Mumbai : शिवेसना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांचा भाऊ संदीप राऊत याला ईडीकडून खिचडी घोटाळ्या प्रकरणी चौकशीची नोटीस दिली आहे. पाच लाखांच्या घोटाळ्या प्रकरणी ही नोटीस असल्याचे सांगत संजय राऊत यांनी भाजपला टार्गेट केले. आम्ही कोणाच्या परिवारापर्यंत जात नाही. आमच्यावर ते संस्कार नाहीत. मात्र, भाजपच्या नेत्यांचे काय उद्योग सुरू आहेत. हे सगळं आम्हाला माहीत आहे. पण आम्ही त्यांच्या परिवारापर्यंत जाणार नाही. ते आमचे संस्कार नाहीत, असा हल्ला संजय राऊत यांनी केला. Ed Enquiry of Sandeep Raut
हाॅटेलमध्ये खिचडी केली म्हणून नोटीस आहे, हे किती हास्यास्पद आहे. आमच्या घरातील लोक जातील ठामपणाने उभे राहतील, तुम्हाला हवं ते करा, असे म्हणत संजय राऊत यांनी थेट आव्हान दिले. पाच लाखांसाठी नोटीस आली. आठ हजार कोटींचा अॅम्बुलन्स घोटाळा झाला. राहुल कूल यांनी मनी मनी लॉन्ड्रिंग मी ईडीला वारंवार पत्र लिहिली. मात्र, यावर ते नोटीस काढणार नाहीत. मात्र, जे हुकुमशाही विरोधात लढत आहेत त्यांच्या विरोधात नोटीस काढली आहे. आम्ही ही ई़डी विरोधात नोटीस काढू, असा इशाराच संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
हिमंत बिस्वा शर्मा (himanta biswa) यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात नोटीस निघणार नाही. अजित पवारांच्या 70 हजार कोटी सिंचन घोटाळ्या प्रकरणी नोटीस निघणार नाही. मात्र, किशोरी पेडणेकर, रोहित पवार यांना चौकशीला बोलावले जाते. जे भाजपच्या हुकुमाशाही विरोधात लढत आहेत. त्यांना नोटीस दिली आहे.
इंडिया आघाडीत फूट पडली आहे. ममता बॅनर्जी स्वतंत्र लढणार आहेत. यावर संजय राऊत म्हणाले, भाजपला हरवणे हेच ममता बॅनर्जी यांचे लक्ष्य आहे. जागा वाटपा बाबत काही तक्रारी आहेत. मात्र, भाजपवला हरवणे हेच लक्ष्य आहे. आपला पंजाबमध्ये जास्त जागा हव्या आहेत. मात्र, तेथे काँग्रेसचे खासदार आहेत त्यामुळे तेथे वाद आहे, असे देखील संजय राऊत म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.