कणकवलीतील चिखलफेक प्रकरणात नितेश राणे यांच्यासह 40 जणांची बहुतेक आरोपांतून निर्दोष मुक्तता झाली.
मात्र IPC 504 अंतर्गत एक महिन्याचा कारावास व 1 लाख दंड सुनावला गेला असून त्याला स्थगिती देण्यात आली आहे.
आरोपींकडून उच्च न्यायालयात रिव्हिजन दाखल करण्याची तयारी सुरू आहे.
Nitesh Rane Kanakavali Engineer Incident News: भाजप नेते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना जिल्हा सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. त्यांच्यासह 40 जणांची चिखल फेक प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
पण याच एका प्रकरणात मात्र त्यांना न्यायालयाने दिलासा दिला नसून त्यात त्यांना एक महिन्याचा कारावास व एक लाख रूपये दंड सुनावण्यात आला आहे. ते काँग्रेसमध्ये असतानाचे हे प्रकरण असून त्यांनी अभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखल फेक केली होती.
नितेश राणे काँग्रेसचे आमदार असताना मुंबई-गोवा महामार्गावर चिखल आणि खड्ड्यांविरोधातील रोष व्यक्त केला होता. त्यांनी यावरून उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक केली होती. या प्रकरणी शेडेकर यांच्या फिर्यादीनुसार नितेश राणे यांच्यासह जवळपास 40 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तर त्यांच्यासह कणकवलीचे तत्कालिन नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बाबू गायकवाड, बांधकाम सभापती संजय कामतेकर, पं. स. सदस्य मिलिंद मेस्त्री, नरसेवक अभि मुसळे, मेघा गांगण, स्वाभिमान शहराध्यक्ष राकेश राणे, संदीप नलावडे, निखिल आचरेकर, राजन परब, वागदे माजी सरपंच संदीप सावंत, माजी उपसरपंच लक्ष्मण घाडीगांवकर, माजी पं. स. उपसभापती बबन हळदिवे, विठ्ठल देसाई, किशोर राणे, शिवसुंदर देसाई, सचिन पारधीये यांना अटक करण्यात आली आहे.
या अटकेनंतर नितेश राणे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कृतीचा त्यांचे वडील आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला होता. तसेच घडलेल्या घटनेबद्दल खेद व्यक्त करत माफीही मागितली होती.
त्यांनी, या महामार्गाबद्दल सर्व सामान्यांमध्ये रोष आहे. यावरून राग आणि आंदोलन करणे योग आहे. ते आपण समजू शकतो, पण अशा पद्धतीने हिंसा चुकीची आहे. ज्याला आपण अजिबात पाठिंबा देत नाही', अशा शब्दात नाराजी व्यक्त केली होती.
तसेच नितेश यांच्या समर्थकांनी केलेल्या हिंसेबाबत त्यांनी माफी मागावी असे मी सांगणार नाही, कारण तो माझा मुलगा आहे. पण जर चूक नसताना मी माफी मागू शकतो, तर मग मुलाला माफी मागावीच लागेल, असेही म्हणत राणेंनी नितेश राणे यांचे कान टोचले होते.
या दरम्यान आता जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणे यांच्यासह 40 जणांची या चिखल फेक प्रकरणात निर्दोष मुक्तता केली आहे. तर या प्रकरणात नितेश राणे यांच्यावर 353, 332, 504, 506 कलमानुसार गुन्हा दाखल झाला होता. यातील 353, 332, आणि 506 कलमांत नितेश राणेंसह सहकाऱ्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
पण यातील 504 कलमा अंतर्गत सार्वजनिक ठीकाणी शांततेचा भंग प्रकरणी नितेश राणे यांना एक महिन्याचा कारावास व एक लाख रूपये दंड सुनावण्यात आला आहे. या शिक्षेला स्थगिती मिळावी याकरिता अर्ज त्यांचे वकील संग्राम देसाई यांनी दिली आहे. तर याबाबत लवकरच उच्च न्यायालयामध्ये रिव्हिजन दाखल करणार असल्याचीही महिती नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी दिली आहे.
नेमकं काय घडलं होतं?
नितेश राणे, स्वाभिमान पक्षाचे नगराध्यक्ष समीर नलावडे आणि कार्यकर्त्यांनी उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना मुंबई-गोवा महामार्गावर चिखल आणि खड्ड्यांविरोधात जाब विचारला होता. गडनदी पुलावर शेडेकर यांना बांधत त्यांच्या डोक्यावर चिखलाच्या बादल्या ओतल्या होत्या. तर सर्वसामान्य जनता रोज जो चिखल मारा सहन करते, तो तुम्ही पण आज अनुभवा, असं म्हणत त्यांना सुनावलं होते.
1. नितेश राणे प्रकरण नेमके काय आहे?
कणकवलीत अभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक व मारहाण केल्याचा आरोप होता.
2. न्यायालयाचा अंतिम निर्णय काय आहे?
राणे आणि 40 जणांना बहुतेक आरोपांतून निर्दोष मुक्तता मिळाली, पण IPC 504 अंतर्गत शिक्षा सुनावली.
3. शिक्षा काय ठोठावली आहे?
एक महिन्याचा कारावास आणि 1 लाख रुपयांचा दंड, मात्र त्याला स्थगिती देण्यात आली आहे.
4. कोणत्या कलमांखाली गुन्हा दाखल होता?
IPC 353, 332, 504 आणि 506 या कलमानुसार गुन्हा दाखल होता.
5. पुढील कायदेशीर प्रक्रिया काय असेल?
राणे यांच्या वकिलांकडून उच्च न्यायालयात रिव्हिजन अर्ज दाखल केला जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.