Operation Shivdhanushya : ‘ऑपरेशन शिवधनुष्य’! उबाठाला बालेकिल्ल्यात मोठा धक्का, माजी दोन आमदार शिंदे सेनेत प्रवेश करणार

Uday Samant On Shivsena UBT : राज्यात विविध ठिकाणी ‘ऑपरेशन टायगर' जोर धरत असतानाच उद्धव ठाकरे यांना त्यांच्या रत्नागिरी या बालेकिल्ल्यात मोठा धक्का बसला आहे.
Uddhav Thackeray, Eknath Shinde
Uddhav Thackeray, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri News : राज्यात विविध ठिकाणी ‘ऑपरेशन टायगर' जोर धरत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे अनेक नेते शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. याचदरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात ‘ऑपरेशन शिवधनुष्य’चा प्रारंभ पुन्हा एकदा झाला असून उद्योग मंत्री उदय सामंत यांनी याचे शिवधनुष्य उचलले आहे. ‘ऑपरेशन शिवधनुष्य’मधून 15 फेब्रुवारी पुन्हा एकदा ठाकरे शिवसेनेला खिंडार पाडणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी दौऱ्यावर असून उबाठातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेगा पक्षप्रवेश शिवसेनेत होणार आहे. याबाबतचे संकेत राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

याबाबत अनौपचारिक चर्चेवेळी उदय सामंत यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. यावेळी त्यांनी, पक्षाचे नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 15 तारखेचा दौरा असून ते आभार व्यक्त करण्यासाठी येत आहेत. पण यावेळी शिंदे यांच्या उपस्थितीत उबाठातील अनेक पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी, विद्यमान पदाधिकारी शिवसेनेत पक्षप्रवेश करतील.

यावेळी माजी आमदार सुभाष बने, राजापूरचे गणपत कदम देखील उबाठा सोडून एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वखाली येत आहेत. सामंत यांच्या या माहितीमुळे आता माजी आमदार सुभाष बने, राजापूरचे गणपत कदम शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा खऱ्या ठरल्या आहेत.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Uday Samant : काँग्रेसच्या बड्या नेत्याला शिंदेंच्या शिलेदाराचा टोला; म्हणाले, "तुमच्या पक्षात काय सुरू आहे ते आधी बघा..."

दरम्यान माजी आमदार सुभाष बने, राजापूरचे गणपत कदम यांनी काहीच दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाणे येथील एका कार्यक्रमावेळी भेट घेतली होती. ज्यामुळे राजकीय वर्तुळात सर्वाच्याच भूवया उंचावल्या आहेत. तर त्यांचे स्वागत पालकमंत्री उदय सामंत यांनी केले होते. यामुळे ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्याचे बुरूज लवकरच ढासळतील असे केले जात होते.

आता तर लांजा-राजापूरचे पराभूत उमेदवार व उबाठा शिवसेनेचे नेते राजन साळवी यांच्या देखील शिवसेना प्रवेशाच्या चर्चा समोर येत आहेत. आधी साळवी भाजपमध्ये जाणार असल्याच्या बातम्यांना वेग आला होता. मात्र त्यांच्या प्रवेशाला भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी नकार दिला आहे. यामुळेच साळवी आता प्रमुख कार्यकर्ते यांच्या आग्रही भूमिकेमुळे शिंदे यांच्या शिवसेनेतच प्रवेश करणार असल्याचे ही वृत्त आहे

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Uday Samant Vs Sanjay Raut : 'राज्याचे तिसरे उपमुख्यमंत्री संजय राऊत होणार...', एकनाथ शिंदेंच्या मंत्र्याने स्पष्टच सांगितले

नारायण राणेंना ही बसला होता धक्का

माजी आमदार सुभाष बने, राजापूरचे गणपत कदम आता शिवसेनेत जाणार असलेतरीही ते भाजपचे खासदार नारायण राणे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. नारायण राणे यांनी शिवसेना सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तेंव्हा या दोघांनी राणेंबरोबर काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. मात्र काही काळानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. यामुळे त्यांना हा धक्का मानला जात होता. यानंतर बनेंचा संगमेश्वर विधानसभा मतदारसंघच फेररचनेत विभागला गेल्याने ते राजकीय वनवासात गेले होते. तर तर गणपत कदम यांचा पराभूत झाला.

दरम्यानच्या काही वर्षांत बने शिवसेनेत सक्रीय होते. त्यांनी आपल्या मुलगा रोहन बने विधानसभा निवडणुकीला तिकीट मिळावे म्हणून प्रयत्न केले होते. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही. या नाराजीमुळेच माजी आमदार सुभाष बने आता शिवसेना शिंदे गटाच्या मार्गावर आहेत. त्यांचा लवकरच पक्ष प्रवेश होणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील सुतोवाच केले होते

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com