नितेश राणेंनी थेट उदय सामंतांना टार्गेट केलं, म्हणाले, 'आमदारांना 20 कोटींचा निधी मात्र राणेंना फक्त 5 कोटीच, हे थांबणार कधी?'

Nitesh Rane accuses Uday Samant Over Narayan Rane : तळ कोकणात सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये शितयुद्ध सुरू आहे. अशातच आता रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे.
Nitesh Rane Uday Samant And Narayan Rane
Nitesh Rane Uday Samant And Narayan Ranesarkarnama
Published on
Updated on

Summary Points

  1. नितेश राणे यांनी उदय सामंत यांच्यावर निधी वाटपात पक्षपात केल्याचा आरोप केला.

  2. सामंत यांनी आपल्या गटाला 20 कोटी तर नारायण राणेंना फक्त 5 कोटी दिल्याचा दावा.

  3. जिल्हा नियोजन निधी प्रकरणामुळे भाजप-शिवसेना तणाव वाढला आहे.

Ratnagiri News : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये शितयुद्ध सुरू आहे. पक्ष प्रवेशावरून सुरू झालेला वाद आता जिल्हा नियोजन समितीच्या निधीपर्यंत येवून पोहचला आहे. भाजप नेते मंत्री नितेश राणे यांनी खासदार नारायण राणे यांचा दाखला देत थेट पालकमंत्री उदय सामंत यांच्यावरच हल्लाबोल केला आहे. तसेच तळ कोकणातील विधानसभेचा कुठलाही मतदारसंघ हा BJP च्या ताकदीशिवाय निवडूवन येऊ शकत नाही, असे म्हणत त्यांनी सामंत यांना इशाराही दिला आहे. यामुळे तळ कोकणात पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे.

राज्यातील महायुती सध्या आगामी स्थानिक निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. पण अंतर्गत वाद विविध जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. तळ कोकणही याला अपवाद नसून येथे सिंधुदुर्गसह रत्नागिरी जिल्ह्यात भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेसेन वाद पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुतीचे कोणतेही ठोस नसलेले धोरण, स्वतंत्र निवडणुका लढवण्याची स्थानिक नेत्यांची वक्तव्ये यामुळे जिल्ह्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. यामुळे विरोधकांऐवजी महायुतीमध्येच कलगीतुरा रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Nitesh Rane Uday Samant And Narayan Rane
Nitesh Rane : शिवाजी महाराजांना राज्याभिषेक नाकारणारे सनातनी दहशतवादीच! आव्हाडांच्या विधानावर राणेंचा भडका उडाला...

अशातच मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी रत्नागिरीत जाऊन शिवसेना नेते तथा पालकमंत्री उदय सामंत यांना डिवचले आहे. त्यांनी सामंत यांच्यांवर जिल्हा नियोजन समितीचा निधी योग्य पद्धतीने वाटप केलेला नाही असा आरोप केला आहे. यामुळे जिल्ह्याचे राजकीय वातावरण तापलं आहे.

नितेश राणे यांनी उदय सामंत यांनी आपल्यासह आमदार किरण सामंत, शेखर निकम यांना 20 कोटींच्या घरात निधी दिला. भाजपचे खासदार नारायण राणे यांना निधी देताना हात आखडता घेतल्याचा दावा केला आहे. सामंत यांनी एकीकडे आमदारांना 20-20 कोटींचा निधी दिला मात्र खासदारांना फक्त 5 कोटींचा निधी दिला, असा दावा त्यांनी केला आहे.

तसेच नितेश राणे यांनी यावेळी, सामंत यांच्यावर आरोप करताना, हे थांबणार कधी? आमचे कार्यकर्तेही आम्हाला जिल्हा नियोजनात हवी आहेत. आमचेही मतदार येथे आहेत. सध्याची परिस्थिती पाहता तळ कोकणातील विधानसभेचा कुठलाही मतदारसंघ हा BJP च्या ताकदीशिवाय निवडूवन येऊ शकत नाही, असे सांगत त्यांनी सामंत यांना एका प्रकारे इशारा दिला आहे.

यावेळी उदय सामंत यांना या प्रकरणी पत्रकारांनी विचारले असता त्यांनी एका वाक्यात या आरोपांवर प्रत्युत्तर त्यांनी दिले आहे. त्यांनी, नितेश राणे यांना माझ्या शुभेच्छा असल्याचे म्हटलं आहे.

Nitesh Rane Uday Samant And Narayan Rane
Nitesh Rane On Thackeray: '...हे शिवसेना-मनसेवाल्यांनी सांगावं!'; उद्धव ठाकरेंच्या अनाजीपंत टीकेला राणेंचं खोचक प्रत्युत्तर

FAQs :

प्र.१: नितेश राणेंचा आरोप काय आहे?
उ: उदय सामंत यांनी निधी वाटपात पक्षपात करून भाजप खासदार नारायण राणेंना कमी निधी दिला, असा त्यांचा आरोप आहे.

प्र.२: किती निधी दिला गेला?
उ: सामंत गटाला 20 कोटी, तर नारायण राणेंना फक्त 5 कोटी रुपये दिल्याचे नितेश राणे म्हणाले.

प्र.३: हा वाद कोणत्या समितीशी संबंधित आहे?
उ: हा वाद जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपाशी संबंधित आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com