Raigad Politics : पनवेल पंचायत समितीत सत्तासंघर्ष! भाजपची लाट की शेकाप गड राखणार? पक्षांतराचा खेळ निर्णायक ठरणार

Panvel Zilla Parishad and Panchayat Samiti elections : रायगड जिल्हा परिषद व पनवेल पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी मंगळवारी (ता.५ फेब्रुवारी) मतदान होणार असून गुरुवारी (ता. ७ फेब्रुवारी) मतमोजणी पार पडणार आहे.
Raigad Politics; Jayant Patil, Ravindra Chavhan
Raigad Politics; Jayant Patil, Ravindra Chavhansarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. पनवेल तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी २.७९ लाखांहून अधिक मतदार मतदान करणार आहेत.

  2. सध्या रायगड जिल्हा परिषदेत शेतकरी कामगार पक्षाकडे बहुमत असून भाजप मजबूत आव्हान देत आहे.

  3. पक्षांतर, मतदान टक्केवारी आणि मतदारांचा प्रतिसाद निकालावर निर्णायक ठरणार आहे.

Panvel News : वसंत जाधव

रायगड जिल्हा परिषद व पनवेल पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या प्रशासनाची जय्यत तयारी सुरू असून राजकीय पक्षांनी प्रचारात वेग घेतला आहे. सध्याच्या राजकीय चित्राचा विचार करता, रायगड जिल्हा परिषदेत ८ गटांपैकी भाजपकडे २ तर शेतकरी कामगार पक्षाकडे ६ गटांची सत्ता आहे. पनवेल पंचायत समितीच्या १६ गणांमध्ये भाजप ६, काँग्रेस ३ आणि शेतकरी कामगार पक्ष ७ गणांवर सत्ताधारी आहे.

शेतकरी कामगार पक्षाने वांवजे, पळस्पे, वावेघर, कर्नाळा, पाली देवद या भागांत पक्षाची मजबूत पकड असल्याचा दावा केला असून, या ठिकाणांहून जिल्हा परिषदेचे पाच व पंचायत समितीचे दहा उमेदवार हमखास निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र गव्हाण व वडघर या भागांत पक्षांतराचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले नेरे येथील उमेदवार रेशमा शेखर शेळके यांचे पती यांनी शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केला आहे. परंतु पळस्पा, वावेघर, कर्नाळा व वडघर येथील जिल्हा परिषदेचे चार विद्यमान सदस्यांनी पक्षांतर केल्याने त्याचा भारतीय जनता पार्टीला फायदा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्याच्या स्थितीत जिल्हा परिषदेतील आठपैकी चार सदस्यांनी पक्षांतर केले असून, पूर्वीचे दोन भाजप सदस्य धरून एकूण सहा सदस्य सध्या भाजपकडे असल्याने जिल्हा परिषद व पंचायत समितीची राजकीय समीकरणे बदलली आहेत.

Raigad Politics; Jayant Patil, Ravindra Chavhan
Zilla Parishad Elections : ऐन रणधुमाळीत भाजपला कोंडीत टाकणारा काँग्रेसचा निर्णय, स्वाभिमानीशी गट्टी करत युती घोषणा; शिरोळचे राजकीय गणितं बदलणार?

या पार्श्वभूमीवर पनवेलमध्ये महाविकास आघाडी आपला गड शाबूत ठेवते की भाजपाची लाट रायगड जिल्हा परिषदेत कमळ फुलवते, हे मतदान व मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. एकूणच ही निवडणूक राजकीयदृष्ट्या अत्यंत चुरशीची ठरण्याची शक्यता असून मतदानाची टक्केवारी व मतदारांचा प्रतिसाद निकालावर निर्णायक ठरेल, असे मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे.

मागील निवडणुकीत पक्षीय बल (शेकाप सत्तेत )

रायगड जिल्हा परिषदेत ८ गटांपैकी भाजपकडे २ तर शेतकरी कामगार पक्षाकडे ६ गटांची सत्ता होती. तर पनवेल पंचायत समितीच्या १६ गणांमध्ये भाजप ६, काँग्रेस ३ आणि शेतकरी कामगार पक्ष ७ गणांवर सत्ताधारी आहे.

