Political earthquake In Shivsena : कोकणात राजकीय भूकंप! ऐन निवडणुकीत भाजपने वचपा काढला, शिदेंच्या दोन बड्या नेत्यांना लावलं गळाला

Zilla Parishad elections Politics : भारतीय जनता पक्षाने जिल्हा परिषद गटासाठी तालुक्याबाहेरील उमेदवार आयात केल्याने स्थानिक निष्ठावंतांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. यातूनच 'सुधागड सन्मान समिती' उभी झाली होती.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on
Summary
  • सुधागड तालुक्यात शिंदे शिवसेनेचे प्रमुख नेते भाजपमध्ये प्रवेश केल्याने मोठी खळबळ उडाली.

  • या प्रवेशामुळे भाजपची ताकद लक्षणीय वाढली असून शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.

  • जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड निर्णायक ठरू शकते.

Raigad News : अमित गवळे

सुधागड तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हा संपर्कप्रमुख मिलिंद देशमुख आणि तालुकाप्रमुख रवींद्र देशमुख यांनी बुधवारी (ता. 21) शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या प्रवेशामुळे सुधागडात शिंदे शिवसेनेला मोठा धक्का बसला असून भाजपची ताकद दुपटीने वाढली आहे.

उन्हेरे येथे आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात भाजप जिल्हाध्यक्ष तथा खासदार धैर्यशील पाटील आणि ज्येष्ठ नेते प्रकाश देसाई यांनी या सर्व नेत्यांचे पक्षात स्वागत केले. 'सुधागड सन्मान समिती'च्या माध्यमातून भाजपला एकाकी पाडण्याचे विरोधकांचे प्रयत्न सुरू असतानाच, देशमुखांच्या या प्रवेशाने विरोधकांच्या रणनीतीला सुरुंग लागला आहे.

यावेळी खासदार धैर्यशील पाटील म्हणाले की, "सुधागडचा विकास झपाट्याने करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे होते. मिलिंद आणि रवींद्र देशमुख यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता विकासाच्या मुद्द्यावर प्रवेश केला आहे. आता सुधागड आणि पेणची नाळ अधिक घट्ट झाली आहे. प्रकाश देसाई यांनी दावा केला की, या दोन बलाढ्य शक्तींच्या आगमनाने आता तालुक्यात केवळ भाजपच शिल्लक राहिली असून आम्ही सर्व जागांवर एकहाती विजय मिळवू.

Eknath Shinde
Shivsena vs BJP : बंडखोर नेत्याला एकनाथ शिंदेंकडून पुन्हा 'चान्स'; थेट जिल्हाप्रमुख पदावर नियुक्ती : भाजपच्या नेत्यांमध्ये शिवसेनेविरोधात असंतोष

प्रवेशकर्ते मिलिंद आणि रवींद्र देशमुख यांनी सांगितले की, खासदार धैर्यशील पाटील व आमदार रवींद्र पाटील यांच्या विकासकामांवर प्रभावित होऊन सुधागडच्या शाश्वत विकासासाठी आम्ही भाजपात प्रवेश केला आहे.

यावेळी सतीश देसाई, अशोक कांबळे, यशवंत पालवे, रवींद्र देशमुख, मिलिंद देशमुख, भाजप सुधागड तालुकाध्यक्ष श्रीकांत ठोंबरे, पाली नगराध्यक्ष पराग मेहता, विठ्ठल सिंदकर, भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष आलाप मेहता, आरिफ मणियार, मनोहर देशमुख, प्रणाली शेठ, राकांत भगत, प्रकाश ठोंबरे, अजय खंडागळे, किशोर जोशी,मनोहर देशमुख आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Eknath Shinde
Shivsena UBT News : उद्धव ठाकरेंनी जिल्हाप्रमुख केलेला नेता अब्दुल सत्तारांनी 24 तासांत फोडला; मुलगी ZP च्या मैदानात

FAQs :

1) सुधागड तालुक्यात नेमकी कोणती राजकीय घटना घडली?
शिंदे शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख मिलिंद देशमुख आणि तालुकाप्रमुख रवींद्र देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

2) या प्रवेशात किती कार्यकर्ते सहभागी झाले?
शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे भाजपमध्ये प्रवेश केला.

3) याचा शिंदे शिवसेनेवर काय परिणाम होईल?
शिंदे गटाची संघटनात्मक ताकद कमी होऊन मोठा राजकीय धक्का बसला आहे.

4) भाजपला याचा कसा फायदा होणार आहे?
भाजपची स्थानिक ताकद दुपटीने वाढून निवडणुकीत आघाडी मिळण्याची शक्यता आहे.

5) ही घटना कोणत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडली आहे?
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या रणधुमाळीत ही मोठी घडामोड घडली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com