Prakash Ambedkar Torrent Power : टोरंटकडून कोणी किती निधी घेतला? प्रकाश आंबेडकरांनी भाजप-काँग्रेससह सर्वांचीच पोलखोल केली; थेट विचारलं, 'तुम्ही कोणाच्या बाजूने?'

Prakash Ambedkar questions BJP, Congress and other parties over alleged electoral bond donations from Torrent Power amid the Karjat farmers' protest : कर्जतमधील टोरंट पॉवर प्रकल्पावरून राजकीय वातावरण तापले; भाजपला 137 कोटी, काँग्रेसला 22 कोटी मिळाल्याचा आंबेडकरांचा दावा; अमित शाह यांच्या मुलाच्या संबंधांबाबतही खळबळजनक विधान.
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSarkarnama
Published on: 
Updated on: 

Torrent Power Political Donations : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात साई डोंगर परिसरात टोरंट पॉवर लिमिटेड कंपनीतर्फे उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाला विरोध करण्यावरून राजकीय रणकंदन पेटलेले असतानाच,वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राजकीय पक्षांनी टोरंट पाॅवरकडून घतलेल्या निधीची पोलखोल करत, तुम्ही नेमके कोणाच्या बाजूने आहात, असा सवाल केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते राहुल गांधींपासून ते समाजवादी पक्षाच्या नेते यांना प्रश्न करत तुम्ही कोणाबरोबर आहात. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या मुलाच्या संबंधाबाबतही प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक खुलासा केला.

प्रकाश आंबेडकर यांनी, टोरंट पॉवरने ईलेक्ट्रोल बॉण्ड घेऊन राजकीय पक्षांना पक्ष निधी दिल्याचा दावा करताना, भाजपला (BJP) 76 कोटी, भारतीय काँग्रेस पार्टी 17 कोटी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडतीन कोटी, शिवसेनेला तीन कोटी आणि आम आदमी पार्टीला सात कोटी रुपये दिल्याचे म्हटले आहे.

टोरंट पॉवरचा एक प्रोजेक्ट टोरंटो फार्मसिटीक्युल डोनेशन नावाने आसामच्या सिलिगुडीमध्ये आहे. या कंपनीने सुद्धा ईलेक्ट्रोल बॉण्ड विकत घेऊन भाजपला 61 कोटी रुपये दिलेत हे सांगताना, तिथे सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाला सात कोटी, काँग्रेसला पाच कोटी, समाजवादी पक्षाला तीन कोटी, आम आदमी पक्षाला एक कोटी आणि सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट 50 लाख रुपये दिल्याचा दावा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला.

Prakash Ambedkar
India Alliance Rally : रॅलीला दांडी मारणाऱ्या 60 पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसने 'करेक्ट कार्यक्रम' केला! महाराष्ट्रातही निलंबनाचा बडगा?

आतापर्यंत भाजप 137 कोटी रुपये आणि काँग्रेस पक्षाला 22 कोटी रुपये या कंपनीकडून मिळाले आहेत. हे सर्व डोनेशन 2022-24 साली देण्यात आले आहे, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे नेते, टोरंटच्या निधीचे लाभार्थ्या सर्व पक्षांना प्रकाश आंबेडकर यांनी, तुम्ही कोणासोबत? असा प्रश्न केला.

Prakash Ambedkar
Nitesh Karale New Political Party : शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून हकालपट्टी, आता कराळे मास्तर नवा पक्ष काढणार? सहा जिल्ह्यांचा दौरा ठरला!

टोरंट कंपनीचा आयपीएलशी संबंध आहे. भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शाहच्या मुलाशीही याचा संबंध आहे, असे खळबळजनक दावा देखील प्रकाश आंबेडकर यांनी केला. ज्यांनी टोरंटकडून निधी घेतला ते सर्व राजकीय पक्ष, त्यांचे नेते हे रायगडच्या कर्जतमध्ये शेतकऱ्यांना भेटले, त्यांनी सांगितले की आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत. हे राजकीय डोनेशन घेतल्यानंतर हे राजकीय पक्ष टोरंट ग्रुपसोबत उभे राहणार की सह्याद्री बचावासाठी लढणाऱ्या लोकांसोबत उभे राहणार? याचा खुलासा या सर्व लाभार्थी पक्षांनी केला पाहिजे, अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.