

Raigad News : रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात धक्कादायक घटना उघडकीस आली असून एका 5 वर्षीय चिमुकलीची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे. धक्कादायक म्हणजे या चिमुकलीचे अपहरण करून हत्या करण्यात आली असून नसरापूर प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, मृत चिमुकलीवर अत्याचार झाला की नाही, हे आता शवविच्छेदनाच्या अहवालातून स्पष्ट होईल. पण त्याआधी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत 24 वर्षीय संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. त्याला आता बुधवारी (ता. 15) न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. किरण भिकू वाघमारे असे संशयित आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेण तालुक्यातील आदिवासीवाडीत राहणारी पाच वर्षांची मुलगी घरासमोर झोपली होती. दरम्यान, ती गायब झाली. घरात मुलगी दिसत नसल्याने तिच्या आई-वडिलांनी शोध सुरू करत मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद पोलिसांकडे दिली.
या तक्रारीनंतर पोलिसांच्या पथकाने परिसरात शोधमोहीम हाती घेतली. श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले. त्यानंतर आरोपीचा शोध लागला. संशयित आरोपीच्या घरापासून १०० मीटर अंतरावर असलेल्या निर्जनस्थळी त्या चिमुकलीचा मृतदेह आढळून आला. धक्कादायक म्हणजे मृत चिमुकलीच्या अंगावर कपडे नव्हते तसेच तिच्या शरीरावर जखमाही होत्या.
यावरून आरोपीने तिच्यावर अत्याचार केला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आता मृत चिमुकलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पेणमधील रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. त्या चिमुकलीवर अत्याचार झाला की नाही, हे शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.