nominated councillor Politics : उपनगराध्यक्षासह स्वीकृत नगरसेवकपदासाठी राजकीय हालचालींना वेग, चढाओढ अन् पक्षांची नावांबाबत गुप्तता

Chiplun Nagar Parishad Politics : चिपळूणच्या उपनगराध्यक्षपदासह तीन स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीची प्रक्रिया पुढच्या आठवड्यात होणार आहे. त्यासाठी आता जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे.
Shivsena-BJP
Shivsena-BJPSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. चिपळूणमध्ये उपनगराध्यक्ष व तीन स्वीकृत नगरसेवकांची निवड सोमवारी दुपारी २.३० वाजता होणार आहे.

  2. शिवसेना (शिंदे), भाजप व ठाकरे शिवसेना यांना प्रत्येकी एक स्वीकृत नगरसेवक देण्याची तरतूद आहे.

  3. नाराजी टाळण्यासाठी पक्षांनी नावांबाबत गुप्तता पाळली असून स्वीकृत नगरसेवकपदासाठी मोठी चढाओढ आहे.

Chiplun News : चिपळूणच्या उपनगराध्यक्षपदासह तीन स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीची प्रक्रिया सोमवारी (ता. १२) दुपारी २.३० वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात होणार आहे. शिवसेना (शिंदे), भाजप आणि ठाकरे शिवसेना यांना नियमानुसार प्रत्येकी एक स्वीकृत नगरसेवक देता येणार असल्याने या पदांसाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. नाराजी टाळण्यासाठी संबंधित पक्षांनी नावांबाबत गुप्तता पाळली आहे. मात्र सद्यःस्थितीत उपनगराध्यक्ष पदापेक्षा स्वीकृत नगरसेवकपदासाठी चढाओढ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

शिंदेंच्या शिवसेनेकडे नगराध्यक्ष पद असल्याने साहजिकच उपनगराध्यक्षपद भाजपकडे जाण्याची शक्यता आहे. भाजपच्या गटनेतेपदी शशिकांत मोदी यांची निवड झाल्याने महिला नगरसेविकांना या पदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये रसिका देवळेकर यांचे नाव आघाडीवर आहे.

तसेच २८ नगरसेवकांच्या संख्येनुसार तीन स्वीकृत नगरसेवक निवडले जाणार आहेत. ९ जागा मिळवलेल्या शिवसेना (शिंदे गट), ७ जागा मिळवलेल्या भाजप आणि ५ जागा मिळवलेल्या ठाकरे शिवसेनेला प्रत्येकी एक स्वीकृत नगरसेवक देण्याचा मान मिळणार आहे. या पदांसाठी ९ जानेवारीला दुपारी २.३० वाजेपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करावे लागणार आहेत.

Shivsena-BJP
Congress In Nagar Parishad : पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसचे दिग्गज फेल : फक्त पतंगराव कदमांच्या लेकाने राखली पक्षाची लाज

१२ जानेवारीला नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांची निवड प्रक्रिया होणार आहे. उपनगराध्यक्षसाठी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत इच्छुकांनी मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्याकडे अर्ज सादर करायचे आहेत.

त्यानंतर नगराध्यक्ष सकपाळ अर्जांची छाननी करून वैध उमेदवारांची नावे जाहीर करतील. दुपारी १.४५ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार असून, २ वा. निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची अंतिम नावे घोषित केली जातील.

ही नावे आहेत चर्चेत

शिंदे शिवसेनेकडून विकी लवेकर व पराभूत उमेदवार सुयोग चव्हाण यांची नावे आघाडीवर आहेत. भाजपकडून महेश दीक्षित, विनायक वरवडेकर, मंगेश ऊर्फ बाबू तांबे, आशीष खातू, उदय चितळे तसेच अल्प मतांनी पराभूत झालेल्या रूही खेडेकर, तर शिवसेना ठाकरे गटाकडून माजी नगरसेवक बाळा कदम व फैसल कास्कर यांची नावे चर्चेत आहेत.

Shivsena-BJP
Nagar Parishad Result : सुनील शेळके - बाळा भेगडेंच्या जोडीची कमाल : एकहाती जिंकलं तळेगावचे मैदान

FAQs :

1. चिपळूणमधील निवड प्रक्रिया कधी व कुठे होणार आहे?
→ सोमवारी (ता. १२) दुपारी २.३० वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात होणार आहे.

2. एकूण किती स्वीकृत नगरसेवकांची निवड होणार आहे?
→ एकूण तीन स्वीकृत नगरसेवकांची निवड होणार आहे.

3. कोणत्या पक्षांना स्वीकृत नगरसेवक देण्याची संधी आहे?
→ शिवसेना (शिंदे), भाजप आणि ठाकरे शिवसेना.

4. सध्या कोणत्या पदासाठी अधिक चढाओढ आहे?
→ उपनगराध्यक्षपदापेक्षा स्वीकृत नगरसेवकपदासाठी अधिक चढाओढ सुरू आहे.

5. पक्षांनी नावांबाबत गुप्तता का पाळली आहे?
→ पक्षांतर्गत नाराजी टाळण्यासाठी गुप्तता पाळण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com