पनवेल पंचायत समिती गट व गणात समाविष्ट गावे

वावांजे पंचायत समिती गट

वावंजे, निताळे,नितळस, खेरणे खुर्द, कानपोली, हेदुटणे,वलप, पाले बुद्रुक, कोळवाडी,शिरवली, करंबेली त. तळोजे, महोदर, कोडप, आंबे त तळोजे, वागंणी तर्फे तळोजे, चिंचवली, मोर्बे खैरवाडी, तामसई, कोंडले, खानाव, महाळुंगी,चिंध्रण, वाकडी,हरिग्राम, उमरोली, उसली बुद्रूक

नेरे

दुंदरे, दुंदराई, चिंचवली तर्फे वाजे, आंबे त वाजे, शिवणसई, रिटघर मालढुंगे, धामणी, देहरंग, धोदाणी, वाघाची वाडी, वाजे, वाजापूर, सांगटोली, गाडे, चेरवली, नेरे, नेरेपाडा,केवाळे,चिपळे, भोकरपाडा, कोप्रोली, बोनशेत, विहीघर, आकुली,आदई, नेवाळी.

पालीदेवद

पालीदेवद, शिलोत्तर, रायचूर, देवद, विचुंबे,वांगणी तर्फे वाजे, आंबिवली, पालीखुर्द, लोणीवली, मोहो.

पळस्पे

शिवकर, उसलीखुर्द, डेरवली,पळस्पे कोळखे, कोळखेपेठ,चिखले, सांगडे वारदोली, बेलवली, माची प्रबळ भिंगार, भेरले, शेंडुग, भिंगारवाडी कोन, बोले, आजिवली.

वावेघर

पोयंजे,कातकरवाडी, पाली बु, मोहपे,बारवई,खानावळे, भोकरपाडा कसळखंड, आष्टे, आरिवली, भाताण, देवळोली बु, सोमटणे, दहिवली, नारपोली,गिरवले, सावळे,पोसरी, जाताडे,गुळसुंदे, आकुळवाडी, लाडीवली दापीवली, वावेघर, तुराडे.

वडघर

कुंडेवहाळ, बंबावी,करंजाडे, नानोशी, पाटणोली, मानघर, मोसारे नांदगाव, कुडावे, वडवली, सांगुर्ली, चिचवण, चिरवत, तुरमाळे,वडघर, कोपर,पारगांव, पारगावडुंगी, वाघिवली, दापोली

गव्हाण

ओवळे,वहाळ, पाडेघर,उलवा, सोनखार,तरघर,न्हावे,गव्हाण, खारकोपर

केळवणे

साई, कासारभट, केळवणे दिघाटी,कर्नाळा, बारापाडा, डोलघर, कल्हे, शिरढोण, आपटा, सारसई, माडभुवन, कोरळ,चावणे, सवणे, काळीवली, कराडेखुर्द, कासप, जांभिवली, कराडे बु, घेराकिल्ला माणिकगड

पनवेल पंचायत समिती गणाची यादी

1) वावंजे

2) चिंधरण

3) नेरे

4) आदई

5) पालीदेवद

6) विचुंबे

7) पळस्पे

8) कोण

9) पोयंजे

10) वावेघर

11) करंजाडे

12) वडघर

13) वहाळ

14) गव्हाण

15) केळवणे

16) आपटा

Raigad Politics; Jayant Patil, Ravindra Chavhan
Zilla Parishad Election 2026: शिवसेना-भाजप युतीनंतर महाविकास आघाडीचही जमलं

FAQs :

1) पनवेल तालुक्यात किती मतदार आहेत?
👉 पनवेल तालुक्यात एकूण २,७९,७७६ मतदार आहेत.

2) जिल्हा परिषदेत सध्या कोणाकडे सत्ता आहे?
👉 रायगड जिल्हा परिषदेत सध्या शेतकरी कामगार पक्षाकडे बहुसंख्य गट आहेत.

3) पंचायत समितीत कोणत्या पक्षांची ताकद आहे?
👉 पंचायत समितीत भाजप, काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष यांच्यात सत्ता विभागलेली आहे.

4) या निवडणुकीत निर्णायक घटक कोणते असतील?
👉 मतदान टक्केवारी, पक्षांतर आणि मतदारांचा प्रतिसाद निर्णायक ठरेल.

5) भाजपला रायगडमध्ये सत्ता मिळण्याची शक्यता आहे का?
👉 राजकीय समीकरणांनुसार भाजपला संधी आहे, मात्र अंतिम निकाल मतदानानंतर स्पष्ट होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com