Municipal Elections : पनवेल भगवामय! शेकाप-महाविकास आघाडीचा धुव्वा, भाजपचा ऐतिहासिक विजय

MVA And Shekap defeat News : कोकणातील रायगड जिल्ह्यातील रायगड जिल्ह्यातील एकमेव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीची त्सुनामी पाहायला मिळाली.
Panvel Municipal Elections; Mahayuti Victory Wins
Panvel Municipal Elections; Mahayuti Victory Winssarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप महायुतीने एकूण 59 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले.

  2. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आरपीआय महायुतीने शेकाप महाविकास आघाडीचा सपशेल पराभव केला.

  3. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महापालिकेवर पुन्हा भाजप महायुतीची सत्ता प्रस्थापित झाली.

Shivsena UBT And NCP Wins News : पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर लागलेल्या निकालात जनतेनं पुन्हा एकदा महायुतीवर विश्वास दाखवल्याचे समोर येत आहे. तर येथे महायुतीच्या त्सुनामीत शेकाप महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला असून भाजपच्या हातात सत्ता दिली आहे. यामुळे आता येथे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) महायुतीची सत्ता येणार असून दादांच्या राष्ट्रवादीसह ठाकरेंच्या शिवसेनेनं खातं उघडलं आहे. काँग्रेसनेही येथे मुसंडी मारली आहे.

राज्यात महापालिकेंच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच 20 प्रभागांच्या आणि 78 जागांच्या पनवेल महानगरपालिकेत भाजप महायुतीच्या सहा तर एक अपक्ष जागा बिनविरोध झाल्या. यामुळे निकालाआधीच येथे महायुतीच्या बाजूने निकाल लागल्याची चर्चा राज्यभर सुरू झाली आहे. यानंतर गुरुवारी (ता.15) 71 जागांसाठी झालेल्या मतदानाचा निकाल आज (शुक्रवारी) जाहीर झाला. ज्यात महायुतीच्या उमेदवारांनी शेकाप महाविकास आघाडीचा सपशेल पराभव करत ५९ जागा जिंकल्या.

निकालानंतर पनवेल महापालिकेवर भाजप महायुतीचा झेंडा फडकवण्यात आमदार प्रशांत ठाकूर यशस्वी झाल्याचे दिसत आहेत. तर पनवेलच्या सुज्ञ मतदारांनी महायुतीवर दाखवलेला विश्वास तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांनी घेतलेली अथक मेहनत हे या यशामागील प्रमुख कारण ठरले आहे.

Panvel Municipal Elections; Mahayuti Victory Wins
Mumbai Municipal Election Results : हार-जीतचा थरार शिगेला! मुंबईत माजी महापौर–उपमहापौरांचा गुलाल, राजकीय शक्तिप्रदर्शन

तर ही निवडणूक पनवेल महानगरपालिका निवडणूक प्रभारी माजी खासदार व लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रमुख आमदार महेश बालदी तसेच जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी हा ऐतिहासिक विजय खेचून आणला.

दरम्यान महायुतीच्या या दणदणीत विजयात मात्र महाविकास आघाडीतील शेतकरी कामगार पक्षाला केवल ९ जागा जिंकता आल्या. काँग्रेसला ४ जागा मिळाल्या तर उबाठाने या निवडणुकीत खाते उघडत ५ जागा जिंकल्या. तसेच शिंदेंच्या शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला दोन दोन जागा जिंकता आल्या आहेत.

भाजपला घाम फोडला

यंदाचा निवडणुकीत शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे मोठी गोची झाल्याचे दिसून आले. या फुटीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार मशाल चिन्ह घेऊन निवडणूक रिंगणात उतरले होते. येथे पाच उमेदवारांना विजय मिळाला. पण सहा ते सात उमेदवारांना निसारडा पराभव पत्करावा लागला.

पण यावेळी प्रत्येक उमेदवारांनी जवळपास तीन हजार मतदान घेतल्याने भाजप उमेदवारांना चांगला घाम फोडला होता. प्रभाग ११ मधील समाधान काशीद यांनी हजार ४६६ मत घेत भाजप उमेदवाराला धक्का दिला होता. पण पुढच्या फेरीत भाजप उमेदवाराचे मत प्लस झाल्याने (१ हजार ५२२) भाजपचा उमेदवार विजयी झाला.

पक्षीय बलाबल

एकूण जागा 78

भाजप 55

शिवसेना -02

राष्ट्रवादी (अप) 02

शेकाप 09

काँग्रेस 04

ठाकरे सेना 05

अपक्ष 01

Panvel Municipal Elections; Mahayuti Victory Wins
Municipal Elections Analysis : 'इनकमिंग पॅटर्न' यशस्वी; मायक्रो प्लॅनिंगपुढे विरोधक फेल : निवडणुकीच्या महा'संग्रमा'त 'भाजप' किंग!

FAQs :

1. पनवेल महापालिकेत एकूण किती जागा आहेत?
पनवेल महानगरपालिकेत एकूण 71 जागांसाठी मतदान झाले होते.

2. भाजप महायुतीने किती जागा जिंकल्या?
भाजप महायुतीने एकूण 59 जागांवर विजय मिळवला आहे.

3. कोणत्या पक्षांची महायुती होती?
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) यांची महायुती होती.

4. विरोधी आघाडी कोणती होती?
शेकाप महाविकास आघाडी भाजप महायुतीविरोधात निवडणूक लढवत होती.

5. या विजयाचे प्रमुख श्रेय कोणाला जाते?
हा विजय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाला दिला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com