Raigad Politics : निवडणुकीच्या रिंगणात नेत्यांनी उतरवले वारसदार; २ लेकी, २ सुनांची परंपरा, प्रतिष्ठा पणाला

Raigad Municipal Elections : रायगडचे राजकारण सध्या महायुतीतीत पडलेल्या ठिणगीवरून चांगलेच चर्चेत आहे. येथे सुरू झालेल्या पालकमंत्री पदाचा वाद फोडाफोडी आणि पळवा पळवीपर्यंत पोहचला आहे.
Raigad Municipal Elections
Raigad Municipal Electionssarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. रायगड जिल्ह्यातील दहा नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये दोन लेकी आणि दोन सुना आपल्या कुटुंबाचा राजकीय वारसा पुढे नेत मैदानात उतरल्या आहेत.

  2. घराणेशाही आणि महिला नेतृत्वाचा वाढता प्रभाव या निवडणुकांमुळे पुन्हा अधोरेखित झाला आहे.

  3. त्यामुळे रायगडमधील स्थानिक निवडणुका अधिक चर्चेत असून राजकीय समीकरणे नव्याने बदलण्याची शक्यता आहे.

Raigad News : रायगडचे राजकारण हे नेहमीच चर्चेचा विषय राहिला असून आता देखील येथील दहा नगरपालिकांच्या निवडणुकींच्या रिंगणात दोन लेकी, दोन सुना नेत्यांनी उतरवल्या आहेत. यामुळे सध्या हा विषय जिल्ह्यात चर्चेचा ठरला असून या दोन लेकी अन् दोन सुना आपल्या कुटुंबाचा राजकीय वारसा, परंपरा आणि प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी रिंगणात उतरलेल्याची चर्चा सुरू झाली आहे.

सध्या रायगडमध्ये शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीतील वादाची जोरदार चर्चा असून येथील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. तर येथील पालकमंत्री पदाचा वाद आता पक्षांच्या फोडाफोडी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या पळवापळवीपर्यंत पोहचला आहे. यामुळे रायगडची चर्चा राज्यभर होताना दिसत आहे.

अशातच येथे नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकींची घोषणा झाली असून राजकीय नेत्यांना आपल्या वारसदारांना राजकीय पटलावर उतरण्याची मानी संधी मिळाली आहे. आता येथील दहा नगरपालिकांच्या रिंगणात रायगडात दोन लेकी, दोन सुना आपल्या कुटुंबाचा राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी राजकीय आखाड्यात उतरल्या असून त्या मैदान मारणार का याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Raigad Municipal Elections
Raigad Politics : तटकरेंचा शिंदेच्या लढवय्या आमदारावर कडक प्रहार, विश्वासू साथीदाराला फोडला, राष्ट्रवादीचा थोरवेंसह शिवसेनेला धक्का!

अलिबागमधून माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांची कन्या अक्षया नाईक, मुरुडला माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकरांची कन्या आराधना नाईक तर पेणमध्ये आ. रवींद्र पाटील यांची सून प्रीतम पाटील आणि कर्जतला माजी आ.सुरेश लाड यांची सून डॉ.स्वाती पाटील निवडणुकीच्या आकाड्यात उतरल्या आहेत. यांनी आप आपल्या शहरात प्रचाराचा प्रारंभ देखील केला आहे.

अक्षया नाईक

अलिबाग नगरपालिकेत शेकाप, काँग्रेस, मनसे आणि मित्र पक्षांच्या आघाडीतर्फे अक्षया नाईक या प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.अक्षया नाईक या माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, माजी नगराध्यक्षा स्व.नमिता नाईक यांच्या कन्या असून त्यांच्या आजीही माजी नगराध्यक्षा होत्या. सुनिता नाईक यांची त्या नात आहेत.

