Toll Relief : सिंधुदुर्गकरांसाठी खुशखबर; वाढदिवसानिमित्त नितेश राणेंची मोठी घोषणा! ओसरगाव टोलवर MH07 मिळणार विशेष सवलत

Nitesh Rane On Sindhudurg Toll Relief : महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गवासीयांना मोठी भेट देत ओसरगाव टोलसंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.
Sindhudurg Toll; Nitesh Rane
Sindhudurg Toll; Nitesh Ranesarkarnama
Published on
Updated on

Sindhudurg News : ओसरगाव टोलनाका कार्यान्वित झाल्‍यानंतर तेथे सिंधुदुर्गातील वाहनांसाठी स्वतंत्र लेन असणार आहे. पिवळी नंबर प्लेट असलेल्‍या जिल्ह्यातील व्यावसायिक वाहनांसाठी ५० टक्‍के सवलत दिली जाणार आहे. टोल वसुली करणाऱ्या कंपनीने या बाबी मान्य केल्याची घोषणा राज्याचे मत्स्य व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त केली. यानंतर आता ही घोषणा म्हणजे राणेंनी आपल्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गवासीयांना दिलेली मोठी भेट असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

जिल्ह्यातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन ओसरगाव टोल नाक्यावर एमएच ०७ क्रमांकाच्या वाहनांसाठी स्वतंत्र लेन उपलब्ध करून देत विशेष सवलत देण्यात येणार आहे. या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, खासदार नारायण राणे यांनी सहकार्य केल्‍याची माहिती नितेश राणे यांनी दिली.

ओसरगाव येथील टोलनाका सुरू करण्याबाबत मे महिन्यात केंद्र शासनाने निविदा मागविल्‍या होत्या. त्‍याबाबतचे वृत्त प्रसारित होताच सिंधुदुर्गातील व्यापारी संघटनांसह सर्वच राजकीय पक्षांनी आंदोलनाची भूमिका जाहीर केली. त्‍यामुळे टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन ठेकेदार निश्‍चित झाला तरी प्रत्‍यक्षात ओसरगाव टोलनाका सुरू झालेला नाही.

Sindhudurg Toll; Nitesh Rane
Nitesh Rane : 'ताफ्यातल्या गाड्या कमी केल्याचा फडणवीसांच्या लाडक्या मंत्र्याचा दावा फोल : पुढे-मागे धावल्या डझनभर गाड्या; व्हिडिओ व्हायरल...

मुंबई-गोवा महामार्गावर सध्या फक्‍त खारपाडा (पेण, रायगड) येथील टोलनाका सुरू आहे. ओसरगाव, राजापूर, खांब आदी ठिकाणांचे टोलनाके लवकरच सुरू होणार आहेत. त्‍या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राणे यांनी आज ओसरगाव टोलनाकाप्रश्‍नी भूमिका स्पष्‍ट केली.

राणे म्‍हणाले, ‘‘पालकमंत्री म्हणून जनतेसाठी काहीतरी देण्याची भावना होती. ओसरगाव टोलच्या मुद्द्यावर नागरिक, व्यावसायिक यांनी टोल माफीची मागणी केली होती. आश्वासनाची पूर्तता करताना ओसरगाव टोलनाक्यावर एमएच-०७ क्रमांकाच्या वाहनांसाठी स्वतंत्र लेन दिली जाणार आहे. त्‍यामुळे जिल्ह्यातील वाहनधारकांना सहजरीत्या प्रवास करता येणार आहे. याशिवाय जिल्ह्यातील पिवळ्या क्रमांकाच्या (व्यावसायिक) वाहनांसाठी टोलवसुली करणाऱ्या संबधित कंपनीने टोल दरात ५० टक्के देण्यासह मान्यता दिली आहे.’’

Sindhudurg Toll; Nitesh Rane
Nitesh Rane : नीतेश राणेंना कोर्टाचा झटका! एक महिन्याचा कारावास, शिक्षेच्या स्थगितीसाठी लवकरच उच्च न्यायालयात जाणार

टोलमाफीचे संकेत?

पालकमंत्री नीतेश राणे यांनी आज टोलनाक्‍यावर सिंधुदुर्गातील वाहनांसाठी स्वतंत्र लेन राहणार असल्‍याची माहिती दिली; मात्र टोलमाफीबाबत वक्‍तव्य केलेले नाही. जर श्री. राणे यांनी टोलनाक्‍यावर सिंधुदुर्गातील वाहनांना टोलमाफीबाबतची भूमिका जाहीर केली तर राज्‍य, देशभरातूनही तशीच मागणी होण्याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे जेव्हा टोलनाका सुरू होईल, त्‍यावेळी सिंधुदुर्गातील वाहनांना टोलमाफी दिली जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com