

कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना पुन्हा वेग आला आहे.
डीके शिवकुमार यांच्या निकटवर्तीयाने बदलाची संभाव्य तारीख सांगितल्याने खळबळ उडाली.
काँग्रेस हायकमांड 2028 निवडणुका लक्षात घेऊन सध्या निर्णय पुढे ढकलण्याच्या भूमिकेत.
congress High command decision news : एकीकडे कर्नाटकात पुन्हा एकदा मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना जोर धरला आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे निकटवर्तीय आणि रामनगरचे आमदार इक्बाल हुसेन यांनी थेट मुख्यमंत्री बदलाची तारीखच सांगितली. यामुळे कर्नाटकात खळबळ उडाली. दरम्यान राज्यात २०२८ च्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कर्नाटकातील नेतृत्व बदलाबाबत काँग्रेस हायकमांड अत्यंत सावधगिरीने पावले टाकली आहेत. यामुळे तूर्त तरी कर्नाटकातील नेतृत्व बदलास ब्रेक लागण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू होत्या. पण पाच राज्यातील निवडणुकींच्या पार्श्वभूमिवर त्या शांत झाल्या होत्या. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार देखील आसाम राज्यात विधानसभेच्या निवडणुकीत व्यस्त होते. पण या निवडणुकींचा निकाल लागताच कर्नाटकात नेतृत्व बदलाचा बॉम्ब फुटेल. १५ मे रोजी शिवकुमार राज्याचे नवे मुख्यमंत्री होतील, असा दावाच रामनगरचे आमदार इक्बाल हुसेन यांनी केला होता.
काही दिवसांच्या आधी तब्बत ३० आमदारांनी बंडाचा पवित्रा घेत दिल्ली गाठली होती. त्यांनी सरकारमध्ये फेरबदल करण्याची मागणी केली होती. या दोन्ही राजकीय घडामोडींमुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांची खुर्ची धोक्यात असल्याचे बोलले जात होते. पण आता काँग्रेस हायकमांड यांच्या सावधगिरीमुळे सध्यातरी कर्नाटकातील नेतृत्व बदलास खो लागला आहे.
राज्यात २०२८ च्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कर्नाटकातील नेतृत्व बदलाबाबत काँग्रेस हायकमांड अत्यंत सावधगिरीने पावले टाकण्याची शक्यता आहे, कारण सध्या काँग्रेससमोरील सर्वात मोठे आव्हान सत्ताविरोधी लाटेला रोखणे हे आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील कोणत्याही गटाच्या दबावाला पक्षश्रेष्ठी सहजासहजी बळी पडण्याची शक्यता नाही.
काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह वरिष्ठ नेत्यांना सिद्धरामय्या यांना पक्षाचा निर्विवाद चेहरा कायम ठेवायचा आहे. तर शिवकुमार यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून कायम ठेवून परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवायची आहे.
सिद्धरामय्या गट हा गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांना दलित आरक्षणांतर्गत भावी मुख्यमंत्री म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न करत होता. काही दिवसांपूर्वी खर्गे यांनी मुख्यमंत्री बनण्याच्या कल्पनेचे स्वागत केले होते आणि त्यांचे ज्येष्ठत्व लक्षात घेता पक्षाचे नेते त्यांना स्वीकारतील, असे म्हटले होते. परंतु, खर्गे यांनी स्पष्ट केले की, हायकमांडने कर्नाटकाच्या प्रश्नावर कोणताही निर्णय घेतलेला नाही.
खर्गे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, सध्या मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आमच्या पक्षात राहुल गांधी, सोनिया गांधी आणि इतरांसह काँग्रेस अध्यक्षांना सर्वोच्च अधिकार आहेत. तर दुसरीकडे हायकमांड जो काही निर्णय घेईल, आम्ही त्याचा केवळ आदरच करणार नाही, तर तो आदेश स्वीकारू, असे डॉ. परमेश्वर यांनी सांगितले.
1. कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाची चर्चा का सुरू आहे
राजकीय घडामोडी आणि पक्षांतर्गत हालचालींमुळे चर्चा सुरू आहे
2. कोणत्या नेत्याने बदलाची तारीख सांगितली
इक्बाल हुसेन यांनी संभाव्य तारीख सांगितली
3. काँग्रेस हायकमांडची भूमिका काय आहे
ते सध्या सावध भूमिका घेत निर्णय पुढे ढकलण्याच्या तयारीत आहेत
4. या चर्चेचा निवडणुकांवर काय परिणाम होऊ शकतो
2028 च्या निवडणुकांवर याचा प्रभाव पडू शकतो
5. सध्या मुख्यमंत्री बदल होण्याची शक्यता आहे का
सध्या तरी बदलाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.