Raigad News, 20 Mar : महायुती सरकार स्थापन झाल्यापासून रायगडचं पालकमंत्रिपद (Raigad guardian minister post) शिदेंच्या शिवसेनेला मिळणार की अजितदादांच्या राष्ट्रवादीला मिळणार? याबाबतच्या चर्चांना उधाण आलं होतं. शिवाय पालकमंत्रिपद आम्हालाच मिळणार असा दावा देखील दोन्ही पक्षाकडून केला जात होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केल्यानंतर रायगडचं पालकमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्याकडे गेलं होतं. मात्र, त्यावरून मोठा वादंग झाला. शिंदेंच्या नेत्यांनी या निर्णयाला तीव्र विरोध केल्यामुळे 24 तासांच्या आत हा निर्णय मुख्यमंत्र्यांना मागे घ्यावा लागला होता.
तेव्हापासून रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी या पदावर आपला दावा सांगितला आहे. तर दुसरीकडे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी देखील जिल्ह्याचं पालकत्व आपल्यालाच मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
त्यामुळे रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या असतानाच केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी आता थेट या पदावर आपला दावा सांगितला आहे. रायगडचे पालकमंत्रीपद रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (RPI) द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
केंद्रीय सामाजिक आणि न्याय मंत्री रामदास आठवले हे गुरूवारी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी चवदार तळ्याकडे जाण्याआधी त्यांनी माणगाव तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाला भेट दिली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद सुटत नसेल तर हे पालकमंत्रिपद आम्हाला मिळावं, अशी मागणी त्यांनी केली.
ते म्हणाले, "भरत गोगावले हे पहिले मंत्रिपदासाठी आग्रही होते. आता पालकमंत्री पदासाठी आग्रही आहेत. मात्र, रायगडचं पालकमंत्रिपद हे आमच्या 'आरपीआय'ला मिळावं." दरम्यान, यावेळी त्यांनी कोणत्याही मुस्लिम नागरिकाने औरंगजेबाशी नाते जोडण्याचा प्रयत्न करू नये असा सल्ला देखील दिला.
ते म्हणाले, "औरंगजेब अत्यंत क्रूर होता. तो आपल्या देशाचा विरोधक आहे. कोणत्याही मुस्लिम नागरिकाने औरंगजेबाशी नाते जोडण्याचा प्रयत्न करू नये. औरंगजेब आपल्या देशावर आक्रमण करण्यासाठी आला होता. मात्र, त्याला आणि मोघलांना इथे गाढण्याच काम छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी केलं."
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.