Ajit pawar On Bjp : विचारधारा सोडली म्हणणाऱ्यांना अजित पवारांनी सुनावलं, भाजपसोबत जाण्याचं कारण सांगितलं...

Political News : आम्ही निर्णय घेतला तर चूक आणि वरिष्ठांनी घेतला तर बरोबर, असे म्हणत अजित पवार यांनी शरद पवारांचे नाव न घेता निशाणा साधला.
Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai: महाविकास आघाडीतून अजित पवार महायुतीसोबत गेले. राष्ट्रवादीमध्ये फूट पडली. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी महायुती सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. मात्र, त्यावेळी भाजपची विचारधारा वेगळी आणि राष्ट्रवादीची वेगळी असे म्हणत अजित पवार यांना टार्गेट करण्यात आले होते. यावर अखेर अजित पवार यांनी उत्तर दिले आहे.

महाविकास आघाडीत असताना शिवसेने सोबत सत्ता स्थापन केलेली चालते. मग भाजपसोबत का नाही. उद्धव ठाकरे यांची सत्ता जात आहे हे समजताच आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की आपण भाजपसोबत जाऊ. वेगवेगळ्या घटना राजकारणात घडत असतात. आम्ही निर्णय घेतला तर चूक आणि वरिष्ठांनी घेतला तर बरोबर, असे म्हणत अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवारांचे (Sharad Pawar) नाव न घेता निशाणा साधला. Ajit pawar On Bjp

Ajit Pawar
Manoj Jarange Patil Maratha Reservation : मुख्यमंत्री शिंदेंची चाल यशस्वी, जरांगे पाटलांचा मराठा मोर्चा शांत?

अजित पवार यांनी या आधी वयाचा मुद्दा उपस्थित करून शरद पवारांना टार्गेट केले होते. त्यांनी वयाच्या 38 व्या वर्षी वेगळी चूल मांडली. मात्र, आम्ही 62 व्या वर्षी देखील वाट पाहायची का?,असे अजित पवार म्हणाले होते. त्यानंतर देखील आपल्या जाहीर सभांमधून आपली भूमिका कशी योग्य आहे हे ठासून सांगताना राष्ट्रवादीतील पदाधिकारी आणि सर्वाधिक आमदार आपल्यासोबत असल्याचा दाव अजित पवार यांनी केला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रवादीच्या अपात्रता आमदरा प्रकरणी विधानभवनात सुनावणी सुरू आहे. शरद पवार गटातील आमदारांची साक्ष पूर्ण झाली असून अजित पवार गटातील आमदारांची साक्ष आता सुरु आहे. गुरुवारी (दि.25) स्वतः शरद पवार हे विधानभवनात आले होते. अजित पवार गटातील आमदार काय साक्ष देत आहेत, हे स्वतः पवार यांनी ऐकले. तेव्हा त्यांच्यासोबत रोहित पवार आणि सुप्रिया सुळे या देखील होत्या.

Ajit Pawar
BJP Election Strategy : अशोक चव्हाणांना घेरण्याची भाजपची रणनीती; तरुण नेत्यावर दिली महत्वपूर्ण जबाबदारी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com