याशिवाय त्या माजी जि.प.अध्यक्षा सुप्रिया पाटील यांच्या त्या भाची आहेत.नाईक घराण्याचे अलिबाग नगरपालिकेवर नेहमीच प्राबल्य राहिले असून शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी अलिबाग वाचवण्यासाठी ही राजकीय खेळी खेळत नाईक परिवाराच्या वारसदार असणार्‍या अक्षया यांच्याकडे नगराध्यक्षा पदाची जबाबदारी दिली आहे.

त्यांच्या विरोधात शिवसेना-भाजपतर्फे तनुजा पेरेकर या उभ्या आहेत. यापूर्वी त्या शिवसेनेतर्फे नगरसेविका म्हणून विजयी झालेल्या आहेत.तिसऱ्या अपक्ष उमेदवार कविता ठाकूर यांनीही अर्ज दाखल केलेला आहे. अलिकडेच त्यांनी आणि प्रविण ठाकूर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. तर माजी आमदार मधूशेठ ठाकूर यांचा राजकीय वारसा त्यांनाही लाभला आहे. यापूर्वीही त्यांनी नगरसेविका म्हणून काम पाहिलेल आहे.

मुरुडमध्ये दांडेकरांची कन्या

मुरुड नगरपालिकेत माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर यांचे प्रभूत्व राहिलेले असून दांडेकर परिवाराचा राजकीय प्रवास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस असा झालेला आहे. यावेळी मुरुडचे नगराध्यक्षपद हे महिलांसाठी राखीव असल्याने हाच मोका साधत मंगेश दांडेकर यांनी आपली सुकन्या आराधना दांडेकर यांना प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यांच्या विरोधात शिवसेने तर्फे कल्पना पाटील या उभ्या आहेत.

पेणला आमदारांची सून मैदानात

पेण नगरपालिकेवर आमदार रवीशेठ पाटील यांचे वर्चस्व अबाधित आहे. ते काँग्रेसमध्ये असतानाही त्यांनी आपल्या स्नुषा प्रीतम पाटील यांना नगराध्यक्षपदी विराजमान केलेले होते.आता सुद्धा भाजपतर्फे त्याच पुन्हा मैदानात उतरलेल्या असून सासऱ्यांची ताकद आणि भाजपची साथ या जोरावर त्या भविष्य अजमावणार आहेत. त्यांच्या विरोधात शहर विकास आघाडीतर्फे रिया धारकर यांना उतरविण्यात आले आहे. रिया धारकर यांनी यापूर्वीही पेणचे नगराध्यक्षपद भूषविलेले असून त्या माजी मंत्री स्व.प्रभाकर तथा आप्पासाहेब धारकर यांच्या स्नुषा आहेत.

Raigad Municipal Elections
Raigad Politics : आगामी निवडणुकीसाठी महायुतीतच जोरदार रस्सीखेच; इच्छुकांना आर्थिक बाजूची तयारीही करावी लागणार

FAQs :

1) रायगडमधील किती नगरपालिकांमध्ये निवडणुका होत आहेत?
रायगडमधील दहा नगरपालिकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत.

2) या निवडणुकांमध्ये कोणत्या महिला उमेदवार चर्चेत आहेत?
दोन लेकी आणि दोन सुना आपल्या कुटुंबाचा राजकीय वारसा सांभाळण्यासाठी रिंगणात उतरल्याने या महिला विशेष चर्चेत आहेत.

3) या महिलांच्या उमेदवारीमुळे काय बदल घडू शकतो?
स्थानिक राजकारणात घराणेशाहीचा प्रभाव वाढू शकतो तसेच महिलांचे नेतृत्व अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे.

4) यामुळे राजकीय समीकरणांवर काय परिणाम होणार?
काही मतदारसंघांमध्ये परंपरागत मतदान पद्धती बदलू शकतात आणि कुटुंबीय घटक मोठा ठरू शकतो.

5) या निवडणुका का लक्षवेधी ठरत आहेत?
कारण एकाच जिल्ह्यातील अनेक प्रस्थापित राजकीय घराण्यांनी महिलांना मैदानात उतरवून नवा राजकीय अध्याय सुरू केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com