Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra FadnavisSarkarnama

Ajit Pawar NCP : चिपळूणमध्ये महायुतीला तडा? निवडणुकीपूर्वीच ‘दादां‌’च्या राष्ट्रवादीने ठोकला शड्डू

Local Body Election in Chiplun : तळकोकणात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुकीसाठी आता राजकीय पक्षांची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे.
Published on
Summary
  1. अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम यांनी महायुतीतील जागा वाटपाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

  2. त्यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसचा रत्नागिरी जिल्ह्यात मजबूत पाया असून सन्मानाने वाटा मिळाला नाही तर पक्ष स्वतंत्र लढेल.

  3. या वक्तव्यानंतर चिपळूण आणि जिल्ह्यात महायुती तुटण्याची शक्यता वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Ratnagiri News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजू लागले आहे. जिल्हा परिषदेसह पंचायत समिती, पालिका आणि नगरपंचायतींचे आरक्षण जाहीर झाले आहे. दिवाळीनंतर पालिका, नगरपंचायत आणि डिसेंबरमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर राजकीय फटाके फुटणार आहेत. पण त्याआधीच येथे नगर परिषद निवडणुकीच्या जागावाटपाचा संघर्षाची ठिणगी पडली आहे. महायुती होवो न होवो पण सर्वच पक्षाकडून स्वबळाची तयारी सुरू झाली असून ‘दादां‌’च्या राष्ट्रवादीने शड्डू ठोकला आहे.

पक्षाचे आमदार शेखर निकम यांनी याबाबत भाष्य करताना थेट महायुतीलाच इशारा दिला आहे. त्यांनी, जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे. जागावाटपात चिपळूणसह जिल्ह्यात आमच्या पक्षाला सन्मानाने वाटा मिळावा. सन्मानपूर्वक युती न झाल्यास आम्ही स्वतंत्र लढण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. यामुळे निवडणुकीपूर्वीच चिपळूणमध्ये महायुती होण्याची शक्यता मावळल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या चार वर्षापासून प्रलंबित आहेत. गेल्या चार वर्षापासून या स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासकीय राजवट आहे. त्याचा विकासकामावर मोठा परिणाम झाला आहे. लोकसभा आणि विधानसभेचा कल महायुतीच्या पदरात पडला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महायुती एकत्रित लढणार असे तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते बोलत आहेत. मात्र जिल्हा परिषदेसह पंचायत समिती, पालिका आणि नगरपंचायतींचे आरक्षण जाहीर होताच आता महायुतीत ठिणगी पडल्याची स्थिती आहे.

Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Mahayuti Politics : रवींद्र धंगेकरांची कानउघडणी, भाजप नेत्यांवर आरोप केल्याने एकनाथ शिंदे नाराज

भाजपच्या कोकण विभागीय मुंबईतील विशेष बैठकीनंतर चिपळूण पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. यावेळी आमदार शेखर निकम यांनी आगामी चिपळूण नगर परिषद निवडणुकीत महायुती न झाल्यास स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचे सांगितले. यामुळे चिपळुणात महायुती होण्याची शक्यता मावळली असल्याचा अंदाज राजकीय अभ्यासकांनी वर्तवला. तसेच निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापूर्वीच दादांच्या राष्ट्रवादीने शड्डू ठोकल्याचेही आता बोलले जात आहे.

शेखर निकम स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या. यामध्ये झालेल्या चर्चेत, महायुती करण्यासंदर्भात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घ्यावा. युती होत नसेल तर स्वबळावर निवडणुका लढवण्याची तयारी कार्यकर्त्यांनी ठेवावी. तर इच्छुक उमेदवारांचे अर्ज पक्षाकडे मागवले जातील त्यासाठी पार्लमेंटरी बोर्ड स्थापन करण्यात येईल. याचे प्रमुख प्रांतिकचे उपाध्यक्ष शौकत मुकादम असतील अशी ग्वाही दिलीय.

निकम यांच्या पत्नीला पुन्हा संधी

दरम्यान चिपळुणात जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीत दिग्गजांचा पत्ता कट झाला आहे. तालुक्यातील सावर्डे, कळवंडे, पेढे, अलोरे आणि वहाळ जिल्हा परिषद गटासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण पडले आहे. यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सावर्डेत आमदार शेखर निकम यांच्या पत्नी माजी सभापती पूजा निकम यांना उमेदवारीची संधी मिळू शकते.

Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Mahayuti Politic's : महामंडळ वाटपाची तटकरेंनी सांगितली डेडलाईन; पुढच्या आठवड्यातील ‘या’ दिवशी होणार फैसला!

FAQs :

1. शेखर निकम यांनी महायुतीबाबत काय वक्तव्य केले आहे?
→ सन्मानपूर्वक जागा वाटप न झाल्यास आम्ही स्वतंत्र लढण्यास तयार आहोत, असे त्यांनी म्हटले.

2. ते कोणत्या पक्षाचे आमदार आहेत?
→ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत.

3. ही निवडणूक कोणत्या पातळीवर होणार आहे?
→ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पातळीवरील निवडणुका आहेत.

4. कोणत्या भागात महायुतीबाबत वाद निर्माण झाला आहे?
→ चिपळूण आणि रत्नागिरी जिल्ह्यात.

5. या वक्तव्यानंतर राजकीय वातावरणात काय चर्चा सुरू झाली आहे?
→ महायुती तुटण्याची आणि राष्ट्रवादीने स्वतंत्र लढण्याची शक्यता वाढल्याची चर्चा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com