BJP vs Congress : "त्या दिवशी इंदिरा गांधी जयंती, भारत जिंकला पाहिजे होता; मग खरी पनौती कोण?" राणेंचा सवाल

Nitesh Rane on Rahul Gandhi : पंतप्रधान मोदींवर टीका करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भाजप आमदार नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिले आहे...
PM Modi, Rahul Gandhi, Nitesh Rane
PM Modi, Rahul Gandhi, Nitesh RaneSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics News : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाल्याने काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका केली होती. पंतप्रधान "मोदी म्हणजे पनौती" आहेत, असे राहुल गांधी म्हणाले होते.

यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजप आमदार नितेश राणे यांनी इंदिरा गांधींच्या जयंतीचा उल्लेख करत काँग्रेसवर टीका केली आहे. यासोबतच शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला आहे.

PM Modi, Rahul Gandhi, Nitesh Rane
Rahul Gandhi On Modi : " मोदी म्हणजे पनौती, भारतीय टीम चांगलं खेळत होती पण..."; राहुल गांधींनी डिवचलं

राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर पनौती अशी टीका केल्याने भाजप नेते संतापले आहेत. भाजप आमदार नितेश राणे यांची आज सिंधुदुर्गात पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत नितेश राणे यांनी थेट गांधी घराण्यावरच बोट ठेवलं.

राहुल गांधींनी पनौती ह्या शब्दावर मोठे वक्तव्य करण्याचे धाडस केले आहे. 19 नोव्हेंबरला इंदिरा गांधींची जयंती. मग भारत जिंकला पाहिजे होता, मग खरी पनौती कोण? असा सवाल करत नितेश राणेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रपिता आहेत, असे ते म्हणाले.

"जो आपल्या देशाचा नाही त्या राहुल गांधींना देश प्रेम कधीच कळणार नाही", असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे. राहुल गांधींचे समर्थन केल्यावरून नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. "आज सकाळी 10 जनपथचे नवीन कामगार ज्यांचा पगार राहुल गांधीकडून येतोय.

ते आज नॅशनल हेराल्डची बाजू मांडताना दिसले. नॅशनल हेराल्डची बाजू मांडण्यासाठी काँग्रेस जे काम करते तेच काम आता सामना करत आहे. गांधी कुटुंबीयांवर झालेल्या कारवाईवर समर्थन करणे म्हणजे भ्रष्टाचाराला समर्थन आहे. प्रबोधन ट्रस्टच्या नावाने हेराल्डची भूमिका होताना दिसत आहे. दोघांचा ढाचा एकच आहे", असे आमदार नितेश राणे म्हणाले.

PM Modi, Rahul Gandhi, Nitesh Rane
Ramesh Bidhuri Controversial Statement : दानिश अलींविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य भाजप खासदार बिधुरींना भोवणार!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com