
Raigad News : रायगडच्या पालकमंत्रीपदी आपलीच नियुक्ती होईल, असे अनेकदा शिवसेना नेते तथा राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी छाती ठोकपणे सांगितले होते. मात्र त्यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वास दाखवलेला नाही. त्यांच्या ऐवजी राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे रायगडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यामुळे भरत शेठ गोगावले यांचा फुगा फुटला अशा आता चर्चा रंगल्या आहेत.
राज्यात महायुतीचे सरकार आल्यापासून आपल्याला मंत्रीपद मिळेल असे आधी भरत गोगावले म्हणत होते. मात्र मागिल टर्म त्यांना मंत्रिपदानिवाच काढावी लागली. यानंतर आता ते पुन्हा आमदार झाले असून महायुती सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये मंत्री झाले आहेत. त्यांच्याकडे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्रालय देण्यात आले आहे. मात्र ते त्यांना रायगडच्या पालकमंत्रीपदाचे वेध लागले होते. त्यासाठी ते आग्रही होते. तर आता रायगडचे पालकमंत्री आपणच असू असे देखील गोगावले अनेकदा म्हणत होते.
दरम्यान काहीच दिवसांच्या आधी रायगडमध्ये पालकमंत्रीपदावरून जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली होती. येथे गोगावले यांचे 'फिक्स पालकमंत्री' असे होर्डिंग्ज लागले होते. तर श्रीवर्धन मतदारसंघात अदिती तटकरे यांचे ‘भावी पालकमंत्री’ असे बॅनर लावून उत्तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिले होते. त्यानंतर ‘फिक्स पालकमंत्री’ ‘भावी पालकमंत्री’ असे बॅनर लावून गोगावले विरुद्ध तटकरे असा सामना पाहायला मिळत होता.
गोगावले यांनी कोल्हापुरात देखील मीच रायगडचा पालकमंत्री होणार म्हणून दावा केला होता. पण आता रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून पडदा पडला आहे. गोगावले यांच्या ‘फिक्स पालकमंत्री’ होर्डिंग्जवर ‘भावी पालकमंत्री’ हा बॅनर सरस ठरला आहे. मंत्री आदिती तटकरेच पुन्हा एकदा रायगडच्या पालकमंत्री झाल्या आहेत.
यानंतर शिवसेनेच्या गोटात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून गोगावले यांनी, महायुतीचा हा निर्णय मनाला न पटणारा असल्याची प्रतिक्रीया दिली आहे. त्यांची ही प्रतिक्रीया नाराजी असल्याचेही आता चर्चा रंगल्या आहेत. गोगावले यांनी, रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करू असे म्हटले आहे. तसेच आपल्याला पालकमंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती असेही म्हटले आहे.
आदिती तटकरे यांच्याबाबत जिल्ह्यातील शिवसेनेच्या तीन आणि भाजपच्या तीन आमदारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यांनी आदिती तटकरे या रायगडच्या पालकमंत्री पदी नकोत अशी मागणी केली होती. तसेच पालकमंत्रीपद मला देण्यात यावे, अशीही विनंती केली होती. यामुळे मला पालकमंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा जिल्ह्यात सर्वांनाच होती. मात्र पालकमंत्रीपदाबाबत वेगळेचं घडलं आहे. पण शिंदे जो निर्णय घेतील, तो मान्य करावा लागेल, असेही गोगावले यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.