Shivsena Vs BJP : शिवसेनेचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रेंना धक्का; ऐन निवडणुकीत मुख्य शिलेदाराने साथ सोडली

Akkalkot Politic's : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाबासाहेब पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे सिद्धाराम म्हेत्रेंना धक्का बसला असून, या घडामोडीचा स्थानिक राजकारणावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Babasaheb Patil Join BJP
Babasaheb Patil Join BJPSarkarnama
Published on
Updated on

Akkalkot, 30 January : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक मध्यावर आलेली असतानाच माजी मंत्री तथा शिवसेना नेते सिद्धाराम म्हेत्रे यांना मोठा धक्का बसला आहे. म्हेत्रे यांचे समर्थक आणि शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबासाहेब पाटील यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात आज (ता. ३० जानेवारी) प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशाचा भाजपला फायदा होऊ शकतो, असे मानले जात आहे.

अक्कलकोट (Akkalkot) येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबासाहेब पाटील यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश केला. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी पाटील यांचे भाजपचे उपरणे घालून बाबासाहेब पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले.

शिवसेनेचे (Shivsena) तालुकाप्रमुख बाबासाहेब पाटील हे सलगर गटातून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक होते. त्यासाठी पाटील यांनी गेल्या पाच ते सहा वर्षांपासून तयारी केलेली होती. पण, सलगर जिल्हा परिषद गटातून माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे चिरंजीव शिवराज म्हेत्रे यांना उमेदवारी देण्यात आलेली होती.

जिल्हा परिषदेची उमेदवारी न मिळाल्याने तालुकाप्रमुख बाबासाहेब पाटील शिवसेनेत नाराज होते. गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज असलेल्या पाटील भाजपत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पाटील यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला.

Babasaheb Patil Join BJP
Phaltan Politic's : रामराजेंचा एक नकार अन् सुरु झाला एकमेकांचं अस्तित्व राजकीय संपवणारा संघर्ष...

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या माध्यमातून अक्कलकोट शहर आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे होत आहेत. शहराच्या आणि तालुक्याच्या विकासासाठी आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे, असे बाबासाहेब पाटील यांनी भाजप प्रवेशानंतर सांगितले.

Babasaheb Patil Join BJP
NCP Update : प्रफुल पटेलांचा दिलीप वळसे पाटील यांना फोन; ‘तातडीने मुंबईला या...’

अक्कलकोटचे नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, भाजपचे अक्कलकोट मंडलाचे अध्यक्ष प्रदीप पाटील, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष नन्नू कोरबू, उपनगराध्यक्ष बंटी राठोड, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड आदी या पक्षप्रवेशाला उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com