Palghar Hospital Rada Case : पालघर मारहाण प्रकरणात शिंदेंनी हाकललेल्या जिल्हाप्रमुखाचा पोलिसांसमोर सरेंडर; कोर्टाने ठोठावली कोठडी

Kundan Sankhe Police Custody Over Relief Hospital Case : पालघर रुग्णालयातील मारहाण प्रकरणात फरार आरोपी आणि आमदार राजेंद्र गावित यांचे पुत्र रोहित गावित याला अटक झाली आहे. तर न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
Palghar Hospital Assault News
Palghar Hospital Assault NewsSarkarnama
Published on
Updated on

Palghar Hospital Assault News : पालघरच्या रिलीफ रुग्णालयातील राडा प्रकरणाने आता आणखी गंभीर वळण घेतले असून या प्रकरणात फरार असलेले नऊ आरोपी पोलिसांत हजर झाले आहेत. तर या सर्वांना पालघरच्या सुट्टीच्या सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. यात एकनाथ शिंदे यांनी पक्षातून हकालपट्टी केलेल्या जिल्हाप्रमुख कुंदन संखेसह प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

पालघरच्या रिलीफ रुग्णालयातील राडा प्रकरणात पुन्हा एकदा शिंदेंच्या शिवसेनेवर टीका होताना दिसत आहे. यावरून शिंदेंनी या प्रकरणात असलेल्या नेते आणि पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केली. तसेच त्यांचे निलंबन केले. दरम्यान या प्रकरणात आमदारपुत्र रोहित राजेंद्र गावित याला अटक झाली. न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

दरम्यान रविवारी फरार असलेले नऊ आरोपी पालघर पोलिस ठाण्यात हजर झाले. ज्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणात एकूण अटक झालेल्या आरोपींची संख्या आता २३ झाली आहे.

Palghar Hospital Assault News
Palghar Crime Case: पालघर रुग्णालय कर्मचार्‍यांना मारहाण प्रकरण: शिवसेना 'आमदार पुत्रा'ला निलंबनानंतर आता पोलिसांचा दुसरा मोठा दणका

पालघरच्या रिलिफ रुग्णालयात ५ सप्टेंबरला दहीहंडीच्या कार्यक्रमात जखमी झालेल्या गोविदांना दाखल करण्यात आले होते. पण उपचार आणि बिलावरून रूग्णालय आणि शिंदेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांत वाद झाला होता. याच वादातून शिवसेना पदाधिकारी कुंदन संखे, साईराज पाटील, राहुल घरत, विकी संखे, शुभम बांदिवडेकर, ऋषभ वारे, तसेच नगरसेवक नीलम संखे, मनोज घरत आणि अन्य व्यक्तींनी रुग्णालयात घुसून धुडगूस घातला होता.

डॉक्टरांना शिवीगाळ करत अर्वाच्य भाषा वापरली होती. तर रुग्णालयातील कर्मचारी विवेक झिंगा यांच्या कानशिलात लगावली होती. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यानंतर पालघर पोलिसांनी १७ जणांविरोधात गुन्हा दाखल करत सीसीटीव्हीच्या आधारे १२ निनावी व्यक्तींना ताब्यात घेतले होते. तर ९ फरार आरोपींचा पोलीस शोध घेत होती.

दरम्यान या हल्ला प्रकरणातील जिल्हाप्रमुख कुंदन संखे, युवासेनाप्रमुख साईराज पाटील, मनीष ऊर्फ विकी संखे, राहुल संखे, ऋषभ वारे, नगरसेवक नीलम संखे, मनोज घरत, शुभम बांदिवडेकर हे आठ जण पोलिस ठाण्यात हजर झाले. याशिवाय अन्य एका आरोपीला अटक करण्यात आली, तो चालक आहे.

Palghar Hospital Assault News
Crime News : धक्कादायक! पोलिसानेच भररस्त्यात कढली महिलेची छेड, पाठलाग करत अश्लील कमेंट...; बहिणीने शूट केला व्हिडिओ

मुख्य आरोपी राहुल घरत आणि अन्य १२ आरोपी तसेच रविवारी अटक करण्यात आलेल्या नऊ जणांना संध्याकाळी पालघरच्या सुट्टीच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सर्वांना बुधवारपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com