Mahayuti Raigad Controversy: नवरात्रीनंतर 'रायगड'च्या पालकमंत्री पदाबाबत मोठा निर्णय होणार? 'या' बड्या नेत्याने दिले संकेत
Raigad News: राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेत येऊन दहा महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आला आहे. पण अद्यापही सरकारमधला रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबतचा तिढा सुटलेला नाही. रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस,तर नाशिकमध्ये शिवसेना व भाजप या दोन्ही मोठी रस्सीखेच सुरू आहे.याचदरम्यान,आता मंत्री भरत गोगावलेंनी (Bharat Gogawale) पुन्हा एकदा रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत खळबळजनक दावा केला आहे.
मंत्री व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते भरत गोगावले यांनी शनिवारी (ता.20) चिपळूणमध्ये मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आणला. कारण त्यांनी नवरात्रीनंतर पालकमंत्री पदाचा प्रश्न सुटेल, मी देवीचा खरंच भक्त असेल तर मला पालकमंत्री पद मिळेल असा दावा केला आहे. या गोगावलेंच्या दाव्यामुळे महायुतीत पुन्हा एकदा रायगडच्या पालकमंत्री पदाचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे.
नवरात्रीनंतर पालकमंत्री पदाचा प्रश्न सुटेल. मी देवीला साकडे घालणार असल्याचे गोगावले म्हणाले. मी खरंच देवीचा भक्त असेल तर मला पालकमंत्री पद मिळेल असे भरत गोगावले म्हणाले. रायगडच्या पालकमंत्री पदासाठी (Raigad Guardian Minister) माझा हट्ट नाही, पण काही गोष्टींमुळं मी त्यासाठी आग्रही आहे. जो हक्क आहे, तो का सोडावा? असा सवालही भरत गोगावले यांनी यावेळी उपस्थित केला.
महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री पद कोणाकडे जाणार हा कळीचा मुद्दा राहिला आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांत पालकमंत्री पद आपल्याकडेच राहावं यासाठी दबावतंत्र वापरले जात आहे. पण अद्यापही या पालकमंत्रिपदाबाबत निर्णय घेण्याची इच्छाशक्ती मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री दाखवताना दिसून येत नाही.
शिवसेनेकडून भरत गोगावले यांनाच पालकमंत्री पद मिळेल, असा ठाम व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे सुनील तटकरेंनी राज्यातच नव्हे,तर रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी थेट दिल्ली दरबारी भाजपच्या वरिष्ठ नेतेमंडळींकडे मोठी ताकद लावली असल्याची चर्चा आहे.
मंत्री भरत गोगावले यांनी यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, राऊत हे काही गोष्टी उगाच अंगावर ओढून घेतात. त्यांच्याकडून चुकीचे विधान आल्यामुळे आमच्या मावळ्याकडून उद्गार येतात. त्यामुळं संजय राऊत यांनी तारतम्य ठेवलं पाहिजे असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
तसेच निवडणुका स्वतंत्र लढण्याची आमची देखील तयारी असल्याचं गोगावले म्हणत महायुतीत मोठा धमाका केला आहे. आम्ही देखील मेलेल्या आईचे दूध प्यायलेलो नाही, पण महायुती म्हणून निवडणुका लढाव्यात अशी आमची भूमिका असल्याचंही गोगावले यांनी स्पष्ट केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.