Nitesh Karale New Political Party : शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून हकालपट्टी, आता कराळे मास्तर नवा पक्ष काढणार? सहा जिल्ह्यांचा दौरा ठरला!

Nitesh Karale hints forming new political outfit after expulsion from Sharad Pawar NCP. Six-district tour planned before his Diwali decision : नागपूर पदवीधर निवडणुकीत 25 हजारांवर मते मिळवल्यानंतर नीतेश कराळेंनी स्वतंत्र राजकीय संघटनेचे दिले संकेत; दिवाळीनंतर लोकांशी संवाद साधून घेणार अंतिम निर्णय, शरद पवारांशी वैयक्तिक संबंध कायम असल्याचाही दावा.
Nitesh Karale
Nitesh KaraleSarkarnama
Published on: 
Updated on: 

New Political Party : फुले-शाहू-आंबेडकर विचारसरणीवर काम करणार, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या सभा गाजवणारे, नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रस्थापितांना घाम फोडणारे, यातून शेवटी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून सहा वर्षांसाठी निलंबित झालेले, नीतेश कराळे मास्तर यांनी नवीन राजकीय संघटना, पक्ष स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

दिवाळीनंतर नवीन राजकीय संघटना येण्याचे संकेत देताना, राज्यातील सहा जिल्ह्यांचा दौरा करून, लोकांशी संवाद साधून, त्यानंतर कराळे मास्तर निर्णय घेणार असल्याचे संकेत दिले आहे.

नागपूर विधानपरिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजित वंजारी यांच्या विरोधात अपक्ष म्हणून नीतेश कराळे (Nitesh Karale) मास्तरांनी अर्ज दाखल केल्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने नीतेश कराळे यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे. या निवडणुकीत त्यांना 25 हजारांहून अधिक मते मिळाली होती.

या कारवाईनंतर कराळे मास्तरांचा भावनिक बांध फुटला होता. अश्रू अनावर झाले होते. यातून सावरत पुढे राजकीय इशारा दिला होता. आता निवडणूक महाविकास आघाडीचे (MVA) अभिजित वंजारी यांचा विजय आहे. कराळे मास्तर देखील सावरले आहेत. आता पुन्हा राजकीय आगमन करण्याचे यासाठी कराळे मास्तरांनी तयारी केली आहे. पण कोणताही निर्णय घाईघाईत घेणार नाही, असेही कराळे मास्तर यांनी स्पष्ट केले.

Nitesh Karale
India Alliance Rally : रॅलीला दांडी मारणाऱ्या 60 पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसने 'करेक्ट कार्यक्रम' केला! महाराष्ट्रातही निलंबनाचा बडगा?

एका वृत्तवाहिनीशी बोलताना भाजप नाही, राष्ट्रवादी नाही, थेट नवीन राजकीय संघटना निर्माण करायची, असे संकेत कराळे मास्तरांनी दिले आहे. यासाठी राज्यातील सहा जिल्ह्यांचे दौरे करायचे नियोजित केले आहे. यासाठी लोकांशी संवाद साधण्याची तयारी देखील केली आहे. कराळे मास्तरांनी ही भूमिका कायम ठेवल्यास आगामी राजकारणात आणखी एक नवीन संघटना येऊन, त्याचा परिणाम दिसेल याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

Nitesh Karale
Nilesh Lanke Balasaheb Thorat Statement : विखेंना शह की थोरातांशी जवळीक? नीलेश लंकेंनी सांगितला अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीचा 'तिसरा पर्याय'; म्हणाले, 'बाळासाहेब माझे नेते!'

शरद पवार यांच्याशी असलेल्या संबंधावर कराळे मास्तर यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, शरद पवार यांच्याशी वैयक्तिक चांगले संबंध आहे. वर्धा येथे लवकरच मोठी अकादमी सुरू करतो आहे. तिच्या उद्घाटनासाठी शरद पवार यावे, अशी विनंती केली आहे. त्यांनी येणार असल्याचे आश्वासन देखील दिले आहे. या निमंत्रणासाठी आपण लवकरच शरद पवार यांची भेट घेणार आहोत. ही भेट म्हणजे, राष्ट्रवादी प्रवेश नसणार आहे, अशीही भूमिका कराळे मास्तर यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.