही. दादागिरी मोडून काढली जाईल,' असा इशारा त्यांनी दिला.

नवी मुंबईतील विकासकामांची पाहणी केल्यानंतर गणेश नाईक माध्यमांशी बोलत होते. सिडकोने नवी मुंबई महापालिकेकडे 57 एमएलडी पाण्याची मागणी केली होती. मात्र, पालिकेने पाणी देण्यास नकार दिल्यानंतर सिडकोने थकीत रकमेचा आधार घेत महापालिकेला 400 कोटी रुपयांची नोटीस बजावली. यावरून नाईक आक्रमक झाले.

'नवी मुंबई महापालिका दुबळ्या लोकांची नाही'

पाणी न दिल्याच्या कारणावरून अशी नोटीस काढण्याची दादागिरी कोणी करत असेल, तर ती खपवून घेतली जाणार नाही, असे नाईक यांनी स्पष्ट केले. 'अशी नोटीस काढण्याची हिंमत कोणी केली असेल, तर त्यांना नक्कीच पश्चात्ताप करावा लागेल. कायमस्वरूपी पाणी देत नाही म्हणून कुणी दादागिरी करत असेल, तर ती मोडून काढली जाईल,' असा थेट इशारा त्यांनी दिला. नवी मुंबई महापालिका ही दुबळ्या लोकांची संस्था नाही, असे सांगत नाईक यांनी सिडकोच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. तसेच, सिडकोला कायमस्वरूपी पाणी देणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Ganesh Naik Warns CIDCO
Ganesh Naik vs Eknath Shinde : 'माझ्या नादाला लागला तर जागा दाखवणार', गणेश नाईकांचा शिंदेंना पुन्हा आव्हान; क्लस्टर योजनेवरून वादाची ठिणगी

'माणुसकीच्या नात्याने मागणी केली तर पाणी देऊ'

मोरबे धरणाचे पाणी प्रामुख्याने नवी मुंबईतील नागरिकांसाठी असल्याचे गणेश नाईक यांनी सांगितले. मात्र, माणुसकीच्या दृष्टिकोनातून तात्पुरती मदत मागितली तर त्याचा विचार केला जाऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

एखाद्या ठिकाणी जलवाहिनी फुटली असेल किंवा पाण्याची तात्पुरती गरज निर्माण झाली असेल, तर नवी मुंबईतील नागरिकांना काही काळ थोडे कमी पाणी वापरण्याची विनंती करून अतिरिक्त पाणी देण्याचा विचार केला जाऊ शकतो. मात्र, नवी मुंबईच्या नागरिकांच्या हक्काचे पाणी कायमस्वरूपी अन्य कोणालाही देणार नाही, अशी भूमिका नाईक यांनी मांडली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com