

आरएसएसच्या वरळी डोममधील कार्यक्रमावरून नितेश राणेंनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली.
सलमान खानच्या उपस्थितीचा संदर्भ देत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर खोचक टोले लगावले.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीनंतर महाविकास आघाडीवरही त्यांनी निशाणा साधला.
Mumbai News : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षांनिमित्त मुंबईमधील नेहरु सेंटर सभागृहात संघ प्रमुख मोहन भागवत यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्याला अभिनेता सलमान खान हजर होता. यावेळी बॉलिवूडमधील रणबीर कपूर, अश्विनी भावे, हेमा मालिनी असे अनेक कलाकारही उपस्थिती होते. पण सलमान खान उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या. ज्यानंतर देशभर याची चर्चा रंगली. यानंतरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी टीका केली होती. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील भाष्य केले होते. यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच भाजप मंत्री नितेश राणे यांनी ठाकरे बंधुंना डिवचले असून त्यांच्यावर तिखट टीका केलीय.
यावेळी नितेश राणे यांनी, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतील यशानंतर महाविकास आघाडीवर निशाणा साधला. तसेच ठाकरे बंधूंना टोला लगावला. ज्याची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे. ते म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला सलमान खान याने उपस्थित लावली. त्याने हिंमत दाखवली. यामुळे तो उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा हिंदू निघाला.
मात्र जी शिवसेना हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी उभी केली त्यांना हिंदूहृदयसम्राट ही उद्धव ठाकरे राहुल गांधींसमोर बोलू शकत नाहीत. रटाळ प्रवचनात उद्धव ठाकरेंनी पीएचडी केली असून योग्य दिशा राज ठाकरेंना मिळाली असती. उलट रटाळ बोलण्यापेक्षा बैद्धिक घेतलं असते. इतकी लोकं त्यांना सोडून गेले नसते, अशी घणाघाती टीका नितेश राणे यांनी राज ठाकरेंवर केली.
राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवर नितेश राणेंनी खोचक टोला लगावला. ते म्हणाले, राज ठाकरेंना जी माहिती मिळाली ती चुकीची असावी, त्यांनी सकाळी लवकर उठून संघाच्या कार्यक्रमाला यायला हवं होतं. त्यांना बौद्धिक ऐकून पक्ष कसा चालवायचा याच ज्ञान मिळालं असतं.
पण राज ठाकरे मालेगावात जाऊन काहीच बोलले नाहीत. मुल्ला मौलवींवेळी गप्प बसायचं आणि हिंदू-हिंदुत्ववार बोलायचं. त्यांचं हे असं करणं म्हणजे पाकिस्तानातील अब्बांना खूष करण्याचा प्रयत्न असल्याचेही टीका नितेश राणेंनी केली आहे. त्यामुळेच सलमान खान हा उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा जास्त हिंदु असल्याचं माझं मत असल्याचेही नितेश राणेंनी म्हटलं आहे. तर मुंब्रावर बोलण्याची हिम्मत राज ठाकरे यांनी दाखवावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.
राज ठाकरेंची टीका
या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलावण्यात आले होते, त्यातले काही हजर देखील होते ! परंतु मोहनराव भागवतांना एक गोष्ट सांगू इच्छितो की ती सर्व मंडळी तुमच्या प्रेमाखातर आली नव्हती तर ती नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे आली होती ! नाहीतर आजवर का कोणी या असल्या रटाळ प्रवचनांना आले नाहीत? त्यामुळे ती मंडळी आपल्यासाठी आली होती या गैरसमजातून प्रथम आपण बाहेर या !
काय म्हणाले संजय राऊत?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला सलमान खान उपस्थित राहिल्यानंतर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार टीका केली होती. त्यांनी, हिंदू-मुस्लिम राजकारणावर बोलताना, “सलमान खान व्यासपीठावर होते असं मला कळलं. हे सलमान खानचं स्वागत होतं? एक फार मोठा बॉलिवूड स्टार गर्दी जमवायला, की संघामध्ये यापुढे मुस्लिमांनाही खुलं आमंत्रण आहे? फक्त सलमान खान या नटाला व्यासपीठावर आमंत्रण होतं की संघ शाखांवर यापुढे मुस्लिमांनाही प्रवेश आणि त्यांचं स्वागत आहे का? हे जर मोहनराव भागवतांनी स्पष्ट केलं असतं तर बरं झालं असतं. कारण ज्या पद्धतीने हिंदू-मुसलमान असा द्वेष आणि सूडपूर्ण प्रसार गेल्या काही काळापासून केला जात आहे त्यामध्ये संघही सामील आहे.”
1. नितेश राणेंनी ठाकरे बंधूंवर टीका का केली?
आरएसएसच्या कार्यक्रमातील उपस्थिती आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून त्यांनी टोले लगावले.
2. सलमान खानचा उल्लेख का करण्यात आला?
सलमान खानने आरएसएस कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याचा दाखला देत तुलना करण्यात आली.
3. राज ठाकरे यांच्यावर नितेश राणेंनी काय टीका केली?
रटाळ भाषणांऐवजी वैचारिक भूमिका घेतली असती तर पक्षातून लोक गेले नसते, असा आरोप केला.
4. महाविकास आघाडीवर काय निशाणा साधला?
स्थानिक निवडणुकांनंतरही मविआ अपयशी ठरल्याचा दावा केला.
5. या वक्तव्याचा राजकारणावर काय परिणाम होईल?
राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.