

Raigad News : रायगड जिल्ह्यात काँग्रेसमध्ये उत्तर आणि दक्षिण अशी दोन भागात विभागणी केल्यानंतर मोठा वाद उफाळला आहे. तर महेंद्र घरत यांची अध्यक्षपदावरून तडकाफडकी हकालपट्टी करताच राजकीय वादळ आले असून काँग्रेसमध्ये बंड सुरू झाले आहे. तर तब्बल 50 हून अधिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने खळबळ उडाली आहे. तर घरत यांनी अद्याप त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नसून लवकरच त्यांचे समर्थक प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर घरत आपली भूमिका स्पष्ट करतील, असे पनवेल जिल्हाध्यक्ष ओबीसी अध्यक्ष वैभव पाटील यांनी सांगितले.
रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदावरून घरत यांची तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली असून घरत यांना भाजप नेते रामशेठ ठाकूर यांच्याशी असलेली जवळीक भोवल्याची चर्चा आहे. तर रायगड जिल्ह्याची उत्तर आणि दक्षिण अशी दोन भागात विभागणी केल्यानंतर घरत यांनी व्यक्त केलेली नाराजीच या कारवाईच्या मागे असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान आता रायगड काँग्रेसमध्ये बंड सुरू झाले असून नाराजीचा मोठा भडका उडाला आहे.
घरत यांनी उत्तर रायगड जिल्हा अध्यक्षपदाबाबत सुचविलेल्या नावाचा विचार देखिल करण्यात न आल्याने काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या नाराजीचा स्फोट झाला आहे. उरण तालुका काँग्रेस अध्यक्ष विनोद म्हात्रे यांच्यासह 50 हून अधिक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.
आता घरत यांची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी नव्या नियुक्त्या केल्या आहेत. रायगड जिल्ह्याची उत्तर आणि दक्षिण अशी दोन भागात विभागणी करण्यात आली आहे.
तर उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी जिल्हा परिषद सदस्य डॉ. मनीष पाटील आणि दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी राजेंद्र ठाकूर यांच्याकडे देण्यात आली आहे. दरम्यान केंद्रीय निरीक्षक रागिणी नायर यांच्या रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यानंतरच जिल्ह्यात बदलाची चर्चा सुरू झाली होती. ज्यावर आता शिक्कामोर्तब झाला असून घरत यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.